पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६० लो० टिळकांचे केसरींतील लेख. एकोणिसाव्या शतकांतील शाधांनीं पालटून गेल्यामुळे या नव्या शोधांचा पूर्वीच्या तत्त्वविचारांवर काय परिणाम होतो, हें पाहण्याचे आमचे काम असतांही आम्ही नव्या पद्धतीनें इतके भांबावून गेलें होतों कीं, हा उद्योग हातीं घेण्याइतका सम% पुरुष आमच्या देशांत निघाला नहीं. परंतु ज्या देशांत विद्येचा जिवंत झरा कायम होता, आणि त्यामुळे आधिभौतिक शास्रांतील नवीन नवीन शेोध झपाट्यानें निघत होते त्या देशातच या तत्त्वज्ञानाच्या विषयांकडे हर्बर्ट स्पेन्सर याचे लक्ष लागून त्याच्या अपूर्व बुद्धिप्रभावानें नवीन शास्त्रीय शोधानीं उपस्थित केलेल्या परिस्थितीचा तत्त्वविचारावर काय परिणाम होण्यासारखा आहे हें अपिणास पहावयास मिळाले; आणि एकोणिसाव्या शतकातील शास्रीय शेोधानीं भाबावून गेलेल्या आमच्या आधुनिक विद्वानास स्वाभाविकरीत्याच स्पेन्सरसाहेबाचे विचार व तत्त्वज्ञान मोहक आणि रमणीय वाटून त्याचे सत्यत्व निर्विवाद आहे अशी त्याची खात्री झाली. स्पेन्सरसाहेबाच्या तत्त्वज्ञानाचा आमच्या युनिव्हर्सिटींतून निघालेल्या विद्वान् लोकाच्या मनावर एवढा मोठा परिणाम का झाला हे यावरून लक्षांत येईल. पण स्पेन्सरीय तत्त्वज्ञानाचा जास्त प्रसार होण्यास याखेरीज दुसरें असेंही कारण झालें कीं, त्यांच्या नव्या विचारसरणीनें त्यांनी जे सिद्धांत काढले त्यापैकी काही प्रमुख सिद्धात आमच्या जुन्या तत्त्ववेत्त्यांनीं काढ लेल्या प्रमेयाशीं बहुतक अंशी मिळतात असे आढळून आले; आणि ही गोष्ट आढळून आल्यावर हिंदुस्थानातील प्राचीन तत्त्वज्ञानाबद्दलची जी अदिरबुद्धि नष्ट झाली होती तीही पुन्हा प्रादुर्भूत झाली. या जागृतीचा परिणाम काय होती हे आजच सांगतां येत नाही. तथापि एवढी गोष्ट खरी आहे कीं, स्पेन्सरसाहेबाचे तत्त्वज्ञानाबद्दलचे सिद्धांत पहिल्याने आमची विद्वान् मंडळी ज्या भावनेनें शिरसावं द्य मानीत असत ती भावना शेवटपर्यंत तशीच राहणे शक्य नाहीं. यावरून स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथाचे महत्त्व किंवा त्याच्या तत्त्वविचारांची योग्यता कमी होईल असें आम्ही म्हणते असें केोणीं समजूं नये. त्याच्या ग्रंथांची व विचारसरणीची जी छाप विद्वान् लोकावर बसली आहे ती बच्याच अंशीं कायमची आहे असे म्हटलैं तरी चालेल. पण जुन्या तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथाच्या परिशीलनार्ने आणि दरवर्षी होत असलेल्या नव्या नव्या शास्त्रीय शोधांच्या योगार्ने स्पेन्सरसाहेबांच्या कांहीं सिद्धांतास पुरवणी जेोडण्याचा किंवा त्यांत कांहीं दुरुस्ती करण्याची आवश्यकता वाटण्याचा प्रसंग मार्गेपुढे आल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं एवढेच आमचे म्हणणे आहे. आपण ज्या सृष्टींत राहत आहों ती सृष्टी निर्माण कशी झाली, निर्माणकर्ता या सृष्टीहून केोणी निराळा आहे कीं नाहीं, सृष्टीस पाहणारा आपल्या शरीरांत जो जीव आहे त्याचे स्वरूप काय, तो नित्य आहे कीं अनित्य आहे, सृष्टीच्या मुळांशीं जीं आदितस्र्वे आहेत त्यांचा आणि या जीवाचा कांहीं परस्पर संबंध आहे कीं नाहीं इत्यादि गूढ प्रश्न आमच्या लोकांस फार प्राचीन काळा