पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थिऑसफी आणि हिंदुधर्म. きくし、 पर्त अगदीं अलाध्य होय. ज्या कोणास या कॉलेजावर आक्षेप घेणें असेल त्यानें दिरचे पाचपंचवीस रुपये खर्च करून काशीस जावें आणि प्रत्यक्ष स्थानिक चौकशी करून मग तरी काय लिहावयाचे असेल तें लिहावें. हिंदु कॉलेजच्या बोर्डिगांत कशी व्यवस्था ठेवावी, हा प्रश्न जितका दिसतो तितका सोपा नाहीं. आणि तदर बोर्डिगावर उद्या जर भिषग्वर्य शंकरशास्री पदे यांचीच केोणी नेमणूक केली तरीही त्यांच्या हातून सर्वास समाधानकारक व्यवस्था लागेल कीं नाहीं, याचीही वानवाच आहे. हिंदुधर्मात शैव, वैष्णव, भागवत, गाणपत्य, वगैरे उपास्य-भेदानें झालेले इतके पंथ आहेत की, त्या सर्वोची सोय किंवा समाधान एका सेंट्रल हिंदु कॉलेजानें होणे अशक्य आहे. बंगाल्यातील ब्राह्मण मासे खाणार, काश्मिरी ब्राह्मण मास खाणार, पंचद्रविड दोन्ही निषिद्ध मानणार, नागर नागराच्याच हातचे जवणार, मद्रासी शैव मद्रासी वैष्णवाचे पंक्तीस बसणें हा निव्वळ अधर्म मानणार; आणि तसेच शूद्र-दृष्ट अन्न सर्व मद्रासभर ब्राह्मण लोक निषिद्ध समजणार, गुजराथेत व उत्तर हिंदुस्थानांतील काही ब्राह्मण शूद्राचे पाणी घेणार, तर इतर ब्राह्मण तेंच निषिद्ध मानणार; कोठे ब्राह्मणेतरानें पाण्यात भिजवून तुपात तळलेली पुरी ब्राह्मणास ग्राह्य तर केोठे चणेमुरमुर ग्राह्य, अशा प्रकारें देशभेदानें आणि ज्ञातिभदानें आचारविचार जर ठिकठिकाणीं भिन्न आहेत तर केोणत्याही हिंदु कॉलेजांत सर्व ब्राह्मणाची व्यवस्था प्रत्येक्ष ब्राह्मणाच्या देशाचाराप्रमाणे किंवा कुलाचाराप्रमाणें लावणे अशक्य आहे. सारासार विचार करून सर्वोस सामान्य नियम आधीं ठरविला पाहिजे आणि त्या नियमाप्रमाणें चालण्यास जे खुषी नसतील त्यांस आपापल्या आचाराप्रमाणे वागण्यास मोकळीक ठेवली पाहिजे. बोडिंगातील अंतव्र्यवस्था यापेक्षा दुस-या केोणत्याही तत्त्वावर ठेवतां यावयाची नाहीं. मग ती एखाद्या श्रोत्याच्या हातात असेो, शास्रयाचे हातांत असो किंवा अॅनीबिझाटबाईचे हाती असेो. हिंदु कॉलेजच्या बोडिंगावर आक्षप घेणारानी ह्या गोष्टीचा विचार केला नाहींसें दिसतें. एका-प्रांतातील ब्राह्मण मांस किंवा मासे खातात म्हणून सर्वास ते खावयास लावीत नाहीत; इतर्केच नव्हे तर मांसाशन, मत्स्याशन, मद्यपान, वगैरे शास्रनिषिद्ध आचार हिंदु कॉलेजाचे बोडींगात नाहीत. सर्वास सामान्य म्हणून जे काय काढले आहेत, ते सर्वोस मान्य होण्यासारखे आहेत. एवढे खरें की, त्यात मैद्रासी शैवाचे शैवत्व नाहीं, किंवा बंगाली ब्राह्मणाचे वंगीयत्वही नाही. तथापि इंग्लंडांत ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी एस्टाब्लशूड--चर्चप्रमाणें धर्मव्यवस्था ठेवून खिस्तधर्मीयांच्या इतर पोटजातीस आपापल्या मताप्रमाणे चालण्याची मोकळीक असते, तशी व्यवस्था हिंदु कॉलेजांत ठेवलेली आहे, आणि अशी सवड जॉपर्यंत तेथे आहे तोपर्यंत कोणा एका विशिष्ट जातींतील लोकांनीं \く