पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/398

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थिऑसफी आणि हिंदुधर्म. ३८३ इंग्रजी शिकणारांची भरती अधिक झाल्यानें इंग्रजी शिक्षण आणि तेंही व्यावहारिक इंग्रजी शिक्षण हेंच कायतें मनुष्याचे सर्वस्व आहे की काय ? असा प्रश्न सहजच उपस्थित होऊँ लागला आहे; आणि ही विचारक्रांति दृढ होण्यास अलीकडे कित्येक वर्षे हिंदु धर्माची व हिंदुधर्म ग्रंथांची जी चची होत आहे तीही कारणीभूत झाली आहे. इंग्रजी शिकलेल्यापैकीं पूर्वीच्या पिढीतील कांहीं लोकांवर या विचारक्रांतीचा कदाचित् संस्कार झालेला नसेल. पण तेवढ्याकरितां या विचारक्रांतीची उपक्षा करून सुधारणा करण्याचा सबगोलंकार मार्ग सोडून न देण्याचा आग्रह धरणें आमच्या मतें अगदीं वेडेपणाचे आहे. इंग्रजी शिकलेला मनुष्य सर्वज्ञ नाहीं. चुकीच्या शिक्षणानें त्याच्या विचारांची दिशा भकलेली होती, असे आतां ब-याच लोकांच्या नजरेस येऊ लागले आहे; व आमच्या समाजांतील पुढा-यांस जर काहीं देशकार्य करावयाचे असेल तर तें या समजुतीकडे दुर्लक्ष करून कधीही व्हावयाचे नाहीं. admammmessamensz

  • थिऑसफी आणि हिंदुधर्म

गेल्या खेपेस आम्ही * सेंटूल हिंदु कॉलेज आणि त्यावरील आक्षेप ’ या मथळ्याखालीं जेो लेख लिहिला होता, त्यासंबंधानें दोन तीन पत्रे या आठवड्यांत आमच्याकडे आली आहेत; व तीं सर्व आमच्या लेखाच्या विरुद्ध असून आम्हीं हिंदु कॉलेजचे तर्फेने लेख लिहिला, याबद्दल या पत्रकारांस आमची कींव येत आहे.हीं पत्रे सबंध प्रसिद्ध करणे म्हणजे एक प्रकारच्या गैरसमजाचे व अज्ञानाचे प्रदर्शन करणे होय. असे करणें कोणासही फायदशार नाहीं. करतां या लेखांतील मुख्य मुद्दयांचा विचार करून यासंबंधानें आमचे काय म्हणणें आहे, तें आज येथे थेोडक्यांत देण्याचा आमचा विचार आहे. एवढ्यानें जर कोणाचा गैरसमज दूर होणार नाहीं, तर त्यानें प्रत्यक्ष बनारस येथे जाऊन आपली समजूत करून घ्यावी. परंतु प्रत्यक्ष माहिती नसतां एखाद्या ‘पंडिता'च्या वचनावर विश्वास ठेवून विनाकारण कुतकै काढीत बसूं नये, एवढीच आमची स्यांस विनंति आहे. आम्ही स्वत: थिअॅसिफिस्ट नाहीं, हें गेल्याच अंकीं आम्हीं कळविले आहे. करतां थिऑसफिच्या अभिमानानें आम्ही कांहीं तरी लिहितों हें म्हणणें अत्यंत चुकीचे होय. तसेच अॅनी बिझांटबाई जातीनें हिंदु नसल्या तरी धर्मार्ने हिंदु झालेल्या आहेत. तेव्हां त्यांचे हेतूंबद्दल संशय घेण्यास फारच सबळ पुरावा पाहिजे, हें सर्वानीं लक्षांत ठेवावें. धर्मातर करणें ही कांहीं सोपी गोष्ट नव्हे, आणि त्यांतूनही जन्मसिद्ध धर्मास टाकून स्वीकृत केलेल्या अन्य धर्माचे समर्थन व पुरस्कार करणे, हें काम तर अधिकच कठीण आहे. अर्थात हें सर्व

  • { केसरी, ता. སྡེ༢-3-༢༢༠༦ )