Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंडिताबाईचें पांडित्य.

३७७

एका रात्रीत पावला तो एका दिवसांत सगळ्या हिंदुस्थानास ख्रिस्ती धर्मानुयायी कां करून टाकीत नाहीं ? अशा अर्थाचा पंडितेस एका हिंदूनें प्रश्न विचारला होता; तेव्हां त्यांनी असे करण ईश्वरास शक्य आहे, पण तो तसें कां करीत नाहीं त्याचे मनांत काय आहे हे मी कसे सांगू ? अ उत्तर दिलें ! पुनः प्रभू येशु जेव्हां त्यांस दर्शन देईल तेव्हां त्यांनी त्याजपासून या कोड्याचा उलगडा करून घ्यावा, अशी आमची पंडिताबाई सूचना आहे.
 आपले चुटपुटतें संस्कृत भाषेचे ज्ञान व ' विचारी मन याच्या रासा यनिक संगमापासून कोणत अमृततुल्य फळे निर्माण झाली याचे याप्रमार्णे वर्णन करून पंडिताबाईनी आपल्या ' कामगिरी ' चे कथन केलें. आपण स्वतः विधवा असल्यामुळे विधवाचें दुःख पाहून आपले अतः करण कळवळते. शारदासदनांतील पुष्कळ विधवांनीं जातिभेद झुगारून दिला आहे; कांहीं अजून जातिधर्माप्रमाणें वागत आहेत; त्यांना तेथें लिबरल एज्युकेशन ऊर्फ उदार शिक्षण दिलें जातें, व वाचनासाठी अगदी निवडक व उत्तम बुर्के मात्र देण्यात येतात. 'पवित्र शास्त्रा'- चे तर नेहमी वाचन होते. बायबल हें वाचनास फारच उत्तम पुस्तक आहे. बडे मुत्सद्दी व विद्वान् पुरुष जे जे झाले ते केवळ बायबलामुळे तसे झालेले असतात. 'माझ्या नीतिधैर्याची इमारत बायबलचे पायावर उभारलेली आहे. ' असे कै. न्या. रानडे यांनी आपले गुज पंडिताबाईंपाशीं सांगितलें ! तसेच न्या. चंदावरकर जज्ज ह्यांनी बायबलचें चांगलें अध्ययन केलें आहे; ' आज ते जसे झाले आहेत तसें बायबलनें त्यांस केलें आहे' असें पंडिताबाईनीं आपल्या श्रोत्यांस सांगितलें ! सर्व हिंदुस्थान एका दिवसांत नसले तरी थोड्या वर्षांतच ख्रिस्ती करून टाकतां येईल अशी पंडिताबाईस खात्री वाटत आहेसें दिसतें; आणि हें पवित्र काम तडीस नेण्यासाठी त्यांनी युक्तिही शोधून काढली आहे. हिंदुस्थानांत ५ लक्ष युरोपियन व युरेजियन तरुण स्त्रिया अशा आहेत कीं, त्यांस पवित्र कृत्य करून हिंदु स्त्रियांची उन्नति सहज करितां येईल. या ५ लक्ष- पैकीं नुसत्या १ लक्ष स्त्रियांनी बाहेर पडून अनुभविक माणसाचे देखरेखीखालीं मोहीम सुरू करावी; त्यांस लोकांची भाषा, चालीरीति व संवयी यांचे पूर्ण ज्ञानही आयतें आहेच; त्याच्या साह्यानें त्यांनी हिंदू कुटुंबांतील पडद्याचे मागें प्रवेश करावा; आणि तेथे सर्व जगापासून दूर राहिलेल्या स्त्रियांस आधी मैत्रिणी, मग सोबतिणी व शेवटीं ख्रिस्तीणी करून टाकावें म्हणजे झाले ! अशी पंडिता- बाईची अजब युक्ति आहे; व तशाच कांहींशा इराद्यानें त्या म्हैसूरांत गेल्या आहेत. म्हैसूरच्या खानेसुमारीच्या रिपोर्टवरून कीं काय जाणे, पंडिताबाईनी असे गणित केलें आहे कीं म्हैसूर संस्थानांत हजारों विधवा असून त्यांपैकी ४००० तर निव्वळ अर्भके आहेत, व तीं प्रभु येशूचे कळपांत शोभतील अश कोवळी कोकरे आहेत. परंतु त्यांचा हेतु कितपत तडीस जाईल हैं सांगतां येत
 ४७