Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७६
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

आणि हिंदुधर्म-ग्रंथांचे मंथन करून त्यांनी जे रहस्य काढून श्रोत्यांस अर्पण केलें आहे, त्यांच्या पूर्वीच्या लौकिकास कमीपणा आणणारे खचित नाहीं. बंगलोर येथे दिवाणबहादुर सर कृष्णमूर्ती यांचे अध्यक्षतेखालीं एक व्याख्यान झाले. त्यामध्ये पंडिताबाईनी ' आपले चरित्र व आपण केलेली कामगिरी ' यांचे मोठे मनोरं- क कथानक लाविलें होतें. आपल्या जुन्या चालीच्या व कर्मठ बापाने आप- णास थोडेबहुत संस्कृत कसे शिकविलें, व त्या तुटपुंज्या ( Smattering ) ज्ञानाचे साहाय्याने व ' विचारी मनाच्या मदतीने आपण सर्व हिंदुशास्त्रे, तत्त्व ग्रंथ व पुराणग्रंथ यांचें ओलोडन करें केलें, त्या अध्ययनामध्ये आपणास कस- कसे जबरदस्त संशय आले. व शेवटीं बायबलाने ' भिद्यते हृदयग्रंथिः च्छिद्यन्ते सर्व संशयाः ' अशी आपली स्थिति होऊन आपण प्रभूच्या चरणाचा कसा आश्रय केला याचे त्यांनी केलेले वर्णन फारच बहारीचे झाले आहे ! त्यांचा पति मरण पावल्यानंतर पंडिताबाईचा हिंदुसमाजाने फारच छळ व जाच केला; व त्यामुळे त्यांस हिंदुधर्माचीं बंधनें तटकन् तोडून टाकण्याची स्फूर्ति झाली; आणि हिंदुधर्मात न मिळणारे स्वातंत्र्य ख्रिस्तीधर्मात त्यास गवसल्यामुळे त्यांनी त्याची कास धरली ! हिंदु पुराणांतील सप्तसमुद्र व तीन खंडें, सात स्वर्ग व सप्तपाताल, गजमुख व अश्वमुख - देव-देवता, ग्रहणासंबंधाची व राहूकेतूंची कथा, शाळिग्रामपूजा ह्या थोतांडासंबंधानें त्यांस जबरदस्त सशय येऊं लागले; व ह्या संशयाची निवृत्ति करणारा हिंदुधर्मात कोणीच सद्गुरु त्यांस भेटला नाहीं. हिंदु- शास्त्रे स्त्रियांना पतीवाचून दैवत नाहीं असे लिहितात; विधवाना मोक्ष नाही व स्त्रिया ह्या पापाच्या पुतळ्या आहेत असें त्याचे मत आहे; स्त्रियानी पतीची सदैव गुलामगिरीच केली पाहिजे असाच हिंदुशास्त्रांचा इत्यर्थ आहे. प्रायश्चित्त म्हणजे निवळ थोतांड आहे; गाईच्या शरीरापासून निघालेल्या पांच द्रव्यांच्या पंचगव्याने पाप नाहीसे होते असे म्हणणे हा केवढा मूर्खपणा ! अशा प्रकारच्या अनेक संशयांनी पंडितेच्या 'विचारी मनास ' पछाडलें. अमक्या तमक्या देवाची पूजा करा किवा अमुक स्तोत्रे म्हणा, अथवा अमुक तीर्थास जा, असे जे जे परमे- श्वरप्राप्तीचे मार्ग हिंदुशास्त्राने सागितले ते ते पंडिताबाईंनी अनेक वर्षे केले; परंतु सर्व व्यर्थ. पण पुढे जेहां त्यांनी बायबलाचे अध्ययन करून व येशूचे वचनावर विश्वास ठेवून त्याची मनोभावें प्रार्थना केली तेव्हां तो प्रभू येशू आपल्या ह्या प्रिय भक्तिणीस एका रात्रीत पावला ! आणि त्याने सत्य काय आहे याचा त्यांस उप- देश केला ! ? व तो प्रभू अजूनही त्यांच्या प्रार्थना ऐकतो व त्यांस दर्शन देतो !!! त्यांच्याप्रमाणे दुसन्या कोणीही जर येशूची अशीच प्रचिती पाहिली तर तो त्यांसही पावेल व ते मागतील ते तो त्यांस देईल, असें पंडिताबाईंनी आपल्या श्रोत्यांस सांगितले; श्रीपांडुरंगाचें जनाबाईशीं जितके सलगीचें वर्तन होते तितकें प्रभू येशूचेंही जरी रमाबाईशी आहे तरी त्याने एक गोष्ट पंडिताबाईपासून लपवून ठेवलेली दिसतो. 'तुमचा जो प्रभू एवढा सर्व-शक्तिमान आहे. व जो तुम्हास