पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/428

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमच्या वर्णमालेचा खून. ४ १३ शिकविण्यांत येतात. आजपर्यंत त्याबद्दल कोणास काहीं अडचण वाटली नाहीं; व आज ३० ० ० हजार वर्षे ही आमच्या हाडामासांत खिळली आहे. इतकेच नव्हे तर ती सशास्र आहे. आणि जगांतील इतर राष्ट्र ज्या वेळीं रस्त्यांतील इतर खड्यांप्रमाणे आपापल्या वर्णमालेतील वर्ण अव्यवस्थित रीतीनें लावीत होते, त्या वेळीं आमच्या प्राचीन वैयाकरणानी ही पद्धत अमलात आणली आहे, हे वरील उता-यावरून लक्षात येईल. ही पद्धत सोडून देऊन केवळ अक्षरें लिहिण्यास शिकविण्याकरितां सुलभता यावी म्हणून दुसरी पद्धत स्वीकारणें आमच्यामतें अगदी अलाध्य, अशास्रीय आणि मूर्खपणाचे होय. अक्षरे लिहिताना अव्यवस्थित रीतीनें लिहिण्यास शिकून मग क, ख, ग, घ, ङ हे वर्ण कटस्थानचे आहेत, असें व्याकरण शिकताना शिकल तर शिकावयाचे नाही तर नाही, अशी जर सरकारी विद्याखाते व्यवस्था करीत असल तर हा सुधारलेला रानटीपणा होय ! हल्लीचा काळ, मेक्डोनेल म्हणतात त्याप्रमाणें, शास्त्राचा व सुधारणेचा आहे; पूर्वीची रानटी व्यवस्था पुन: अमलात आणण्याचा नव्हे. अशा स्थितीत फार प्राचीन काळी वर्णमालेच्या रचनेत आम्ही जी सुधारणा केली व जी पाहून जगांतील विद्वान् लोक माना डोलवीत आहेत, ती एका झपाट्यासरशी काढून टाकून अधीं ग शिकवावा असे म्हणणाच्या लाकास स्वरोखरच आपल्यास ग ची बाधा झाली आहे, असे म्हणणे भाग येतें. आम्ही विद्या खात्यास साफ कळवितों की, ईो सुधारणा आम्हास नकेा आहे. व सरकार ही सुधारणा सक्तीने अमलात आणण्याचा विचार करील, तर आमच्या पोराच्या कल्याणाकरतां आम्हांस तिचा हेोईल तितका प्रतिकार करण भाग पडेल. जगात आजपर्यंत झालेल्या पाच विद्वानाची जर कोणास नावें घेण्यास सागितलें तर त्यात पाणिनीचे नाव ध्यार्वे लागेल, असें प्रेो. ब्लूमफील्ड यानी एके ठिकाणी म्हटले आहे; किंबहुना युरोप आणि अमेरिका खेडात * फायलॅलजी ’ म्हणून जें हल्ली नवीन शास्र निघाले आहे, त्याची उत्पात पाणिनीच्या व्याकरणापासून झालेली आहे. वर्णमालेतील अक्षरे, त्याच्या उच्चारासबंधाने स्थान व “ प्रयत्ना ' भद हे संस्कृत वैयाकरणानीं जितक्या सूक्ष्म रीतीनें ठरविले आहे, तितक्या बारीक दृष्टीनें त्याचा दुस-या केोणत्याही देशात आजपर्यंत विचार झालेला नाहीं. इंग्रजी भाषेतील keep ( कीप) या क्रियापदास भूतकालवाचक d ( डी , हा प्रत्यय लागल्यानें त्याचे रूप (kept) असे का होते, याची उपपात पाणिनीच्या व्याकरणाचा युरोपांत प्रसार होण्यापूर्वी तेथे केोणासही समजलेली नव्हती ! अशा रीतीनें आमचे व्याकरण परिपूर्ण असता बुक--कमिटीतील दोन चार सामान्य माणसांनी आमच्या वर्गमालेचा क्रम बदलून तिना खून करण्यास प्रवृत्त व्हावे, आणि विद्याखात्याने त्याला आपली मंजुरी धावी, हे धाडसाचे, साहसाचे आणि वेडेपणाचे चिन्ह होय. आम्हास ही गोष्ट बिलकूल मान्य नहीं. आम्हास आमची पेरेि वर्णमालेच्या संबंधाने तरी युरोपियन पराप्रमाणे गाढव व्हावयास नको आहेत. किंडरगार्टनी सोंगें ज्यांस