पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आहे. वेदांतमताप्रमाणें ते सृष्टीस केवळ आभास मानीत नाहीत, आणि सांख्याप्रमाणें प्रकृति पुरुषाच्या पलीकडे कांहीं नाहीं असेंही म्हणत नाहीत, हा त्यांचा आणि वेदांत आणि सांख्य थाच्या मतात मोठा फरक आहे, जीवासंबंधीं त्यांचे मत धर्मप्रवृत्तीस प्रतिकूल आहे खरें, व त्यामुळे केवळ खिस्ती मिशनरी लोकांचेच नव्हे तर कांहीं तत्त्वज्ञ मंडळीचेही आघात त्यांस सहन करावे लागले; व कांहीकांनीं तर त्यांची नास्तिक शिरोमणींतही गणना केली होती. पण आमच्या मर्ते असें करणें अगदीं गैर आहे. तत्त्वज्ञ मनुष्यार्ने जगाची पर्वा न ठेवून कांहीं उपयोगी नाहीं, किंबहुना तशी पर्वा न ठेविता आपणांस सूक्ष्म विचारातीं जें खरे दिसेल तेंच जगापुढे माडणें हें त्याचे कर्तव्य होय. आणि हें कर्तव्य जर स्पेन्सरसाहेबानीं पूर्णपणें बजावले तर त्याबद्दल त्यांस नांवें ठेवणें मूर्खपणाचे आहे. जीव देहाव्यतिरिक्त असू शकतो. यास स्पेन्सरसाहेबास जर पुरावा मिळत नाहीं अथवा मिळालेला पुरेसा वाटत नाहीं, तर तो पुढे कधीही मिळणार नाहीं अथवा पुरेसा होणार नाही असे समजणें चुकीचे होय. शिवाय या संबंधानें स्पेन्सरसाहेबांनीं आपले मत देतांना आपली बुद्धि या बाबतींत कशी कुंठित होते हैं जर स्पष्ट सांगितले आहे, तर ** दंतभेगोहि नागानां लाघ्यो गिरिविदारणे ’ या न्यायानें त्यांचे आम्ही अभिनंदनच के* पाहिजे. आयुष्याचीं ६० वर्षे सतत अभ्यासांत घालवून ज्यांचा मेंदु जगाच्था गूढ तत्त्वांशीं टक्कर देण्यांत गुंतला होता अशा तत्त्वज्ञ पुंगवास त्याची बुद्ध एकाद्या ठिकाणीं कुंठित झाली म्हणून नावें ठेवणें यासारखा दुसरा समंजसपणा नाहीं असें स्पष्ट म्हणण्यास हरकत नाहीं. शिवाय हीही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे कीं, नीति तत्त्वाचे उदात्त स्वरूप उत्क्रांति तत्वाच्या . साहाय्यार्ने सिद्ध करण्याचे श्रेय स्पेन्सरसाहेबांनचि संपादिले आहे, इतकेंच नव्हे तर वेदांती लोकांप्रमाणें आत्म्यास अमुक एक प्रकारची शुद्धावस्था प्राप्त झाली असतां तो मुक्त होतो, इतर गोष्टींची आम्हांस जरूर नाही असे म्हणणायांपैकीं स्पेन्सरसाहेब नव्हते. तसेच जीवाच्या कर्तव्याची सीमा परोपकार आहे असें सांगून ते स्वस्थ बसले नाहीत. अगदीं रानटी स्थितीपासून मनुष्याची सामाजिक स्थिति सुधारतां सुधारतां उत्क्रांति तत्वानें हल्लींचा समाज कसा बनला गेला याचेही त्यांनीं एक स्वतंत्र शास्र बनविले आहे; व प्रत्येक मनुष्याचे, समाजाचे, राजाचे आणि प्रजेचे कर्तव्य काय, आणि त्याच्या अभिवृद्धीची दिशा कोणती, अथवा या प्रश्नांचा विचार केोणत्या दिशेनें केला पाहिजे, या बाबतीत शास्रीय ग्रंथ लिहून त्यांनी अशा प्रकारच्या प्रश्नांचा विचार करणाच्या लोकांस एक प्रकारचा कायमचा मार्ग दाखविला आहे. फार लांब कशाला ! शिक्षणावर जो त्यांचा निबंध व ज्याचे आज दहापंधरा भाषांत भाषांतर झाले आहे तोच घेतला तरी व्यावहारिक गोष्टीस तत्त्वज्ञाच्या हातांत किती उदात्त स्वरूप प्राप्त होर्ते व त्यापासून समाजास किती फायदा होतो याची वाचकांस कल्पना येईल, वेदांतांतील किंवा