पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/415

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 o o लो० टिळकांचे केसरींतील लेख. कारण उच्चार तसा होतो असे म्हणतात. पण ही चूक आहे. * तरवार ? यांत चार अक्षरै असून उच्चाराचा जोर * वा ’ वर पडल्यामुळे मागच्या * र ' चा उच्चार अर्धवट करावा लागतो, व उदात्त, अनुदात्त इत्यादि स्वरांचे आरोहावरेाइ लेखनपद्धतींत दाखविण्याची चिन्हें जर मराठीत असती तर * तवांर ’ असें वेडेवांकडे लिहिण्याची कल्पना कोणी सुचविली नसती. लहान मुलें चांगली अक्षर ओळख होण्यापूर्वी शब्दांतील अक्षरं प्रथक् प्रथकू वाचतात. म्हणून तोच मराठी भाषेतील शब्दाचा खरा उच्चार असे जर कोणी म्हणेल तर ते जितके समंजस दिसेल, तितकेंच * तरवार ’ शब्दातील पहिल्या ' र ' चा उच्चार प्रौढ माणसानें बोलतांना स्पष्ट करीत नाहींत म्हणून ते शब्द “ तवरि ’ असा लिहावा हें म्हणणे सयुक्तिक होय. * घर ’ या शब्दातील * घ’ मधील * अ ’ ची जी स्थिति सांगितली तीच मराठी भाषेतील * आ ? स्वराचीही आहे. उदाहरणार्थ, * पाह ’ धातू घ्या. हा * पश्य ' धातूचा अपभ्रंश असल्यामुळे पहिले अक्षर म्हणजे * पा ? दीर्घ आहे; व वर्तमानकालीं * पाहतें ’ अशी रूपें होतात. पण आज्ञार्थीं * पाहा ’ असें वास्तविक रूप होत असताही दोन दीघांचा एकदम उदात्त उच्चार होणे कठीण पडत असल्यामुळे * पाहा ’ यातील पहिला * आ ? हलका म्हणतात; इतकेंच नव्हे तर * पाहा ? या रूपाऐवजी पहा असेही रूप प्रचारांत आले आहे. * आपण ’ या शब्दातील * आ ? आणि आपल्या या शब्दांतील पहिला ‘ अा ? यांच्या उच्चारातही भद आहे. पण तसा भेद लिहिताना दाखविण्याचा मराठींत कधीं कोणी प्रयत्न केला नाही. इतकेंच नव्हे तर तसा प्रयत्न केला असता तो हास्यास्पद आणि निरुपयोगी होईल.उदाहरणार्थ ‘‘मी आपल्या घरी गेलों” असे लिहूं लागली तर लिहिण्याच्या पद्धतीस सुलभता न येता उलट हा सर्व खटाटोप उपहास्यास्पद होईल. * जसें बोलावें तसे लिहावें । हें तत्त्व तोंडानें उच्चारणें जितकें सेोपें आहे तितकेंच तें अमलांत आणणे कठीण आहे हें यावरून दिसून येईल. इंग्रजी भाषेतही शब्दांतील काहीं स्वरावर जोर देतात व कांहीं स्वर बिनजोरी असतात; आणि कित्येकदा तर या जोरानें आणि बिनजोरानें (accent) शब्दाच्या अर्थीतही भद पडतो, हें इंग्रजी चवथ्या यतेतील पोरासही माहीत आहे, पण यामुळे इंग्रजी भाषेच्या लेखनपद्धतीत म्हणजे छापलेल्या पुस्तकाच्या लेखनपद्धतीत या accent चा कोठे उप्लयेोग करीत नाहीत. पोटातून वारा वर निघून मुखातील निरनिराळीं स्थानें आणि जिव्हा यांच्या संयोगानें जें स्वैरवैचित्र्य उत्पन्न करतों तें सर्व लेखणीच्या टोकानें कागदावर व्यक्त करणें बहुतेक अशक्य आहे असे म्हटले तरी चालेल. पाणिनीसारख्या वैय्याकरणांनीं सोळा स्वर आणि छत्तीस व्यंजनें करून त्यांतही पुनः उदात्त, अनुदात्त, संवृत्त, विवृत, यम, उपध्मानीय वगैरे जरी भेद केलेले आहेत, तथापि ही सर्व सामग्री तोंडांतील वायूच्या खेळाचे लेखनपद्धतींत पूर्ण प्रतिबिंब उतरविण्यास पुरी पडत नाहीं, मग मराठी भाषेची काय कथा ? कानडीत व इंग्र