पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/408

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ३९३ झाला असता असें आम्हांस वाटत नाहीं. किंबहुना फग्र्युसन कॉलेजचे ते प्रिन्सिपाल आहत म्हणून तो जितका कडक यावयास पाहिजे तितका आला नाहीं अशी आमची समजूत आहे. रंगलर झाल्याने धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार मिळतो असें आम्हांस वाटत नाहीं. गणिताप्रमाणेच धर्म हे एक स्वतंत्र शास्र आहे व त्याला एक विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तींची आवश्यकता असून अध्ययन, ग्रंथावलेकिन आणि मनन याचीही गणितशास्राइतकी किबहुना अधिक आवश्यकता आहे. ती योग्यता प्रि. परांजपे यांनीं संपादन केलेली नाहीं, हें त्यांच्या लेखावरूनच उघड दिसत आहे; व ही स्थिति जोपर्यंत कायम आहे तोंपर्यंत मुख्य मुद्दा बाजूला ठेवून प्रि. परांजपे याच्या टीकाकारांवर कांहीं तरी खोटेनाटे आक्षेप घेऊन आपलें कार्य साधेल असें जर त्यांच्या मित्रास वाटत असेल तर ती चूक आहे. अशा प्रकारच्या वर्तनानें इष्ट हेतु सिद्धीस न जाता उलट मथळ्यांतील वचनाप्रमाणें शतधारेनें अधिकाधिक पतन होण्याचा मात्र संभव आहे, हें त्यांनी लक्षात ठेवावें, धर्मावर आक्षेप करण्यास आज रेंग्लर परांजपे हेच पुढे सरसावले असें नाहीं. याच्यापेक्षांही शतपट अधिक व्यापक बुद्धीच्या आणि विद्वतेच्या गृह्स्थानों हें काम हातात घेतलेलें होते व त्याच्या तडाख्यातूनही जर हिंदुधर्माची उदात्त तत्त्वें अद्याप उज्ज्वल रीतीने कायम राहिली आहेत तर रँग्लर पराजपे याच्या टीकेनें त्यांचे काहीं वाकडे होईल असें आम्हास वाटत नाहीं. परंतु स्थानमहात्म्यानें मि. पराजपे याच्या म्हणण्यास महत्त्व मिळण्याचा जो संभव आहे तो राहूं नये एवढयाकरितां त्यांच्या विचारसरणीविरुद्ध लिहून तिचा पूर्वापार इतिहास देणेही भाग पडलें, त्यास इलाज नाहीं. हा विरुद्ध लेख सौम्य शब्दानीं लिहावयास पाहिजे होता असें कित्येकाचे म्हणणें आहे; पण आम्हास हें मत कधींच ग्राह्य वाटलें नाहीं. कांटा काढणें तो काट्यानेंच काढला पाहिजे, ती चिंधीच्या बोळ्यार्ने निघत नाहीं. प्रि. परांजपे याचा इंग्रजी लेख वाचला तर त्यांच्या विचारसरणीस कृत्रिम तीव्रता आणण्याचा प्रयत्न झाला आहे असें कोणासही आढळून येईल. अशा प्रकारचा प्रयत्न ज्याने करावयाचा त्यानें “ मी तुझ्या थोबाडीत मारली तरी त्याचा प्रतिकार तूं शब्दानेंच कर ' असे म्हणणें अगदीं गैरवाजवी आहे. विवेकभ्रष्ट होतो तो येथेच. ४९