पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/419

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

양 o g लो० टिळकांचे केसरींतील लेख. त्यामुळे ग्रंथांतील विवेचनाचे महत्त्व कमी होतें असें नाहीं. वाढत्या भाषेचे व्याकरण आणि पूर्ण झालेल्या भाषेचे व्याकरण, यांमध्यें अवश्य राहाणारा जो भद वर सांगितला आहे तो लक्षात आणला म्हणजे आम्ही म्हणते त्याचा खरेपणा वाचकांच्या लक्षांत येईल. वरील तीन ग्रंथकारांपैकीं रा. सा. साने हे हल्लींच्या बुककमिटीचे एक मेंबर असल्यामुळे कित्येकाची अशी समजूत झाली आहे कीं, वरील मुनेित्रयानी आपल्या पुस्तकात जे जे म्हणून नियम दिले आहेत ते सर्व आतां मराठी पुस्तकात घुसडून देऊन रा. सा. साने हे सरकारच्या साहाय्यानें मराठी भाषेवर जुलूम करूं पाहात आहेत. ही भीति खरी असेल तर मराठी भाषेच्या बचावाकरिता महाराष्ट्र लेखकानीं आपली शस्राखें सज्ज करण्यास लागणें जरूर आहे. पण आम्हास जी माहिती मिळाली आहे त्यावरून ही भीति निरर्थक आहे, असे समजतें. कांहीं शुद्ध संस्कृत शब्दाने अंत्य स्वर मराठी भार्षत व्हस्व लिहावे कीं, दीर्घ लिहावे आणि काही शब्दावरील अनुस्वार काढून टाकावे किंवा ठेवावे, याच्या पलीकडे क्रमिक पुस्तकाच्या लेखनपद्धतींत काहीं फेरफार करण्याचा विचार आहे, असें दिसत नाहीं. आता हा फेरफार करावयाचा तोही केवळ दोन चार सरकारी अंमलदाराच्या मतानें न करतां महाराष्ट्र भाषेतील चागल्या लेखकांचे व विद्वानाचे मत घेऊन करावा एवढेच जर कोणाचे म्हणणें असेल तर ते आम्हास मान्य आहे. अव्वल इंग्रजीतील एक आख्यायिका अशी आहे कीं, प्रसिद्ध विद्वान् कै. बाळशास्री जाभेकर याचे काही मराठी लेख मेहरबान कॅप्टन कॅडीसाहेब याचेकड तपासण्यास गेले. कॅप्टन केंडी यानीं इंग्रजी-मराठी कोश केलेला असून इतर युरोपियन लोकांपेक्षां त्याचे मराठीचे ज्ञान पुष्कक चांगलें होतें. परंतु त्या साहेबाचा काहीं गोष्टींत आग्रह असे. उदाहरणार्थ * हा ’ शब्दास हा शब्दाचे सामान्यरूप होऊन विभक्तिप्रत्यय लागल्यास त्याचे * ह्यांनी ? * ह्याचे ? अशी रूपे व्हावीं * यानीं ? * याचे ’ अशीं होऊ नयेत असें त्याचे मत होतें. अशा दृष्टीनें जव्हां ते कै. जांभेकर यांच्या ग्रंथाचे परीक्षण करूं लागले तेव्हा त्यात त्यास काही चुका आढळल्या व त्या कै. जाभेकर यानी दुरुस्त कराव्या म्हणून रिपोर्ट केला. कै. जाभेकर हे काही विद्वर्तेत कमी नव्हते. त्यांनी कॅडीसाहेबाचा हा रिपोर्ट पाहिल्यावर उलट असा रिपोर्ट केला की, मराठी भाषा ही आमची जन्मभाषा आहे; आणि ती भाषा ज्या भाषेपासून निघाली तिचे आणि मराठी भाषेचे शास्त्रीय रीतीनें आम्ही अध्ययन केलेले आहे. तेव्हा शुद्ध मराठी कोणतें आणि अशुद्ध मराठी कोणतें हें ठरविण्याचा अधिकार आमचा आहे, कॅडीसाहेबांसारख्या परक्या मनुप्याचा नाहीं, आणि आमच्या भाषापद्धतींत किंवा लेखनपद्धतींत केंडीसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणें सुधारणा करावचाची असेल तर आमचा लेख आमच्याकडे परत पाठवावा. मराठी भाषा कशी असावी व ती लिहावी कशी, हें ठरविण्याचा अधिकार फक्त महाराष्ट्रीयांचाच आहे ! कै. जांभेकर यांचे अशा