पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

もく9 लो० टिळकांचे केसरींतील लेख काम ज्या बाई करीत आहेत, त्यांच्या सद्धेतूबद्दल शंका घेणें निदान सबळ पुराव्याखेरीज शंका घेणें माणुसकीचे लक्षण नव्हे. पंडिता रमाबाईप्रमाणें परधर्माचा स्वीकार करून, हिंदु विद्याथ्याँस हिंदु राखीन, असें बिझांटबाई म्हणत नाहीत. उलट जन्मसिद्ध धर्माचा त्याग करून व तद्धर्मीयांची निंदा पत्करून हा मार्ग बिझांटबाईंनी अंगीकारीला आहे. तेव्हां त्या केवळ परदेशस्थ आहेत एवढ्याचकरितां त्यांच्यावर तुटून पडणें योग्य नाहीं. परकीयास आमच्या धर्माचे आम्ही गुरु करूं नये, हें देशाभिमानाचे व धर्माभिमानाचे तत्त्व आम्हांस अमान्य नाहीं. परंतु एवढयाचकरितां आमच्या धर्मासंबंधानें जर कोणी आम्हांस सदुपदेश करीत असला, तर तो सर्वथैव त्याज्य आहे, असें आम्ही म्हणू शकत नाहीं. हिंदु कॉलेजांत बिझांटबाई हिंदुधर्म शिकवितात एवढयाकरतांच जर त्यांत कोणी जात नसेल तर त्यानें खुशाल जाऊं नये; त्यास आमचे कांहीं एक म्हणणें नाहीं. उलट तो आपल्या पायावर उभा राहण्यास पाहतेो, याबद्दल आम्ही त्याचे अभिनंदन करूं. पण स्वतः कांहीं करावयाचे नाहीं आणि चांगल्या बुद्धीनें इतरांनीं चालविलेल्या गाड्यास खीळ घालावयाची, हा मात्र क्रम आम्हांस बिलकुल पसंत नाहीं; अलीगडचे मुसलमानी कॉलेज ज्याप्रमाणें मुसलमानांनीं ( इंग्रजांच्या साह्यानें) चालविले आहे, तसे किंवा सर्वथैव हिंदूंनी चालावलेले हिंदू कॉलेज जर केोणी काढील तर सर्व हिंदू विद्याथ्र्यानीं तिकडेच जार्वे, अशी त्यांस आम्ही शिफारस करूं. त्याच्या अभावीं सेंट्रल हिंदू कॉलेज बरेंच उपयुक्त आहे, असे म्हणण्यास आम्हास कांहीं एक शंका वाटत नाहीं. मिशनरी कॉलेजात हिंदूंनाँ आपली मुलें पाठविण्याची किंवा धर्मशिक्षणाचा ज्या संस्थांतून पूर्ण अभाव आहे, किंबहुना शास्रीय नास्तिक मताचे ज्या ठिकाणीं अप्रत्यक्ष वर्चस्व आहे, अशा कॉलेजांत हिंदु विद्यार्थी पाठविण्यापेक्षां सेंटूल हिंदू कॉलेजांत पाठविणें शतपट अधिक श्रेयस्कर होय, अशी आमची समजूत आहे, व त्याच समजुतीनें गेल्या खेपेचा लेख लिहिलेला आहे. सेंटूल हिंदु कॉलेजावरील महाराष्ट्रातील आक्षेपकाची पहिली मोठी चूक ही होय कीं, त्यांपैकी एकानेंही सदर कॉलेजांतील अंतव्र्यवस्था प्रत्यक्ष पाहिली नाहीं, अथवा विश्वसनीय माणसाकडून चौकशी करविली नाहीं. महाराष्ट्रांतील मुलें या कॉलेजांत बहुतेक नाहींत म्हटले तरी चालेल. तेव्हां वस्तुत: पहातां आम्हांस या कॉलेजसंबंधानें चर्चा करण्याचा अधिकार ही एक हिंदु लोकांची सामान्य संस्था आहे, यापेक्षां जास्त पोंचत नाहीं. तसेंच जे हिंदु विद्यार्थी या कॉलेजात आहेत, त्यांचीही कांहीं तक्रार अद्याप बाहेर पडलेली नाहीं. एका पंडितानें * पायोनियर ' पत्रांत प्रसिद्ध केलल्या लेखावरून आज एकाएकीं जागृत होऊन अॅनी बिझांटबाई विदेशी आहे, एवढ्याचकरतां ज्यांचे मन पूर्वीपासूनच तिजविषयीं साशंक होते ती मंडळी आतां सनातन धर्माच्या सबबीवर कॉलेजावर आक्षेप घेण्यास पुढे सरसावली आहे. ही त-हा आमच्या