पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/389

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७४ लो० टिळकांचे केसरीतील लेख. सामाजिक बाबतींतील अधिकारही कांहीं विशिष्ट व्यक्तींच्या व संस्थांच्या ताब्यांत आहे; आणि या संस्था व व्यक्ति हिंदुशास्रांत सांगितलेल्या कांहीं नियमांनीं चाललेल्या आहेत. या व्यक्ति, सस्था किंवा शास्र यांच्याविरुद्ध उघड बडबड केल्यानें कांहीं फायदा नाहीं. तर ज्याप्रमाणे राजकीय बाबतांत आम्ही कॉस्टिटयूशनल किंवा कायदशीर चळवळ करतो तशी सामाजिक बाबतींतही शास्रोक्त चळवळ झाली पाहिजे. लूथरनें युरोपांत धर्मक्रांति केली म्हणून सुधारक आपल्या तर्फेचे एक मोठे उदाहरण देत असतात. परंतु जरा विचार केला असतां असें लक्षांत येईल कीं, लूथर हा बायबलवर पूर्ण विश्वास ठेवणारा श्रद्धावान् खिस्ती होता. आमच्या सुधारकांची तशी स्थिति नाही. हे केवळ उपयुक्तता-वादी आहेत, धर्मशील उपयुक्तता--वादी नाहीत. याचा परिणाम असा झाला आहे कीं, यांनीं प्रचलित केलेल्या सुधारणेस समाजांतील लोक विधर्मी समजतात. हल्लींच्या सुधारकांच्या वर्गात नाहीं म्हणावयास दिवाण बहादूर रघुनाथराव हे बहुधा एकटेच या दोषास पात्र नाहीत. पण त्यांचा व इतर सुधारकांचा लवकरच बेबनाव होऊन मद्रास येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या बैठकीसही ते जवळ कुंभकोणास राहात असतां गेले नाहीत. कै. न्या. रानडे हेही अखेरीस सामाजिक सुधारणेंत हिंदुत्व कायम राहिले पाहिजे, या मताकडे वळले होते. पण न्या. चेदावरकर याची स्थिति व मतें याहून फार भिन्न आहेत. मद्रासेस यंदाच्या सालीं जो विशेष घोंटाळा झाला तो यामुळेच झाला. प्रो. रंगाचार्य याचे असे म्हणणे आहे कीं, जुने शास्री व जुने पंडित हे ज्याप्रमाणें एकदेशीय असतात तसेंच नवीन इंग्रजी शिकलेले सुधारकही एकदेशीय असतात. शास्त्री व पंडित यांस नवी परिस्थिति माहित नसते, तर हल्लींच्या सुधारकास हिंदुधर्माचीं तत्त्वें माहीत नसतात. तेव्हां खरी सुधारणा घडवून आणण्यास शास्री व पंडित यांस नव्या परिस्थितीचे आणि नव्या सुशिक्षित वर्गास हिंदुधर्मातील तत्वाचे व परंपरेचे ज्ञान करून दिलें पाहिजे. असें झाल्याखेरीज दोघांचा मिलाफ व्हावयाचा नाहीं. दोघांतही एकेक प्रकारच्या शिक्षणाची उणीव आहे, व ती उणीव भरून काढणें हें खच्या सुधारकांचे कर्तव्य आहे. हिंदुधर्मातील तत्त्वे सुधारणेस प्रतिकूल आहेत असें नाहीं. तसे असतें तर आजपर्यंत हिंदुधर्मानें टिकावच धरला नसता व हिंदुराष्ट्रही कायम राहिलें नसतें. यासाठीं प्रेों. रंगाचार्य, व अॅनिबिझांटबाई वगैरे विचारी लोकांचे असें म्हणणें आहे कीं, समाजसुधारणा होणें ती हिंदुत्वाच्या पायावरच झाली पाहिजे; व ती अमलांत आणण्यास जुन्या व नव्या मिळून दोन्हीही वगीतील लोकांस त्या त्या वर्गाच्या मानानें जें जें अपुरतें आहे तें शिक्षण देऊन तयार केलें पाहिजे, धर्माच्या पायावर सुधारणा रचल्याखेरीज सुधारकांच्या आंगीं खरी कळकळ कधीही उत्पन्न व्हावयाची नाहीं. करितां अॅनिबिझांट यांनी आपल्या व्याख्यानांत सरतेशेवटीं असें सांगितले आहे कीं, एखाद्याच्या व्याख्यानास तुम्ही