पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ०६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. संमेलन होऊन मोकळ्या मनार्ने एकमेकांच्या मतांचा विचार होऊन भाषेच्या अभिवृद्धीस तो कारणीभूत होईल.

  • नंबर ४

आजपर्यंत गेल्या तीन अंकात मराठी भाषेतील लेखनपद्धतीच्यासंबंधानें जीं सामान्य तत्त्वें आहेत त्याचे थेोडेसें विवेचन केले. आता हल्लीं सरकारी बुककमिटीनें किंवा रा. र. साने, हातवळणे व गोडबोले, यानीं जे काहीं सामान्य नियम अमलांत आणण्याचे योजिले आहे त्याचा विचार करूं. मागे सागितलेच आहे की, मराठी भाषेच्या हल्लीच्या लेखनपद्धतींत जी कांहीं सुधारणा करावयाची असेल ती सरकारी नोकरीतल्याच विद्वान् गृहस्थाच्या अभिप्रायानें न करितां नोकरीतील व बाहेरील मिळून एकंदर विद्वानाच्या मताने करावी. आमचे मत एकप्रकारचे असले, तरी तेवढयाने शाळांखात्यांतील क्रमिक पुस्तकांत लेखनपद्धतासंबंधाने जी सुधारणा करावयाची ती इतर विद्वानाचा अभिप्राय घेतल्याखेरीज करावी असें आमचे मत आहे, असे समजूं नये आमचा आभिप्राय अमुक एक असला म्हणजे अशा प्रकारच्या बाबतीत सवै कार्य झालें, असें आम्ही समजत नाहीं. म्हणूनच यासंबधाने शाळाखात्यातील अधिकायानीं सर्व म्हणजे सरकारी नोकर आणि इतर विद्वान् याची परिषद बोलावून निकाल करावा, अशी आमची त्यांस पुनः सूचना आहे. आता हल्ली ज्यासंबंधानें वाद आहे अशा एकंदर चार गोष्टी आहेत. पैकी पहिली अशी गोष्ट अशी की, -हस्व इकारान्त किंवा व्हस्व उकारान्त, उदाहरणार्थ, रवि, कवि, भानु, गुरु इत्यादि जे शुद्ध संस्कृत शब्द मराठीत आले आहेत त्याचे अंत्यस्वर लिहिताना दीर्घ लिहावे किवा -हस्व लिहावे. एका पक्षाचे म्हणणे असे आहे कीं, शुद्ध संस्कृत शब्दात फेरबदल करण्याचा अधिकार कोणासही नाही. शिवाय समासात हे शब्द आले तर संस्कृताप्रमाणे त्याचे अंत्यस्वर -हस्वच लिहावे लागतात; उ. रविप्रभा, गुरुकूल वगैरे. ह्यासाठीं त्याची शुद्ध संस्कृत रूपेच लिहिण्यांत कायम राखावीं हें चागलें. उलट बाजूचे असे म्हणणे आहे की, जरी संस्कृतात या शब्दाचे अंत्यस्वर -हस्व आहेत तरी त्याचीं प्रथमान्त रूपें कविः गुरुः अशी विसर्गान्त म्हणजे दीर्घच होतात. प्राकृतात विसर्गाचा लोप होऊन मागील स्वरास दीर्घत्व आल्यानें व्युप्ततिदृष्टया कवी, रवी, भानू, गुरू, याप्रमाणें अन्त्यस्वर दीर्घ होतात; आणि विशेष महत्त्वाची गोष्ट ही कीं, मराठीत उच्चारही दीर्घच आहेत. जसें * भानू आला ’ (भानु -हस्व नव्हे), * मेोरोपंत मोठा कवी (कवि नव्हे) होता. ’ इत्यादि. समासाची

  • ( केसरी, तारीख २ ऑगस्ट १९०४).