पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुत्व आणि सुधारणा. संबंधुनें आपल्या भाषणांत बरीच वायफळ टीका के टीकेनें सुधारकपक्षासही कांहीं फायदा होईल असें आम्हां

  • हिंदुत्व आणि सुधारणा.

गेल्या खेपेस मद्रासस नव्या स्थापन झालेल्या * हिंदु अ९ उल्लेख करतांना समाजसुधारणचा पाया हिंदुधर्म असल्याखेरीज आम खरी सामाजिकसुधारणा होणें नाहीं, असें आम्ही म्हटले होते. याजवर एक कडून असे आक्षप आले आहेत कीं, “ काय हो, तुम्ही हिंदुत्व कायम राखून जी सुधारणा करणार तींत आणि हल्लींच्या सामाजिक परिषदेंत होत असलेल्या सुधारणेंत अंतर काय ? स्रोशिक्षण, बालविवाह, पोटशाखेतील अंतर्विवाह, समुद्रयात्रा, इत्यादि विषयासंबंधानें तुमच्या आणि हल्लींच्या सामाजिक सुधारकांच्या मतांत विशेषसा फरक दिसत नाहीं; आणि असा फरक जर नाहीं तर हल्लींच्या सामाजिक सुधारकांच्या विरुद्ध लिहून लोकांमध्ये त्यांच्याविषयीं अनादर तुम्ही कां उत्पन्न करतां ? हा प्रश्न ज्या गृहस्थांनीं विचारला आहे त्यांनीं तो चांगल्या हेतूनेंच विचारला आहे असें आम्ही गृहीत धरून चालतों. परंतु एवढे म्हणणें भाग आहे कीं, त्यांचा हेतु जरी चांगला असला तरी आमच्या आजपर्यंतच्या म्हणण्याचा त्यांनीं नीट विचार केलला दिसत नाहीं. समाज-सुधारणा नको असे म्हणणारे आम्ही नाहीं, ही गोष्ट अनेक प्रसंगीं कंठरवानें आम्ही सांगितलेली आहे. परंतु हल्लींच्या सुधारकांचे आणि आमचे मार्ग निराळे आहेत, आणि हे मार्ग ज्या कारणांनीं उपस्थित झालेले आहेत, ताँही भिन्न आहेत. या भदामुळे हल्लींच्या सुधारकात आणि आमच्यांत जेो विरोध उत्पन्न झालेला आहे तो बहुतेक अपरिहार्य आहे, असें आजपर्यंतच्या आमच्या लेखांवरून वाचकांस कळून आले असेल, सामाजिक परिषदेला आभप्रेत असलेल्या गोष्टी केवळ सुधारणा म्हणून ग्राह्य करण्यास आम्हीं तयार नाहीं, असे आम्हीं अनेकदां म्हटले आहे. या वाक्याचा अर्थ उघड आहे, तथापि ती आणखी स्पष्टपणे समजावयास पाहिजे असल्यास आपण एक उदाहरण घेऊं. मूर्तिपूजा असावी किंवा नसावी हा वाद स्वतंत्र आहे. त्याचा आज विचार कर्तव्य नाहीं. तथापि मूर्तिपूजा नके म्हणणारे जे लोक आहेत, त्यांत आर्यसमाजाचे लोक ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणें मुसलमान किंवा खिस्ती लोकही येतात. अर्थात् मूर्तिपूजानिषेध ही सुधारणा आर्यसमाजवाले, मुसलमान व खिस्ती या तिघांसही इष्ट आहे. पण या तिघांपैकीं पहिल्याची म्हणजे आर्यसमाजवाल्यांची सुधारणा हिंदुत्वाच्या पायावर आहे; आणि खिस्ती व मुसलमान यांची हिंदुधर्मविरुद्ध अथवा हिंदुत्वा

  • (केसरी ता. १२-१-१९०४)