पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

છે ૦ ૨ लों० टिळकांचे केसरींतील लेख. व्यक्त करण्यास अक्षर सामग्रीही भाषेतील वर्णसमुदायांत नेहमी सांपडते, असे नाहीं. इतर सर्व भाषेपेक्षा संस्कृत भाषेतील वर्णशास्र अगदीं परिपक्व दशेस आलेले आहे. तथापि त्यातही प्रत्येक स्वराचे उदात्त, अनुदात्त, इत्यादि बरच भद करावे लागतात. व तितके भद करून ही अखेरीस अक्षराचा उच्चार करावथाचा हें गुरुमुखानचे समजून घ्यावें लागतें, अशी स्थिति आहे. सामान्यत: अर्सेही म्हटले तरी चालेल कीं, जी भाषा बोलण्यांतली आहे तीतील शब्दाचे उच्चार ती भाषा बोलणाच्या लोकाकडूनच समजून घेतले पाहिजेत. व्याकरणाच्या नियमांनी भाषेस व्यवस्थित रूप येते यांत काही शंका नाही; तथापि या नियमाची व्याप्ति बरीच मर्यादित असल्यामुळे कोणतीही भाषा वापरणारे लोक जसे बोलतात तशी हुबेहुब फोनोग्राफमध्येही येणे कठीण पडत; मग पाढच्या कागदावर काळ्या खुणानो ती सर्वाशीं व्यक्त करणे अशक्य असल्यास त्यात काहीं नवल नाही. असेो; एवढ्यावरून असे मात्र कोणी समजू नये कीं, व्याकरणात शुद्धलेखनाचे नियम घातल्यापासून भाषेस किंवा विद्याथ्यास काहीं उपयेोग होत नाही; किंबहुना व्याकरण शास्राचा जर काहीं उपयोग असला तर हाच होय कीं, प्रकृति आणि प्रत्यय याचा विचार करून शब्दाचीं रूपें काहीं तरी सामान्य नियमाच्या अधिकारात आणून सोडावी. वैयाकरणानी असे नियम ठरावताना प्रचलित उच्चाराकडे किंवा लेखनपद्धतीकडे दुर्लक्ष करता कामा नये, हें पहिल्याच लेखात आम्ही सागितले आहे. वैयाकरण हे भाषेचे शास्ते खर, पण त्याचा अधिकार मर्यादित आहे, आणि कोणतीही भाषा बोलणारे लोक हेच जरी त्या भाषेचे कर्ते असले तरी व्याकरणशास्त्र किंवा व्युत्पतिशास्त्र हे त्यास अगदी झुगारून देता येत नाही. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आणि उभय पक्षांचा मिलाफ घालून मग लेखनपद्धतीवाल्यानॉ काय नियम ठरवावयाचे ते ठरविले पाहिजेत. मराठी भाषा ही संस्कृताची मुलगी असली तरी तिचे म्हणून कांहीं स्वतंत्र रूप आहे, ही गोष्ट आम्हांस मान्य आहे. तथापि या भाषची अभिवृद्धी करताना मातृभाषेची जर कांही मदत घ्यावी लागली तर ती मदत घेते वेळीही मराठी भाषेचाच पग डा संस्कृत भाषेवर बसला पाहिजे, असे म्हणता यावयाचे नाहीं. खेरीज ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, मराठी भाषा अद्याप बाल्यावस्थेत आहे; व एव्हाच जर तिच्या स्वरूपाचे निरक्षिण करून त्याच्या वाढाची दिशा मर्यादित केली तर चिनी स्रियाच्या पायांप्रमाणें तिच्या सैौंदर्याची स्थिति होऊन तें काहीं थोड्या सोवळ्या किंवा आग्रही लोकाखेरीज कोणासही पसंत पडणार नाहीं. हें सागण्याचे कारण इतकेच की, मराठी भाषेतील सर्व -हस्व, दीर्घ, सानुनासिक किंवा निरनुनासिक शब्दांची अगर वैकल्पिक रूपांची आज एकदम व्यवस्था लावून टाकावी व पुनः घोटाळा ठेवू नये, असें जे कित्येकांचे म्हणणे आहे, ते वाढत्या भाषेस लागूं पडत नाहीं. इतकेंच नव्हे तर तसा प्रकार झाल्यानं भाषेच्या स्वातंत्र्याची व सौंदर्याची हानि होते, हें नीटपणें लक्षांत यावें. संस्कृत भाषेतही कांहीं शब्दांची