पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे केसरींतील लेख. ही कबूल करील. दुसरें उदाहरण पाहिजे असल्यास बौद्ध या. यज्ञामध्यें पशूची हिंसा केल्यानें स्वर्गप्रासी होत नाहीं , आणि तेंच मत बहुतेक उपनिषदांतही ग्रथित केलेलें ताच्याऐवजीं ज्ञानयज्ञाचा प्रचार जो हिंदुस्थानांत सुरू झाला ,[ वेदांतमत प्रचारांत आल्यार्न झाला असें उघड दिसतें. मताचे प्राबल्य इतकं झाले आहे कीं, आतां पशुयज्ञ बहुतेक आहे असे म्हटले तरी चालेल. पशुयज्ञ बंद होण्याची ही सुधारणा २ बौद्ध आणि वेदान्ती असे दोन प्रकारचे लोक होते. दोघांचाही हेतु व; पण बौद्धांची सुधारणा हिंदुत्वाला सोडून झाली, आणि वेदांत्यांची सुधारणा हिंदुत्वाला धरून झाली. तिसरे उदाहरण जातिभदासेबंधाने ध्या. बैौद्धधर्मीत जातिभेद मानलेला नाहीं, आणि भागवतधर्मातही जातिभदाचे महत्त्व कमी आहे. तथापि भागवतधर्मीची सुधारणा हिंदुत्वाला धरून आहे, आणि बौद्धांची हिंदुत्वाला धरून नाहीं ही गोष्ट निर्विवाद आहे. या तीन उदाहरणावरून एवढे लक्षांत येईल कीं, सुधारणेची बाब जरी एक असली तरी ती हिंदुत्व कायम ठेवून अमलांत आणतां येतें, आणि तें बुडवूनही अमलांत आणतां येते. शंकराचार्यास कित्येकांनीं * प्रच्छन्न बौद्ध ’ म्हटलेलें आहे; म्हणजे बौद्धांच्याच कांहीं मतांचे हिंदुत्वाच्या दृष्टीनें समर्थन करून आचार्यानीं त्यांचा स्वीकार केला आहे असें कित्येकांचे म्हणणें आहे, आणि तें एका दृष्टीनें खरेंही आहे. तथापि शंकराचार्य हें वैदिक मार्ग--प्रवर्तक व बुद्ध वैदिकमार्ग-ध्वंसक होता असें सर्वोचे मत आहे. सारांश, साध्य गोष्ट जरी एकच असली तरी ती साधण्याचे जे भिन्न भिन्न मार्ग आहेत त्याचे ज्याप्रमाणें एखादा मनुष्य अवलंबन करील त्याप्रमाणें तो मनुष्य निरनिराळ्या पंथांचा बनतेों एवढे निर्विवाद आहे. वर लिहिलेल्या उदाहरणांपेक्षांही जास्त व्यापक उदाहरण घेणें असल्यास तें परमेश्वरप्राप्तीचे ध्या. परमेश्वर प्राप्ति हा हेतु सर्वोचा सारखाच आहे; तथापि खिस्ती लोक बायबलांत सांगितलेल्या पंथानें, मुसलमान लोक कुराणांतील पंथानें, हिंदु लोक वैदिक मार्गानें आणि बौद्ध लोक बुद्धप्रणित मार्गानेंही प्राप्ति करून घेतात. इष्ट हेतु किंवा साध्य गोष्ठी एकच असूनही मार्गाच्या भदार्न भिन्न भिन्न पंथ कसे होतात हें एवढ्यावरून कळून येईल. मद्रासस हिंदुसभा स्थापन करण्याचे प्रो. रंगाचार्य यांनी जे हेतु लेिहिले आहेत, आणि सभेच्या दिवशीं अॅनी बिझांट यांचे जें व्याख्यान झालें त्यांत आम्हीं वर सांगितलेल्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आमच्या मुलांमुलींस धर्म आणि नीति यांचे चांगले शिक्षण मिळालें पाहिजे; बालविवाहाचा प्रघात मोडून सुश्रुतानें सांगितल्याप्रमाणे पुढील संतति सदृढ निपजली पाहिजे; निरनिराळ्या देशांत आमचे लोक जाऊन तेथून निरनिराळ्या विद्या त्यांनी संपादन करून आणल्या पाहिजेत; जातीद्वेष मोडून खालच्या जातींच्या लोकांस