पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्बर्ट स्पेन्सर. ३६१ पासून पंरिचित झालेले आहेत. परमेश्वरानें सात दिवसांत सृष्टि निर्माण केली, आणि प्राण्यांची उत्पात करतांना पशु, पक्षी, कीटक, मनुष्य वगैरे निरनिराळ्या जाती आपल्या शक्तीनें प्रथक् निर्माण केल्या इत्यादि बायबलांत गोविलेल्या वेडगळ कल्पना बायबल रचिले जाण्यापूर्वीच आमच्या तत्त्ववेत्त्यांनीं झुगारून दिल्या होत्या. जीव कोटींतील पशुपक्ष्यादि निरानराळ्या जातींतील उपजाति एका सामान्य जातींतून उत्क्रांति तत्त्वार्ने निघाल्या आहेत. असें जें मत डार्विन साहेबांनीं प्रस्थापित केले व जें उत्क्राति तत्त्व स्पेन्सरसाहेबांनीं व्यवस्थित रीतीनें सर्व सजीव-निर्जीव सृष्टीस लावून दाखविलें, तें तत्त्व आमच्याकडे सांख्यांनीं फार प्राचीनकाळीं शेोधून काढलेले होते. सर्व सृष्टीचे जड व चित् असे दोन मोठे वर्ग करून हे दोन्हीही भाग अनादि व नित्य आहेत असें सांख्य तत्त्ववेत्त्यांनीं ठरविले होतें. चित् सृष्टीस पुरुष आणि जड सृष्टीस प्रकृति अशीं नार्वे त्यांनीं दिलीं होतीं. पुरुष हाच जीव; परंतु तो प्रकृतीहून अगदीं भिन्न व प्रकृतीच्या गुणांनीं अलिप्त आहे असें सांख्यांचे मत आहे, प्रकृति ही त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व--रज-तमो गुणात्मक आहे; आणि अगदीं सृष्टीच्या आरंभी हे तिन्ही गुण अगदीं साम्यावस्थेत असतात, आणि त्यांची ती साम्यावस्था बिघडली म्हणजे तिन्ही गुणांच्या कमजास्त मिश्रणानें प्रथमत: महत् तत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूतांचीं तन्मात्रे निर्माण होऊन नंतर पुढे सृष्टींतील निरनिराळे पदार्थ प्रादुभूत होतात असा सांख्यांचा सिद्धांत आहे. पुरुष किंवा जीव हा, प्रकृतीपासून वर सांगितल्याप्रमाणे उद्भूत झालेल्या हस्तपादादिक स्थूल, किंवा बुद्धि आणि मन आदिकरून सूक्ष्म इंद्रियांनीं वेष्टित असून त्यांच्या सांन्निध्यानेंच सर्भेवारच्या संघातांत संज्ञा किंवा संवेदनशक्ति दृश्य होते, आणि हा जो प्रकृतीपासून निघालेल्या विकारांचा जीवावर परिणाम ती नाहींसा झाला म्हणजे जीवास मुक्ति मिळतें असें सांख्यांचे म्हणणे आहे. हा सिद्धांत अर्थातच स्थूलमानार्ने आम्हीं दिला आहे. कारण यापेक्षां विस्तारानें आजच्या लेखांत त्यांचीं मर्ते सांगणे शक्य नाहीं. तथापि, वर दिलेल्या स्थूल सिद्धांतावरूनही एवढे लक्षांत येण्यासारखे आहे कीं, त्रिगुणात्मक प्रकृतीची साम्यावस्था जिला अव्यक्त अशी संज्ञा आहे ती व्यक्तरूपानें दृग्गोचर होण्यास त्रिगुणांमध्यें वैषम्य उत्पन्न व्हावें लागर्ते हें मत फार प्राचीनकाळीं या देशांत उपस्थित झाले आहे. भगवद्गीर्ततही * गुणागुणेषु वर्तन्ते ? अशा रीतीनें जें वाढीचे किंवा उत्क्रांतीचे तत्त्व सांगितले आहे तेंही हंच होय. या सांख्यमतांत वेदांत्यांच्या दृष्टीनें जो फरक करावयास पाहिजे तो एवढाच कीं, प्रकृति आणि पुरुष हे दोन्ही भिन्न न मानतां या दोन्हीचेही अगम्य असें कांहीं तरी मूल आहे, आणि तें एक, अविभाज्य व चिद्रूप असून नित्य असल्यामुळे जड़ प्रकृतिही त्याचाच अनित्य आभास असून जीव हा स्वतः अशेय स्वरूप मानला पाहिजे. जीव आणि अशय यांचा हा संबंध कांहीं निराळ्या Y®