-हस्व इकारान्त किंवा हस्व उकारान्त संस्कृत शब्द आणि हस्व इकारान्त किंवा उकारान्त अव्यये, यासंबंधानें जो वाद आहे त्याचा आम्हीं वर सांगितल्या- प्रमाणे नियम केल्याने आपोआप उलगडा होतो.
दुसरा नियम उपान्त्य हस्व 'इ' व 'उ याबद्दलचा आहे. अन्त्या-क्षर अकारान्त असता उगन्त्य इस्त्र इ व उ याचा उच्चार मराठी भाषेच्या स्वभावाप्रमाणे दीर्घ होतो; जसें 'कठीण करमणूक' इत्यादि. यासाठी मरा- ठीत आलेले ' गुण युग ' विष सुख ' वगैरे शब्द 'गुण' 'युग' 'विप सुख' असे दीर्घ उगन्याचे लिहावे, असें एकपक्षाचे म्हणणे आहे. यास आधार काय तो उच्चार व प्राकृत भाषेची सरणी हा होय. व्युत्पत्तिदृष्ट्या या शब्दातील उपान्त्यस्वर दीर्घ का लिहावे यास काही कारण नाहीं. मार्गे आम्हीं सागितलेच आहे की, 'घर' हा शब्द मराठीत पहिल्या 'घ' वर जोर देऊन उच्चारतात व शेवटचा ' र ' चा उच्चार जरा अस्पष्ट होतो. या नात्याने पाहिले तर 'विष' या संस्कृत शब्दातील 'वि' चा उच्चार उदात्त व चा अस्पष्ट करून तो शब्द विष असा उच्चारावा लागेल, हे खरे आहे, परंतु प्रश्न एवढाच आहे कीं, उपान्त्य -हस्व 'इ' व 'उ' उदात्त झाले तर ते दीर्घ लिहावे की काय ? उदात्त स्वर आणि दीर्घ स्वर यामध्ये भेद आहे स्व स्वरही उदात्त होऊं शकतो, हे लक्षांत ठेविले पाहिजे, यासाठी आमचे असे मत आहे की, या शब्दातील उपान्त्यस्वर संस्कृतातल्याप्रमाणेच वस्त्र लिहून त्याचा उच्चार मात्र 'घर' यातील 'घ' प्रमाणे करण्यास सांगावें. उच्चार दीर्घ नाहीं, उदात्त आहे हैं ' या सामासिक शब्दातील पहिला 'गु' व दुसरा 'गु' याच्या उच्चारावरून दिसून येईल. 'अणुरेणु' वगैरे शब्द याच वर्गातील आहेत. मराठी भाषेत उपान्त्य 'अ' 'इ' व 'उ' ( -हस्व ) उदात्त उच्चारले जातात. हे तिहींच्या म्हणजे 'अ' 'इ' व 'उ' हे उपान्त्य असता त्यांच्या उच्चारावरून स्पष्ट दिसते; व 'अ'ला जो नियम लागू करावयाचा तोच '६' व 'उ' यासही केला पाहिजे, 'घर' हा शब्द जर 'घार असा लिहित नाहीत तर 'विष' हा तरी ' वीष' असा का लिहावा, हे आम्हांस समजत नाहीं. 'घ' व 'वि' याचे उच्चार दीर्घ नव्हत, उदात्त आहेत हे 'घर' या शब्दातील 'घ' च्या उच्चारावरून स्पष्ट दिसत आहे. तर मग 'विष' 'गुण' याचे उपान्त्य दीर्घ करणे म्हणजे 'इ' व 'उ' यांच्या दीर्घ व उदात्त उच्चारातील भेद नाहींसा करणे होय. शिवाय वर सागितलेच आहे कीं, उपान्त्य स्वर दीर्घ लिहिण्यास उच्चाराखेरीज दुसरा आधार नाही. अर्थात् एकट्या उच्चाराच्या आधारावर संस्कृत शब्दाचीं मूलरूपे पालटणे बरोबर होणार नाहीं.
तिसरा नियम व्यंजनान्त शब्दांचा होय; उ. ' क्वचित् शरद' इत्यादि"' विद्वान् 'शब्द मराठी भाषेत प्रायशः व्यंजनान्त न लिहितां शेवटील
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/423
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०८
लो० टिळकांचे केसरीतील लेख.