Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ लो० टिळकांचे केसरीतील लेख असतो. पण ज्यास एकदम इतकें द्रव्य मिळण्याचा मुळींच संभव नसतेो व ज्याचा त्यावर कांहीं एक हक्क पाँचत नाहीं, आणि ज्यास द्रव्यसंपादनांत काय दुःख आहे, हें मुळींच समजत नसतें, त्याचे हातीं एकदम इस्टेट पडल्यावर त्याने ती न उधळल्यास आश्चर्यच मानावयाचे. समाजानें मनुष्यास स्वार्जतावर जेो हक्क दिला आहे ती वरील कारणाकरितां नाहीं. मिळविणाराने किंवा त्याच्या औरंस संततीर्ने त्याचा उपभोग घ्यावा, पण या दोहोंच्या अभावी दुस-या कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा त्यावर सारखाच हक्क आहे, इतकेच नव्हे तर एकाच मनुष्याच्या हातीं ती इस्टेट पडल्यास तिन्वा वाईट व्यय होण्याचा जास्त संभव आहे. यासाठी औरस संततीच्या अभावीं एखाद्याची इस्टेट समाजास गेल्यासच त्वांत लोकांचे हित आहे. प्राचीनकाळीं जेव्हां समाजास अशी इस्टेट देतां येत नव्हती, त्याकाळी दत्तकाचा प्रचार पडला; पण आतां त्याची काहीं जरूर राहिली नाही. उलट त्यापासून द्रव्यसंचय थेोड्याशा लोकांतच राहिलाजाऊन एकंदर समाजाचे नुकसान होत आहे. इतर सर्व गोष्टीप्रमाणेच सर्वथैव निदाँष अशी कोणतीच समाजरचना सांपडावयाची नाही. तथापि लोकस्थिति मनांत आणतां, अमुक एक समाजास अमुक समाजरचना विशेष फायदेशीर होईल,इतके सांगणें काही कठीण नाहीं.विभक्तावस्था व आवभक्तावस्था या दोन्हीही प्रत्येकी समाजास एक विशेष स्थितींत श्रेयस्कर होतात. पैकीं जॉपर्यंत द्रव्याचा खरा उपयोग लोकांस समजूं लागला नाही व जेोपर्यंत समाजाच्या कल्याणाकरितां द्रव्यसंचय करण्याची बुद्ध बहुतेकांस होत नाहीं, तोंपर्यंत मार्गे सांगितल्याप्रमाणेच समाजाची अविभक्तावस्था म्हणजे जींत प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वार्जतावर पूर्ण हक्क असतो, तीच एकंदर समाजास हितावह आहे. असा हक्क दिल्याने कमजास्त प्रयत्न, मितव्यय, बुद्धि वगैरे कारणांनीं समाजांत द्रव्याचा विषम विभाग हा होणारच, व जौंपर्यंत स्वार्जितावर प्रत्येक मनुष्याचा पूर्ण हक्क आपण कबूल करितो,तोपर्यंत समाजांतील एक अतिशय श्रीमान् व एक अतिशय दरिद्री हा भेद आपणास अजीबात कधीही काढून टाकतां येणार नाही. तरी स्वार्जितावर हा अधिकार दिल्याने समाजांत हा जो दोष दृष्टोत्पत्तीस येतो, तो काढून टाकण्याचा जव्हां जेव्हां योग्य प्रसंग येईल, तेव्हा तेव्हां तो फुकट दवडितां कामा नये. दत्तक घेण्याची वेळ म्हणजे अशाच तव्हेचा एक प्रसंग होय. यद्यपि द्रव्यसंचय करण्यास प्रत्येक मनुष्यास प्रेरणा व्हावी म्हणून स्वार्जितावर त्यास कायद्याने पूर्ण हक्क दिला आहे, तथापि एखाद्यास श्रमावांचून पुष्कळ द्रव्य सांपडल्यास त्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाहीं. उद्यां एखाद्यास सहज जमिनींत मोहोरांचा इंडा सांपडल्यावर सरकार म्हणजे समाजाचा प्रतिनिधी त्यावर त्या मनुष्याचा पूर्ण हक्क कबूल करील काय ? नाहीं. तर त्या भनुष्यानें ही गोष्ट प्रसिद्ध केली, या त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्वास कांहीं भाग देऊन बाकी सरकार आपल्या तिजेरीत नेईल, म्हणजे तो पैसा सरकारमार्फत (येथे सरकार लोकांचे