नाहीं. दिवाणसाहेब सर कृष्णमूर्ति यांनी त्यांच्या केलेल्या कानउघाडणी- वरून व पंडिताबाईच्या पाघळलेल्या पांडित्याचे श्रोत्यांनी 6 'हुयों 'च्या द्वारानें केलेल्या स्वागतावरून त्यांच्या या पवित्र कामास फार अडचणी येतील असें दिसतें, शिवाय हिंदु कुटुंबांतील ' पडद्यावर १ लक्ष तरुण स्त्रियांचा तांडा सोडून देण्याचा आपला हा बेत त्यांनी भरसभेत सांगितल्याप्रमाणें मेंढीचे कातडे पांघरून येणाऱ्या या मायावी वाघिणीस म्हैसुरांतील लोक ' पडद्या' चे आंत घुसूं देतील किंवा नाहीं, याचीही वानवाच आहे. पंडिताबाईच्या वरील बाष्कळ कोटिक्रमावर उत्तर देतां येणार नाहीं असे नाहीं. त्यांच्या ज्या 'विचारी मना 'स हिंदु पुराणांतील सप्तसमुद्र व पंचगव्य-प्राय- श्चित दिसले त्यांच्या आटोक्यांतून निसटून गेलेल्या बायबलांतील पोरकट अशा कथा, मतें, तत्त्वज्ञान, जगदुत्पत्ति, वगैरे भाग कोणासही दाखवितां येतील. पण एवढा खटाटोप करण्याची आम्हांस जरूर दिसत नाहीं; कारण ज्या मनास पंच- गव्य थोताड वाटतें पण बासिस्मोदक पवित्र वाटतें तें ' विचारी' म्हणण्यापेक्षां आंधळे किंवा दुराग्रहीच म्हटले पाहिजे, रमाबाईस हिंदूंचे कांहींच आवडत नाही हॅू उघड आहे; व त्यांनीं आतां सर्वस्वी हिंदुत्वावर पाणी सोडलेंस आहे. तर त्यस आमची शेवटची एकच सूचना आहे कीं, हिदुत्वाचा जो एक कलंक त्यांच्या नांवाचे मागे 'पंडिता' पदवीरूपानें लागला आहे तो नाहींसा करून तेथे त्यांनी 'रेव्हरंडा ' हैं पवित्र उपपद धारण करावे.
गेल्या खेपेस हिंदुत्व राखून किंवा हिंदुत्वाचा पाया ठेवून सामाजिक सुधारणा करावयाची म्हणजे काय याचा अर्थ काही उदाहरणे देऊन आम्हीं सांगितला आहे. या उदाहरणापैकी सर्वच आम्हांस ग्राह्य आहेत अशी जर त्यावरून कोणाची समजूत झाली असेल तर ती अगदीं चुकीची आहे. व्यवहार दृष्ट्या इष्ट हेतु एक असाही तो साधण्यास धर्मदृष्टया निरनिराळ्या रीतीचे उपाय असणे शक्य आहे एवढे दाखविण्याकरितांच ती उदाहरणे घेतलेली होती व तेवढ्यापुरतीं तीं सम- क आहेत असे कोणासही कळून येईल. कित्येकांस हिंदुधर्मात पुढे झालेली अहिंसेची सुधारणा बरी वाटणार नाहीं तर कित्येकांस आर्यसमाजाचीही दिशा आवडणार नाहीं ? पण त्यामुळे आम्ही दिलेल्या दृष्टान्ताचे महत्त्व कमी होत नाहीं. आमचा समाज पुरातन असून तो पूर्वापार चालत आलेल्या कांहीं नियमांनी बद्ध झालेला आहे. हे सर्व नियम एकाच काली अस्तित्वांत आले आहेत असें नाहीं, तर देशकालानुरूप त्यांत फेरफार होऊन त्यांस हल्लींचे स्वरूप प्राप्त झाले आहे हे प्रस्तुतचे स्वरूप
* ( केसरी, ता. १९ - १-१९०४ )