३६५
होते इत्यादिक मतें 'मूले कुठारः ' या न्यायाने उध्वस्त होतात. अर्थात् परलोक आदिकरून धर्मकल्पनांचे मूळ कुंठित होते हैं सांगावयास नकोच. देहामध्ये उत्क्रांतीतत्त्वाप्रमाणे एका विशिष्ट प्रकारच्या पूर्णतेस पोहोचलेली जीवरूप जी शक्ति तिचा देहास मरण आलें असतां एकदम नाश व्हावा आणि अपक्रांतीच्या नियमास अनुसरून तिचा अनादि अज्ञेयशक्तींत एकदम लय व्हावा असे मानणे चमत्कारिक आहे, व हें तत्त्व मान्य करण्यास आपली बुद्धि जरा कचरते असेही स्पेन्सर साहेब म्हणतात; पण मेंदू आणि संज्ञाशक्ति निरनिराळी मानण्यास पुरावा नसल्यामुळे हाच सिध्दान्त कबूल केल्याखेरीज गती नाहीं असें त्यांचे म्हणणे आहे. आत्म्यास किवा जीवास देहाव्यतिरिक्त जर राहातां येत नाही तर धर्म- कल्पना मनुष्याच्या मनांत कोठून आली असा प्रश्न सहज उद्भवतो. यास स्पेसरसाहेबाचें असें उत्तर आहे की, स्वप्नामधील अवास्तिक अनुभवावरून आणि भूत किंवा पिशाच्च इत्यादिकांच्या गोष्टींवरून जीव हा शरीरास सोडून राहू शकतो अशी खोटी कल्पना प्रथमतः रानटी मनुष्याच्या मनांत आली, आणि त्याच कल्पनेची वाढ होऊन त्यावर धर्माची इमारत उभी करण्यांत आली. स्पेन्सरसाहेबांचे हैं मत म्याक्समूलरादिकरून विद्वानांस मान्य नव्हते. व त्यांनी तो खोडण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शिवाय जीव आणि मेंदू यांचा संबंध स्पेन्सरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे नित्य नसून देहास सोडूनही जीव राहू शकतो अशाबद्दल 'सोसायटी फॉर सायकीकल रिसर्च' इनें अलीकडे काही पुरावाही गोळा केला आहे. तेव्हां जीवासंबंधाने स्पेन्सरसाहेबांचें मत केव्हाही सर्वमान्य होईल असे वाटत नाही. कसेंही असो; जीव किंवा आत्मा यासंबंधाने स्पेन्सरसाहेबांचे मत चार्वाकाप्रमाणे, आणि जगाच्या बुडाशीं जें अज्ञेय तत्त्व आहे त्या बाबतीत त्यांचे मत वेदांत्या- प्रमाणे आहे असें यावरून दिसून येईल. जगांमध्ये दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या निर- निराळ्या भेदांची उत्पत्ती द्रव्य आणि शक्ति यांच्या साम्यावस्थेपासूनच उत्पन्न होते असे जे त्यांचे मत तें वैशेषिक मतास जरी विरुद्ध आहे तरी सांख्याच्या मताशी मिळते. तेव्हां एकंदर विचार करतां परमेश्वर, जीव आणि जडसृष्टि या संबंधाची स्पेन्सरसाहेबांची मतें अनुक्रमें वेदांत, चार्वाक आणि सांख्य यांच्या मतांच्या मिश्रणाने झालीं आहेत असें म्हणावें लागतें, परंतु यांत जे चार्वाक- मताचे मिश्रण आहे तें जुन्या चार्वाकमताहून अत्यंत भिन्न आहे हे पूर्णपण लक्षांत ठेविले पाहिजे. देहाबरोबर जीवाचाही नाश होतो असें जरी स्पेन्सर- साहेब मानतात तरी चार्वाकाप्रमाणे ' ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' या चैनी तत्त्वाचा त्यांनी कोठेही अंगीकार केलेला नाहीं. इतकेच नव्हे तर उत्क्रांतीचे तत्त्व समा- जात व नीतिशास्त्रास लावून सर्व समाजाचे किंबहुना मानव जातीचे हित साधून परोपकार करणे हीच जगामध्ये जीवाच्या कर्तव्याची सीमा आहे असें त्यांनी सोपपत्तिक व आपल्या नेहमीच्या पद्धतीनें अनेक शास्त्रांतील दृष्टांत देऊन प्रतिपादन केले