पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. असमंजसपणाचे लक्षण होय. हिंदुधर्म म्हणजे वेडगळ समजुतीचा व आचारांचा भारा अशी जी प्रि. परांजपे याची समजूत आहे तीही वरल्या इतकीच अविचाराची होय. प्रि. परांजपे हे देहाहून आत्मा भिन्न मानतात कीं नाहीं, हें त्यांच्या इल्लीच्या लेखावरून चांगलेंसें व्यक्त नाहीं; तथापि त्याच्या लेखाच्या एकंदर झोकावरून ते आत्म्याचे देहाव्यतिरिक्त अस्तित्व मानीत असतील, असे दिसत नाहीं. अशा प्रकारच्या विचारांच्या मनुष्यास धर्म म्हणजे निवळ वेडगळ समजुतींचा भारा वाटणें साइजिक आहे व तसेंच प्रेि. पराजपे यांनी आपल्या लेखांत विधान केले आहे. नास्तिकाच्या दृष्टीनें हें विधान बरोबर आहे. परंतु हें मत चुकचेि आहे किंबहुना देशास घातुक आहे, असे म्हणणेही अगदीं यथार्थ व आवश्यक आहे. बहुतेक लोक आस्तिक म्हणून त्याच्या विरुद्ध मतें प्रतिपादन करणाच्या नास्तिकानें आपल्या आचरटपणास धैर्य ही सज्ञा द्यावयाची तर बहुतेक लोक डोळस आहेत म्हणून आंधळ्यानें आपल्या ज्ञानचक्षूची कां शिफारस करूं नये, हें आम्हास समजत नाही ! असो; इतकेंच झाले असतें तरी मि. परांजपे याच्या नास्तिक मताबद्दल आम्हांस कांही वाईट वाटलें नसतें. कारण चार्वाकादि नास्तिक वाद्याच्या मानाने पाहिले तर रेंगलर परांजपे हे अगदी यःकश्चित नास्तिक होत; व त्याच्या चुका दाखविण्याचे अगर खडण करण्याचेही कांहीं विशेष प्रयोजन नव्हतें. परंतु वर सागितल्याप्रमाणें महाराष्ट्रांत लोकाश्रयार्ने वाढलेल्या एका प्रमुख शिक्षणसंस्थेचे मुख्याध्यापक असलेल्या गृहस्थाच्या लेखणींतून जेव्हा वरील विचार बाहेर पडले तेव्हा * प्रासादशिखरस्थोऽपि इत्यादि वाक्यांची आम्हास सहज आठवण होऊन त्याप्रमाणे महाराष्ट्रातील लोकास इशारत देणें भाग पडले. जीव आणि परमेश्वर याचा संबंध काय, तो संबंध कायम राखण्याकरितां जीवाचे कर्तव्य कोणतें आणि जीवाची उन्नति होण्यास काय उपाय करावे, इत्यादि धर्माचे जे गहन विचार आहेत आणि ज्यांचे हिंदुधर्मग्रंथापेक्षां दुस-या कोणत्याही धर्मीच्या ग्रंथात अधिक उदात्त विवेचन केलेले आढळत नाही, ते धर्मविचार व तीं धर्मतत्त्वें यांचा प्रि. परांजपे यांच्या मनावर बिलकूल संस्कार झालेला नसल्यामुळे धर्म म्हणजे काहीं वेड्या समजुतीचा भारा यापलीकडे त्यांची समजूत गेलली नाहीं; आणि हा त्यांच्या मनाचा अह् नीलीग्रहाप्रमाणें बळकट झालेला असल्यामुळे त्यांनी आपले अप्रगल्भ व अपरिपक्व विचार जगापुढे माडण्यासें साहस केलें आहे. हाच त्यांचा लेख जर फग्र्युसन कॉलेजच्या म्यानजिंग बीडापुढे आला असता तर बोडीनें किंवा कौन्सिलनें त्यास संमति दिली असती, असें आम्हांस वाटत नाही. आणि एषढ्याचकरिता प्रिं. परांजपे याचा हा अल्लडपणा किंवा आचरटपणा दोषार्ह आहे असें आम्ही समजतों व वेळींच त्याचा कडक शब्दांनीं मिषेध करणे आमचे कर्तव्य मानतो. फग्र्युसन कॉलेजच्याएवजीं डेक्कन कॉलेजचे जर प्रि. पराजपे हे प्रिन्सिपाल असते तर आमचा पूर्वीचा लेख आहे त्यापेक्षा कमी कडक