दत्तकान्ची आवश्यकता २७ कल्थाणाकरितां आहे असे समजावयाचे व त्याचे खरोखर कामही हेंच आहे.) लोकोपयोगाकडे लागल. जमिनींत सांपडलेल्या द्रव्याची जर हो गोष्ट तर दत्तक होऊन एखाद्याची इस्टेट घेणारासच निराळा नियम का असावा ? कोणी असे म्हणतील कीं या दोन गोष्टी अगदीं भिन्न आहेत, कारण दत्तकास जी इस्टेट मिळत ती पूर्वीच्या मालकांच्या अनुमतीनेंच मिळतै व त्याबद्दल त्यास मृताचे श्राद्धादिक करार्वे लागतें. परंतु तसा प्रकार जमिनीत सांपडलेल्या द्रव्याचा नाहीं. गोष्ट खरी आहे, पण त्यात प्रश्न म्हणून येवढाच कीं मालकास, अशा रीतीनें, वाटेल त्यास विनाकारण आपली इस्टेट देण्याचा अधिकार केोठून आला ? एखाद्या वस्तूवर आपला हक्क काहीं नैसर्गिक नाहीं, म्हणजे एखादी वस्तु आपणास प्रयत्नार्ने मिळाली तेवढ्यानेच त्या वस्तूवर आपला हक्क येत नाही. श्रम, बुद्धि मितव्यय हीं जरी द्रव्यसंचयाची कारणे आहेत तरी त्यापासून इक्काची उत्पात होत नाहीं. केवळ मी मिळविलें म्हणूनच माझा त्यावर हक्क नाही, तर लोकांनी तो हक्क कबूल केल्यामुळे तो मला प्राप्त झाला आहे, ही गोष्ट नेहमीं लक्षात ठेविली पाहिजे. अर्जन व अधिकार याचा कार्यकारणभाव स्वभावसिद्ध नसून, तो लोकांनीं कबूल केल्याखेरीज होणे अशक्य आहे. ही लोकाची कबुली किंवा अनुमोदन दोन प्रकारें व्यक्त होत असतें. एक कायद्यार्ने व दुसरे लेोकमतानें. कारण सर्वच गोष्टींचे कायद्यार्ने नियमन करता येत नाही. जेथ जेथे कायदा अपुरा पडतो, तेथे तेथे लोकभय भर घालते. स्वकष्टार्जित द्रव्याचा हृवातसा व्यय करण्यास जरी कायद्यानें प्रत्येक मनुष्यास अधिकार दिला आहे, तरी माग लिहिल्याप्रमाणे आपलें द्रव्य दुव्र्यसनात उडविण्यास लोक का भितात ? लोकभयाने. मग हेंच लोकभय दत्तक घेण्यास का उपयेोगी पडू नये ? समाजरचनच्या नियः माच्या आमच्या अज्ञानाखेरीज आम्हास तर दुसरे काही कारण दिसत नाही. स्वार्जितावर पूर्ण हक्क दिल्यानें जसा दुव्र्यसनात व समुद्रांत पैसे उडविण्याचा व टाकण्याचा कोणास हक्क येत नाहीं, तशीच मरतेवेळीं एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतही त्यास देता येणार नाहीं. दोनही प्रकार सारखेच निद्य आहेत. भद इतकाच कीं, एक आपण मानीत आली, व दुसरा तसा मानण्यास अजून शिकलें नाहीं. औरस पुत्रादिकास आपली इस्टेट का द्यावी, हें मार्गे सांगितलेंच आहे; ती दत्तकास देण्यास तशा तन्हेचे काही कारण नसत. त्यानें श्राद्धादिक करावें, याकरितां देतों म्हणून कोणी म्हणतील, तर एकतर हें पोकळ कारण आहे, हें मार्गे सिद्ध केलेंच आहे; व दुसरें तेवढ्याकरिता कांहीं सगळी इस्टेट दत्तकास द्यावयास नको. स्वार्जितावर पूर्ण अधिकार दिल्याने आधीच समाजांत द्रव्याचा विषम विभाग होत आहे. पण जरी कसा तरी द्रव्यसंचय व्हावा, येवढ्याकरिता समाजाने तो कबूल केला आहे, तरी द्रव्याची वांटणी समाजात सारखी होऊन सर्वत्रास सारखे सुख व्हावें, हा आपला इष्ट हेतु असल्यामुळे जेव्हां जेव्हां स्वार्जितावर जितका हक्क दिल्याखेरीज द्रव्यसंचय कोणी
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/42
Appearance