पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेची लेखनपद्धतेि. ३९९ भराठी ज्यांची जन्मभाषा आहे अशा लहान मुलास हे उच्चार निरनिराळे आहेत असे सांगण्याची कधींच जरूर पडत नाहीं, साहेवलोकांसारखे परकीय लोक जेव्हां मराठी भाषा शिकतात तेव्हां त्यांच्याकरता या उच्चारभदांची फोड करणे जरूर पडतें. पण मराठी भाषेची शालोपयोगी पुस्तकें कांहीं साहेबलोकांकरितां लिहावयाचीं नाहींत हेंही त्याबरोबर लक्षात ठेविलें पाहिजे. बच्याच वर्षापूर्वी कै. बापूसाहेब भाजेकर यानी केलेल्या मनेरमा नाटकांत * केलें ' याऐवजी ‘ केलं, ’ ‘ असें ’ या ऐवजी ‘ असं ? वगैरे लिहिण्याचे प्रकार पुस्तकांत घालून ते रूढ करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तोही सफल झाला नाहीं. साराश उच्चाराप्रमाणें सर्वाशीं भाषेची लेखनपद्धति ठेवणें बहुतक अशक्यच होय असे म्हटले तरी चालेल. कित्येकास असे वाटत असेल कीं, हल्लीं आपण लिाईतों ती पद्धति उच्चाराला पुष्कळ अंशीं धरून आहे. पण जरा विचार केला असता असे आढळून येईल की हेंही म्हणणें खरें नाहीं. उदाहरणार्थ, आपण * घर * * मठ ' * नथ ' वगैरे शब्द घेऊं. या प्रत्येक शब्दात दोन स्वर असून ते दोन्ही अकारच आहेत. पण पहिल्या घ, म आणि न या तिही मधील अकार पुढच्या अकारापेक्षां जर उंच स्वरानें म्हणावा लागतो. पारिभाषिक शब्दानें हाच नियम सांगावयाचा असला तर * घर ’ यातील घ-मधला अ उदात्त (दीर्घ नव्हे) आहे असे म्हटलें पाहिजे; आणि लेखनपद्धति उच्चारास अनुसरून ठेवावयाची असेल तर घर हा शब्द घर असा लिहिला पाहिजे. बरें, घर या शब्दास द्वितीया विभक्ति लावून ‘ घरास ' असें रूप झाले म्हणजे घर या शब्दांतील * घ 'चे उदात्तत्व नाहीसे होऊन घ वर पडणारा जोर * रा ’ वर जातो. वेदांतील मंत्राचे बरोबर उच्चार कायम रहावे म्हणून प्रत्येक स्वराचे -हस्व, दीर्घ आणि प्लुत या खेरीज उदात्त, अनुदात्त आणि स्वरित, व संवृत आणि विवृत, असे जे पाणिनीनें भेद केले आहेत ते एवढ्याचकरिता होत. कोणतेंही वाक्य लिहिले असता त्यातील शब्दामध्ये झालेल्या स्वरांपैकी उदात्त कोणते व अनुदात्त कोणते हें समजल्या खेरीज त्या वाक्याचा बरोबर उच्चार कधीही करतां यावयाचा नाहीं. वेदांमधील मंत्रांस जे स्वर दिलेले आहेत ते याचकरिता होत. पण त्यांचा उच्चार मात्र कसा करावयाचा हें आम्ही विसरून गेले आहॅी. ** अग्निमिळे पुरोहितं ” यांतील * मी ’ व ‘ हि ’ हीं अक्षरं उदात्त आहेत व तीं इतर अक्षरापेक्षां जरा उच्च स्वरार्ने म्हटलीं पाहिजेत. तथापि या उच्चाराचा उच्चनीचपणा हल्लीं जसा विद्याथ्यांची शेंडी धरधरून व्यक्त करतात तसा पूर्वी खचित करीत नसावे. वेदातील संस्कृत ही एकदां बोलण्याची भाषा असावी; आणि जेव्हा ती तशी होती तेव्हां एक मनुष्य दुस-यास भेटला असतां हल्लीं वैदिक जसे स्वर देऊन म्हणतात तसें बोलत असेल असे मानता येत नाहीं. ही संस्कृताची गोष्ट झाली. पण मराठीचा असाच प्रकार आहे हें एकदम लक्षांत येत नाही. * तरवार ? हा शब्द कित्येक लोक ' तवीर ’ असा लिहितात; व त्यास