पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८६ ली० टिळकांचे केसरींतील लेख. कॉलेजविरुद्ध ओरड करणे म्हणजे, * आपण मेलों आणि जग बुडालें, ’ असें म्हणण्यासारखेंच आहे. कॉलेजावरील आक्षपकांची दुसरी चूक म्हटली म्हणजे थिऑसफी आणि हिंदुधर्म यासंबधानें त्यांच्या मनात घोंटाळा आहे, ही होय. थिऑसफी म्हणजे हिंदुधर्म नव्हे व हिंदुघर्म म्हणजे थिऑसफी नव्हे, ही गोष्ट या गृहस्थांस बिलकुल माहीत नाहीसें दिसतें, थिऑसफी हा स्वतंत्र धर्म नाहीं. हिंदू, पारशी, मुसलमान, बौद्ध आणि खिस्ती, या सर्व धर्मीतील लोकानीं आपापल्या धर्मीप्रमाणें चालावें, परंतु एकमेकाचा द्वेष न करता सर्व धर्मीतील गूढ तत्त्वें एकच आहेत हे ओळखून बंधुत्वाचे नात्यानें वागावें अस थिऑसफी सांगते. थिऑसफी कोणासही आपली धर्म सोडण्यास सागत नाहीं किंवा त्याचा जो परंपरागत धर्म आहे, त्याऐवजीं दुसरा धर्म त्यास स्वीकारण्यासही सांगत नाहीं. अर्थात् थिऑसफी हा धमै नव्हे, सर्व धर्मीतील धर्माचे तत्व ओळखून प्रेमानें वागण्यास सागणारी तत्त्वज्ञाची सस्था आहे. आता या तत्त्वज्ञानात कांहीं गुप्त आणि गूढ (Occult and Myste) तत्वे आहेत; व ती सर्वच सर्वास मान्य होतील असें नाहीं. तथापि भिन्नधमांतील लोकामध्ये प्रेम वाढविण्याचा व प्रत्येक धर्मातील लोकास त्या त्या धमतिील रहस्य समजून देण्याचा थिऑसफीचा जेो हेतु आहे तो स्तुत्य आहे हें कोणीही कबूल. कांहीं थिऑसफीस्ट हिंदु आहेत, तर काही बौद्ध आहेत, आणि काहीं मुसलमान व पारशीही आहेत. बनारस येथील हिंदु कॉलेज थिऑसाफस्टानीं चालविलेले असतें, तरी ते * थिऑसफेिस्ट कॉलेजच ? नसून * हिंदु कॉलेज ? आहे, हा भेद लक्षात ठेवला पाहिजे. थिऑसफीचे कर्नल आल्कॉट व बिझाटबाई हे जे दोन मुख्य पुरस्कर्ते आहेत, त्यांपैकी कर्नल आल्कॉट याचा भर बौद्धधर्मीकडे व अॅनी बिझाट याचा भर हिंदुधर्मीकडे आहे हे सर्वश्रुत आहे. अर्थात् कर्नल आल्कॉट यानीं सीलोनात बौद्ध शाळा काढल्या आहेत आणि बिझाटबाईंनीं बनारसस हिंदु कॉलेज काढले आहे. थिऑसफीचे सामान्य मत कबूल असले तरी प्रत्येक थिऑसफेिस्ट कोणत्या तरी विशिष्ट धर्माचा अभिमानी असणे शक्य आहे व असतोही: आणि तो ज्या विशिष्ट धर्माचा अभिमानी असेल त्याप्रमाणें एखाद्या विशिष्ट धमांचे शिक्षण देण्यास तो पात्र किंवा अपात्र होतो. बिझांटबाई थिऑसफीस्ट खच्या, पण त्या धर्मनेिं हिंदू असल्यामुळे हिंदुधर्म लेोकास समजून देण्यास त्या पात्न आहेत; व त्यांच्या आगचीं हो पात्रता विद्वत्ता, वाचन आणि व्यासंग, यांनीं दृढतर झाली आहे. एवढी गोष्ट खरी कीं, त्या विदेशी आहेत; आणि वर सागितल्याप्रमाणें त्याच्या सर्व गुणावर विरजण पाडण्यास एवढी गोष्ट कित्यकांचे मर्ते पुरेशी आहे. पण आमचे तसें मत नाहीं; उलट आम्हांस असे वाटतें की, प्रो. मॅक्सम्यूलर, प्रो. डयूसन किंवा बिझांटबाई यांच्याकडून आमच्या धर्मास जें सर्टिफिकीट मिळत आहे, व आमच्या धर्मीतील तत्त्वांच्या प्रसारास