पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९४ लो० टिळकांचे केसरीतील लेख.

  • मराठी भाषेची लेखनपद्धति.

नंबर १. या विषयावर अलीकडे वर्तमानपत्रांतून चर्चा होऊं लागली आहे, हें एक सुचिन्ह होय. रा. रा. साने, गोडबोले आणि हातवळणे या महाराष्ट्र मुनित्रयांचा वरील विषयांवर ग्रंथ प्रसिद्ध होऊन आज सुमारें ४ वर्षे झाली. परंतु त्यासंबंधानें आतांपर्यंत वर्तमानपत्रातून फारशी चची झालेली आम्हांस माहीत नाहीं. ग्रंथकारांनीं ब-याच विद्वान् लोकाचे अभिप्राय मागवून ते पुस्तकांतही प्रसिद्ध केलेले आहेत; परंतु त्याच्या पलीकडे या ग्रंथांतील प्रमेय किंवा सिद्धान्त यांजवर विशेष चची झालेली दिसत नाहीं. आज हा विषय उपस्थित होण्याचे कारण कीं, वरील तीन ग्रंथकारांपैकीं रा. सा. साने हे हल्लीं सरकारनें नेमलेल्या बुककमिटीचे मेंबर असून सदर कमिटीनें महाराष्ट्र भाषेची नवीन होणारीं क्रमिक पुस्तके कोणत्या लेखनपद्धतीने छापावी हा विषय हाती घेतला आहे; व कित्येकास अशी भौति पडली आहे कीं, पूर्वापार चालत आलली जी मराठीची लेखनपद्धति आहे तीस अजिबात फाटा मिळून यापुढे कांहीं तरी वेडीविद्री लेखनपद्धति लहान पोरात शिकविली जाऊन बिचाया मराठी भाषेचे पुढच्या पिढींत मातेरें होऊन जाणार आहे. ही भीति खरी असेल तर या योजलेल्या क्रमाविरुद्ध एव्हांपासूनच ओरड करून तो अमलात येऊं न देण्याची खटपट करणें अवश्य आहे. इंग्रजसरकारचे राज्य आमच्यावर झालें म्हणून ते आमच्या भार्षेतील सर्व -हस्वदीर्घ वेलांट्यावर झालेंच पाहिजे असा काहीं कायदा नाहीं अगर सरकारची इच्छाही नाहीं. भाषेचे शास्ते निराळेच आहेत, आणि जर कदाचित् कांहीं लोक अभिमानाने किंवा अन्यकारणान सरकारचे साहाय्य घेऊन आपल्या मताचा शिरजेोरपणा भाषेवर चालवू पाहतील, तर प्रतिकार करणें हें आमचे कर्तव्य होय. प्रश्न एवढाच कीं, अशा प्रकारचा क्रम हल्लीं सुरूं झाला आहे की काय, अथवा होण्याची भीति आहे की काय ? असेल तर तिचा प्रतिकार करण्यास आम्ही उद्युक्त झाले पाहिजे, नसेल तर त्याचे खरै स्वरूप काय हें लोकांपुढे मांडलें पाहिजे. “ शुद्ध कसे लिहावें आणि शुद्ध कसे बोलावें, हें व्याकरण शिकल्यानें समजत ’ असा व्याकरणशास्त्राचा उपयोग आज कित्येक पिढ्या आम्ही ऐकत व पढत आलो आहों. * येन धौता गिरः पुंसां विमलै: शब्दवारिभिः । तमश्वाज्ञानजं भिन्ने तस्मै पाणिनये नमः ? ॥ हा लेाक तर सर्वप्रसिद्ध आहे, अर्थात् वैय्याकरण हे भाषेचे शास्ते होत हे मत फार प्राचीन असून त्यासंबंधानें कोणाचाही मतभेद नाहीं. तथापि त्याची भाषेवर असलेली सत्ता आनेयंत्रित नाहीं हैं

  • { केसरी, ता. १२ जुलै १९०४).