पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुत्व आणि सुधारणा. ३७३ वरच्या जातींतील लोकांप्रमाणेच भगवत्प्राप्ताचे मार्ग खुले होऊन दोघांमधील सलोखा वाढविला पाहिजे; पोटजातींतील लोकांमध्ये बेटी व रोटीव्यवहार सुरू होऊन त्यांमधील भद उत्तरोत्तर कमी होत चालले पाहिजेत; आणि देशांतील एकदर सर्व जातींचा मेळ किंवा त्यामधील सलोखा जितका आधक वाढेल तितका आम्हांस पाहिजे आहे, असें प्रो. रंगाचार्य व अॅनी बिझांट या दोघानींही सांगितले आहे. एकाच बाबतींत काय तो थोडासा फरक आहे. तो हा कीं, उच्चप्रतीच्या हिंदुविधवानीं पुनर्विवाह करण्यापेक्षा व्रतस्थ राहून समाजाची सामाजिक उन्नति करण्याचा प्रयत्न करावा, असें बिझांटबाई म्हणतात; आणि सुधारकवर्ग त्यांनीं पुनर्विवाह करावा असे म्हणतात परंतु सामाजिक सुधारक आणि प्रेा. रंगाचार्य यांच्यामध्यें जो विरोध आहे तो एवढ्या भदाकरिताच आहे, असें नाही; वर सांगितल्याप्रमाणें या दोघाच्याही मागांत अंतर आहे. सामाजिक सुधारणेचा प्रश्न हल्लीं ज्या लोकानीं पुढे आणिलेला आहे, त्यांस हिंदुधर्माचा अमिमान नाहीं. हिंदुत्व म्हणून कांहीं विशिष्टपणा पाहिजे असें त्याचे म्हणणें नाहीं; व हिंदुधर्मातील तत्त्वें समजून घेण्याचा त्यांनी कधीं प्रयत्न केलेला नाहीं, असे प्रो. रंगाचार्य याचे म्हणणें आहे व ते खरेंही आहे. हा परिणाम इंग्रजी शाळांतून मिळत असलेल्या शिक्षणाचा आहे, ही गोष्ट प्रेो. रंगाचार्य व अॅनीबझांट यास कबूल आहे. पण त्याचे असे म्हणणें आहे कीं केवळ समाजाच्या चालीरीतींत अमुक अमुक फरक झाल म्हणजे सुधारणा होते असे नाहीं.कोणत्याही सुधारणेचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे विशिष्ट राष्ट्रीयत्वाचा अभिमान जागृत करणे हा होय. तो अभिमान आम्हीं कोणता धरावयाचा ? अर्थात् हिदुत्वाचा होय. आम्हाला धर्माची कांहीं एक परंपरा आहे, त्या परंपरंत जे ज्ञान आहे तें इतर धर्मीतील ज्ञानाच्या बरोबरीनें किंबहुना त्याहूनही श्रेष्ठ आहे, आणि ही परपरा जर आम्ही सोडून दिली तर आमचे असे म्हणण्यासारखे आम्हांस सामान्य बंधन कांहींच नाहीं, या गाष्टी आम्हीं नेहमीं लक्षात बाळगल्या पाहिजेत. सामाजिक परिषदेचे पुरस्कर्ते आणि प्रो. रंगाचार्य व बिझांटबाई यांच्यामधील खरा मतभेद जो आहे तो हाच आहे. कोणतीही सुधारणा अमलांत आणतांना समाजातील रूढ संप्रदायास अनुसरणाच्या लोकांचा अडथळा यावयाचाच तो हिंदुत्व--राखून सुधारणा करणाच्या लोकास यावयाचा नाहीं, असें प्रो. रंगाचार्य म्हणत नाहीत. कोणतीही नवी गोष्ट समाजांत प्रचलित करावयाची झाली म्हणजे तीस अडथळा हा येणारच. पण तो अडथळा काढून टाकण्याचेही दोघाचे मार्ग निरनिराळे आहेतः हिंदु, मुसलमान, खिस्ती व पारशी या सवांची एक सामाजिक परिषद भरून तींत सर्वानुमतें कांहीं ठराव मंजूर करणे व ते हव्या त्या रीतीनें अमलांत आणण्याचा प्रयत्न करणें, हा हल्लींच्या सामाजिक सुधारकांचा मार्ग होय. प्रोफेसर रंगाचार्य यांचे म्हणणें असे आहे कीं, हा मार्ग आयेोग्य आहे, राजकीय बाबतीत ज्याप्रमाणें सर्व अधिकार राजाच्या किंवा एखाद्या विशिष्ट संस्थेच्या ताब्यांत असतो तसा हिंदुसमाजांतील