पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/406

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ३९१ आहे. कॉलेजांतून बाहेर पडणारे पुष्कळ तरतरीत ग्रॅज्युएट आपल्या स्नह्याबरोबर होणाच्या वादविवादांत प्रि. परांजप्यांप्रमाणेच अद्वातद्वा बहकत असतात, हें आम्ही ऐकलें आहे व प्रत्यक्ष पाहिलैही आहे. पण या तरुण मंडळीच्या मतांचा सामान्य रीतीनें उल्लेख करून ती चुकीचीं आहेत, असे सांगण्यापलीकडे त्यासंबंधानें आम्हीं कधीही जास्त लिहिलेले नाही. आणि प्रि. परांजपे हे केवळ रेंग्लरच असते तर त्यासंबंधानेंही आम्हीं हाच क्रम आगेकारिला असता, परंतु हे विचार जेव्हा महाराष्ट्रातील लोकांच्या आश्रयानें निघालेल्या खाजगी कॉलेजच्या प्रिन्सिपालच्या तोडातून बाहेर पडले तेव्हा मात्र वर्तमानपत्रकर्ते या नात्यानं । आम्हांसही या आचारविचाराचा घातुकपणा उघडपणें लोकांपुढे मांडणें जरूर पडले. हें कर्तव्य बजावीत असताना ** रावसाहेब घोड्यावरून खालीं आले ” आणि ** गण्या घोड्यावरून पडला ' अशा प्रकारचा भेद केसरी कधीही करीत नाहीं, हें केसरीच्या वाचकांस तरी निदान सागावयास नकोच. प्रि. परांजपे हे जेव्हा रँग्लर होऊन आले तेव्हां त्याचे योग्य अभिनंदन केसरीकाराच्याच हातून झाले; आणि आतां ते जर घसरले तर * ते घोड्यावरून खालीं आल न म्हणतां घसरले किंवा पडले ? हेच शब्द त्याच्यासंबंधानें वापरणें हेंच केसरी आपलें कर्तव्य समजतो. मग याबद्दल केसरीकारांस कोणी निंदीत किंवा वंदोत. गुण गाण्यांत पुढे आणि दोष दाखविण्यात मार्गे, हे केसरीकाराचे व्रत नव्हे; आणि कै. रानडे याजवरील शेवटचा लेख ज्यानीं वाचला असेल त्यास या गोष्टीचा चागला प्रत्यय येईल. असेो; प्रि. पराजपे यांचे जे पांच सिद्धत वर दिले आहेत ते सर्वस्वी चुकीचे आहेत, असें आम्हीं वर सांगितलेंच आहे. धर्मशिक्षण राष्ट्रीयत्वाचे विघातक आहे ही विलक्षण कल्पना प्रि. परांजपे यांच्या डोक्यात घोळण्यास त्याच्या नास्तिकपणाखेरीज दुसरें काही एक कारण असार्वे, असें आम्हांस वाटत नाहीं. खिस्ती धर्माच्या अनेक शाखा इंग्लंडात असल्याने इंग्लंडच्या राष्ट्रीयत्वास जर धक्का येत नाहीं, जपानामध्यें हीच स्थिति जर आढळून येते आणि रशियामध्येही जर अद्याप असाच प्रकार आहे, तर हिंदुस्थानांतील धर्माच्या पोट शाखांनीं असे कोणतें पातक केले आहे की, त्यांस हा न्याय लागू पडू नये. हिंदुधर्मातील सर्व शाखांचे एकीकरण करण्याचे सामथ्यै वेदांत मतांत आहे, ही गोष्ट मार्मिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. पण प्रेि, परांजपे यांनीं त्यासंबंधानें कांहींच विचार केलला दिसत नाहीं. दुसरी गोष्ट अशी की, धर्मशिक्षण शाळांत न दिल्यानें हिंदु, मुसलमान, खिस्ती किंवा पारशी यांच्यामधील धर्मविरोध नाहींसा होईल अशी जी प्रेि. परांजपे यांची कल्पना आहे, ती अगदीं वेडेपणाची आहे. हिंदुधर्माइतका आग्रहशून्य धर्म दुसरा कोणताच नाहीं. ज्यानें त्यानें आपापल्या धर्मात राहून आत्म्याचे कल्याण करावें, असें हिंदु लोक समजतात; आणि असे आहे तर मग शाळांत हिंदुधर्म शिक्षण दिल्यानें राष्ट्रीयत्वाची हानि होईल, असे मानणें