पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

もくも लो० टिळकांचे केसरींतील लेख कोणतीही समाजसुधारणा करणें झाल्यास हें राष्ट्रीयत्वाचे धोरण लक्षांत ठेवूनच झाली पाहिजे. परंतु वर सांगितल्याप्रमाणें इंग्रजी शिकलेले विद्वान् अगदीं एकांगी पडल्यामुळे ते आणि लोक यामधील फाटाफूट अधिकाधिकच वाढत चालली आहे. जुने शास्री लोक अगदीं एकांगी म्हणून त्यांस आम्ही नांवें ठेवितों, पण नवीन इंग्रजी पद्धतीनें तयार झालेले विद्वान्ही एकांगी कोठे नाहीत ? शास्कयांस नवीन परिस्थिति कळत नाहीं तर इंग्रजी शिकलेल्या विद्वानांस धर्मश्रद्धा किंवा धर्माबद्दल कळकळ व लोकांत मिळून मिसळून राहून त्यांच्याकरितां एकनिष्ठपणानें उद्योग करण्याची बुद्धि, हीं बिलकूल अवगत नसतात. समाजसुधारणबद्दल नुसत्या बडबडीपेक्षां काहीं होत नाहीं, यातील इंगित हेंच होय; आणि हल्लींच्या शिक्षणक्रमांत कांहीं फरक झाल्याखेरीज किंवा दुसच्या रीतीनें त्याला कांहीं पुरवणी जेोडल्याखेरीज ही स्थिति कधीही सुधारावयाची नाहीं. धमाकरितां संकट सोसणें किंवा प्रसंगविशेषीं त्याच्या प्रसाराकरितां किंवा रक्षणाकरितां जीव देणें याही गोष्टीचा धर्मश्रद्धेत अंतर्भाव होतो, व त्यामुळे खिस्ती मिशनरी लोक इंग्रजी विद्येत पारंगत असतांही शेतकरी, कुणबी, माळी वगैरे गरीब प्रतीच्या लोकांतही मिळूनमिसळून आपल्या धर्माचा प्रसार करण्यास उद्युक्त झालेले आढळून येतात. आमच्या सुधारकवर्गात एक तरी इसम अशा प्रकारें उद्योग करीत असलेला आढळून येत आहे काय ? नाहीं, उलट गरीब लोकांत जाऊन त्यांच्याशीं भाषण करणें यांत एक प्रकारचा हलकपणा आहे, अशी पुष्कळांची समजूत आहे. अशा लोकांकडून सुधारणा तरी काय होणार आणि देशकार्य तरी कोणचे घडणार ? इंग्रजी शिकलेल्या लोकांत जेो उणेपणा किंवा एकांगीपणा आहे तो हाच होय. लोकांकरिता खरी कळकळ, लोकांमध्यें मिळूनमिसळून त्यांच्या उन्नतीकरिता स्वार्थत्यागपूर्वक सतत उद्योग करण्याची इच्छा आणि स्वधर्मीवर निष्ठा ठेवून तो कायम ठेवण्याची बुद्धि, हे गुण आमच्या इंग्रजी शिकलेल्या वर्गाच्या अगांत अद्याप आलेले नाहीत. हा त्यांचा दोष नाहीं, शिक्षणाचा आहे हें खरें; पण कसैही असले तरी त्यामुळे जो एकागीपणा या वर्गात आढळून येतो तो दूर झाल्याखेरीज खरी सुधारणा त्यांच्या हातून कधीही व्हावयाची नाहीं. हे लोक जुन्या शास्रीवर्गास नावें ठेवतात खर; पण यांची सुधारणेची दिशाही शास्री लोकांच्या समजुतीप्रमाणेच एकांगी किंवा डोळ्यानै आधळी झालेली आहे; व हा आंधळेपणा दूर करण्याचा प्रयत्न करणे, ही पहिली सुधारणा होय. तो दूर झाला म्हणजे इंग्रजी शिकलेल्या विद्वान् लोकांचा वर्ग समाजाचा पुढारीपणा घेण्यास खरोखर पात्र होईल, एरव्ही होणार नाहीं;हेंच काय तें मिसेस अॅनि बिझांट व प्रो. रंगाचार्य यांचे म्हणणे आहे.हें सुधारकवर्गास सकृद्दर्शनीं कडू वाटेल खरें, पण तेंच परिणामीं हितकारक आहे असा नीट विचार केला असतां त्यांची खात्री होईल, अशी आम्हांस आशा आहे. बी. ए. म्हणजे कांहीं अपूर्व चीज आहे असे वाटण्याचे दिवस आतां राहिलेले नाहीत. कालमानानें