पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्बर्ट स्पेन्सर. ३५९ बैलगाडीच्या ठिकाणीं आगगाडी, किंवा नावेच्या ठिकाणीं आगबोट आल्यावर तें ज्ञान या नव्या परिस्थितीस शोभण्यासारखें असेल अशी कल्पनादखील नव्या मेडळीच्या डोक्यांत शिरेनासी झाली. रसायनशास्र, भूगर्भशास्र, प्राणिशास्र, ज्येोतिषशास्र, जीवनशास्र, यांतील नवे नवे अपूर्व शोध कानावर पडून एक प्रकारची नवीन सृष्टि किंवा जग आमच्या विद्वान् मंडळीच्या डोळ्यांसमोर उर्भ राहिले, आणि त्यानें त्यांचे डोळे दिपावून जाऊन पूर्वीचे तत्त्वज्ञान यापुढे काय टिकर्ते, असें त्यास साहजिकरीत्याच वाटू लागले. ही परिस्थिती लक्षांत आणली म्हणजे मग स्पेन्सरसाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा आमच्या आधुनिक विद्वानाच्या मनावर पहिल्यानें इतका परिणाम कां झाला याचे बीज वाचकांच्या सहज लक्षांत येईल. स्पेन्सरसाहेब हे खुद्द या नव्या परिस्थितींतच जन्मलेले होते, आणि वर सांगितलेली एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील शास्त्रीय शोधाची वाढ ांच्या देखत झाली होती, इतकेंच नव्हें तर ते शोध ज्या पुरुषानी केले ते डार्विन, हक्स्ले वगैरे विद्वान् लोक स्पेन्सरसाहेबाचे समकालीन असून मित्न होते. अर्थात् ज्या नवीन शास्त्रीय शेोधांनीं पूर्वीची परिस्थिति बदलली ते शास्रीय शोध स्पेन्सरसाहेबांस अवगत हेोते इतकेंच नव्हे, तर त्या शास्रीय शेोधाच्या ओघांतच स्पेन्सरसाहेबाचे सर्व आयुष्य गेलले होतें. येथे ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे कीं, स्पेन्सरसाहेब हे शास्त्रज्ञ नव्हे तर तत्त्वज्ञ होते, म्हणजे भूगर्भशास्र, जीवनशास्र, किंवा विद्युच्छास्र अशा एखाद्या विशिष्ट शास्राचा अभ्यास करून त्यांत डार्विन, हक्स्ले, किवा टिंडाल यांजप्रमाणे नवे शोध करण्याकडे त्यांच्या बुद्धीची प्रवृत्ति नव्हती. त्यांनीं जें काम हातीं घेतलें होतें तें याहीपेक्षा अधिक व्यापक व अधिक योग्यतेचे होतें. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तराधांतील शास्त्रीय शेोध व कल्पना आमच्याकडील विद्वानांस इंग्रजी शिक्षणार्ने कळल्याबरोबर त्याच्या डोळ्यांपुढे जी नवी सृष्टी उभी राहिली तीच स्पेन्सरसाहेबांच्या डोळ्यांपुढे हळू हळू वाढत होती; आणि या नव्या शास्त्रीय विचाराच्या व कल्पनेच्या साहाय्यानें किंवा एकवाक्यतेनै जगाच्या मुळाशी जे कांही गूढ प्रश्न आहेत ते सोडविता येतील की नाहीत, अथवा त्यासंबंधाने कांहीं सामान्य सिद्धांत बांधतां येतील की नाहीत, या विषयांत स्पेन्सरसाहेबांचे सर्व लक्ष गुंतलें होतें, डोळ्यांसमोर दिसणारें जग हें काय आहे व कोठून आले, यास कोणी कर्ती आहे कीं नाहीं, याच्या मुळाशी कोणतीं तत्त्वें आहेत, एक तत्त्व असेल तर त्याचे आपल्या दृष्टीस पडणारे निरनिराळे विकार कसे होतात, हे विकार कांहीं अबाधित नियमांनी होत असतात की काय, आणि असल्यास ते नियम कोणते या विचारांत स्पेन्सरसाहेब गुंतलेले होते. तत्त्वज्ञान म्हणतात तें यासच होय; आणि कपिल, गौतम, कणाद, व्यास, शंकराचार्य, बुद्ध वगैरे हिंदुस्थानांत निर्माण झालेल्या तत्त्ववेत्त्यांनी पूर्वी जे कांहीं सिद्धांत केले आहेत ते याच संबंधाचे आहेत. परंतु वर सांगितलेंच आहे कीं, या प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या वेळीं आधिभौतिक शास्रांची जी स्थिति होती ती