स्थितीतल्या गृहस्थास आमच्या इकडील लोकांनीं तरी ज्ञातींत काय म्हणून घ्यावें ? मनुष्य स्वभाव हा येथून तेथून सारखा आहे. इंग्रज लोक ज्याप्रमाणे कोठेही गेले तरी आपला अभिमान ठेवून इंग्रजासारखेच राहातात, तसा तुम्ही हिंदु- स्वाचा अभिमान कायम व जागृत ठेवा, आणि मग हे सामाजिक प्रश्न लोकां- पुढे मांडा असे प्रोफेसर रंगाचार्य यांचे म्हणणे आहे. ज्यास हिंदुधर्माचा किंवा हिंदुत्वाचा अभिमान नाहीं त्यास हिंदु लोकांनी काय समाजसुधारणा करावी है सांगण्याचाही पण अधिकार नाहीं. हिंदुधर्मावर श्रद्धा नाहीं, प्रार्थनासमाजाच्या पीठावर उभे राहून शंकराचार्यास शिव्या देण्यास तयार, स्वतःच्याबुद्धीनें खरा वाटेल तो धर्म, बाकी सर्व सूट, अशी किंवा अशाच प्रकारची दुसरीं ज्यांची मते आहेत त्यांनी हिंदुधर्मात किंवा हिंदुसमा- जाच्या चालिरीतींत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न न करितां समाजाबाहेर राहून इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः या स्वानंदस्थितीच्या सुखाचा अनुभव घेत बसावें हेंच चांगलें. पन्नास वर्षापूर्वी जे समाजसुधारक बनले त्यांस त्यावेळी हिंदुधर्माची अगर त्यांतील ग्रंथांची माहिती नव्हती व त्यामुळे सुधारणेची भलतीच दिशा त्यांनी पतकरलेली होती; पण संस्कृत ज्ञानाच्या प्रसाराने आणि थिऑसाफिकल सोसायटीच्या उद्यो- गाने हिंदुधर्म, हिंदुआचार, हिंदुतत्त्वज्ञान यासंबंधानें लोकांस उत्तरोत्तर जास्त माहिती मिळून पूर्वीचे विचार आतां पालटत चालले आहेत; आणि पुष्कळ सुशिक्षित लोकांस असे वाटू लागले आहे कीं, हिंदुत्वाचा पाया जर आम्ही सोडून दिला तर आम्हांस आमचें असें कांहींच राहणार नाहीं. नव्या परिस्थितीला अनुरूप सामाजिक फेरफार कोणास नको आहेत असें नाहीं. पण जे फेरफार व्हावयाचे त्यामुळे हिंदुत्वाचा अभिमान नष्ट होऊं नये अशी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. ही खबरदारी सामाजिक परिषदेत घेतली जात नाहीं, किंबहुना ती या सुधारकवर्गास नको आहे हे उघड आहे; व याच मतभेदामुळें मद्रासेस हिंदु असोसिएशन ही नवी सभा यंदा स्थापन झाली आहे. मुंबई इलाख्यांत सामाजिक परिषदेच्या कामास जें कांहीं आजपर्यंत प्रतिकूल मत झालेले आहे तें एवढ्याकरितां आहे व केव्हांना केव्हा तरी मद्रासेस यंदा झाला तसा प्रकार व्हावयाचाच होता. याकरितां मद्रासेस जी नवी सभा स्थापन झाली आहे तिचें आम्ही अभिनंदन करितों. हल्लीच्या काली हिंदुधर्माबद्दल बऱ्याच सुशिक्षित लोकांत जी आस्था आढळून येते त्यावरून आम्हांस अशी उमेद आहे कीं, या नव्या सभेच्या तत्वांचाच अखेरीस जय होईल, कोणतीही सामाजिक सुधारणा झाली तरी ती स्वीकारतांना आम्ही आपले मूळ काय हे विसरता कामा नये; आणि तसे होईल तरच आमचे राष्ट्रीयत्व कायम राहून आम्ही प्रगतीच्या मार्गास लागू. सामाजिक सुधारणा राष्ट्रीयत्वास धरून पाहिजे असे जे आमचे म्हणणें आहे त्याचा अर्थ काय हैं यावरून व्यक्त होईल. न्या. चंदावरकर यांनी राष्ट्रीय सामाजिक सुधारणा म्हणजे काय हे आपणास कळत नाहीं असे म्हणून त्या-
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/385
Appearance