पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेची लेखनपद्धतेि. ३९५ लक्षांत ठेविलें पाहिजे. कारण आधीं भाषा आणि मग व्याकरण हा न्याय * प्रयोगशरणा वैय्याकरणाः ’ या म्हणीवरूनच स्पष्ट होत आहे. कोणत्याही भाषेतील शब्दांची निरनिराळीं स्वतंत्र रूपें बनविणे किंवा नवीन प्रयोग प्रचारांत आणणें हें वैय्याकरणाचे काम नव्हें, व तशा रीतीनें तो जर प्रयत्न करील तर त्यास यशही यावयाचे नाहीं. लोकांमध्ये जे शब्द, अक्षरें, वर्ण, प्रयोग किंवा उच्चार प्रचलित आहेत तेच घेऊन त्यास लागू होतील असे सामान्य नियम किंवा अपवाद शेोधून काढणें आणि सदर नियमापवादाची शास्रीयरीत्या व्यवस्था लावणें हें वैय्याकरणाचे पहिलें कर्तव्य होय. वैय्याकरणांनीं हें काम केले म्हणजे त्याचा स्वभावत:च असा परिणाम होती कीं, सामान्य नियमास अनुसरून जीं रूपें किंवा प्रयोग नाहींत त्यांस भाषेतून हळू हळू फाटा मिळत जातेो; आणि तसे झाले म्हणजे कांहीं काळानें अपवादाची संख्या कमी होऊन भाषेस स्थैर्य आणि त्याचबरोबर सरलताही प्राप्त होते. वैय्याकरणांची निंदा करणारे किंवा त्यांच्या उद्योगाचे महत्त्व कमी मानणारे लोक प्राचीन काळीही झालेले आहेत व अद्यापही दृष्टीस पडतात. तथापि अशा आक्षेपानीं व्याकरणशास्राचे किंबहुना कोणत्याही शास्त्राचे महत्त्व व उपयोग कमी झाला किंवा होती असें आढळण्यांत येत नाहीं. नियमित सत्ता असलेला राजा आणि प्रजा यांच्यामध्यें जो संबंध असतो तोंच किंवा तशा प्रकारचा वैय्याकरण आणि भाषेतील शब्द यांच्यामध्ये आहे. शब्दास शिस्त लावणें हें जरी व्याकरणशास्रकाराचे कर्तव्य आहे तरी शास्रकारांस मन मानेल त्याप्रमाणें वागता येत नाहीं. * तूं काय कलेंस ? या प्रयोगास सतरा व्याकरणकारांनीं अशुद्ध म्हटले तरी मराठी भाषा बोलणारांनी त्यास जॉपर्यंत सोडले नाहीं तोपर्यंत केणत्या तरी अपवादाखालीं म्हणून व्याकरणानेयमात त्याचा समावेश केलाच पाहिजे. * स्थितस्य गतिश्चितनीया ’ हें तत्त्व वैय्याकरणानीं नेहमींच लक्षांत ठेविलें पाहिजे व त्याप्रमाणें ते जोपर्यंत चालत आहे तीपर्यंत त्यांचे नियम केोणत्याही आक्षेपास पात्र व्हावयाचे नाहीत. व्याकरणकारांच्या अधिकारासंबधाने वर दोन शब्द लिहिले आहेत ते लिहिण्याचे कारण एवढेच कीं, हल्लीं जो वादविवाद चालू आहे त्यात याकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले दिसतें. रा. सा. साने, गोडबोले व हातवळणे यांच्या ‘मराठी भाषेतील लेखनपद्धति ? या ग्रंथात जितक्या गोष्टी सांगितल्या आहेत तितक्या सर्व हल्लींची बुककामेटी अमलांत आणणार आहे किंवा फक्त उहस्व दीर्घ आणि अनुस्वार याबद्दलचे कांहीं सामान्य नियमाप्रमाणे व्यवस्था करणार आहे हें अद्याप पुरे बाहेर पडलें नाहीं. तथापि जी कमिटी व्यंजनाचा कंठ तालव्यादि स्थानभेद झुगारून देऊन लहान मुलांस अक्षराच्या आकृतीप्रमाणे सोपी व कठिण अक्षरें शिकविणार ती कमिटी व्याकरणशास्त्राच्या आत फार खोल शिरेल, असे आम्हांस वाटत नाहीं. कसेंही असो, एवढी गोष्ट खरी आहे कीं, कमिटीपुढे आज हा प्रश्न आला आहे व प्रसंगानुसार त्याचा जरी थोडा जास्त खुलासेवार