पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५४ लो० टिळकांचे केसरीतील लेख. मनांतील धर्मविचरांची जागृती होणे अशक्य आहे. सारांश, शाळेतील विद्याथ्यास जो धर्म शिकविणें तेो त्यांच्या आईबापांचाच धर्म शिकवला पाहिजे, आणि इं तत्त्व एकदां मान्य केल म्हणजे सरकारी शाळांतून धर्म शिक्षणाची सोय करण्यास ज्याच्या त्याच्या धर्मावर लिहिलेली पुस्तकें त्या त्या विद्याथ्यांना वाचावयास दिलीं पाहिजेत. अशा त-हेची पुस्तकें सरकारी विद्याखात्यांत किंवा विद्याखात्याकरितां कोणी तयार करीत आह किंवा केली आहेत काय, असा दुसरा प्रश्न सहजीच निघतो. हिंदुधर्मावर (आणि याच धर्मासंबंधानें आज विशेष लिहिण्याचा आमचा इरादा आहे) संस्कृतात आणि प्राकृतांत पुष्कळ ग्रंथ आहेत. परंतु संस्कृताचा अभ्यास करण्यास पुष्कळ वेळ नसल्यामुळे किंवा संस्कृत प्राकृत ग्रंथ लिहिण्याची पद्धत हल्लीच्या काळास जशी असावी तशी नसल्याकारणानें या ग्रंथाचे अध्ययन सरकारी शाळातून होत नाहीं; आणि दुस-या दृष्टीनें पाहिले तर हल्लींच्या अभ्यासक्रमात अशा ग्रंथाचा रिघाव होण्यास अवकाशही नसती. सारांश, मराठी शाळेत श्रीगणेशाय नम:-** छे छ * अ अा '-लिहिण्यास मुलगा घातल्यापासून तो एम्. ए. किवा एलू , एलू., बी, होऊन युनिव्हर्सिटीच्या चरकांतून बाहेर पडेपर्यंत धर्म म्हणजे काय व ती कशाशी खावा याचे त्यास बिलकूल ज्ञान नसतें. मराठी किंवा इंग्रजी क्रमिक पुस्तके यातील ग्रेस दार्लिगची गोष्ट तो पाठ म्हणेल, पण हरिश्चंद्राच्या कथेचा काठ उल्लेख आला असतां हा Allusion कोठला, म्हणून संस्कृत पुस्तकाच्या नोटा त्यास चाळाव्या लागतील. कॉलेजांतील इतर शिक्षणही याच प्रकारचे असते. तर्कशास्त्र, ज्योतिप, गणित, अर्थशास्त्र यांतील सिद्धात कोणत्या क्रमाने सिद्ध करावे लागतात हें या विद्याथ्यांकडून घोकून घेतलेले असतें; व राहाटाचा बैल गाडीस जुपला म्हणजे जसा बिचकतो व बांकडा चालू लागतो, त्याप्रमाणे धर्मग्रंथाचा विचार करण्यास लागलें असतां कॉलेजांतील शिकलेल्या विद्याथ्यांच्या मनाची स्थिति होते, धर्मविचारासंबंधानें ही अवस्था झाली. धर्माच्या बाबतीत प्रेमादि ज्या कांहीं मनोवृत्ति जागृत व्हाव्या लागतात, त्यांचे तर यापूर्वीच गूळखेोबरें झालेले असतें. अर्थात् तप दीड तप अभ्यास करून युनिव्हर्सिटींतून बाहेर पडल्याबरोबर हे राजश्री इतके श्रद्धाहीन, कुतर्कवादी व स्वार्थपरायण बनलेले असतात कीं, उदरभरणापलीकडे व्यवसाय करण्याची त्यांच्याठायीं उमेद राहत नाहीं. स्वार्थत्याग म्हणजे काय याचे शाब्दिक ज्ञान झाले असले तरी त्याप्रमाणें कृति होत नाहीं; एखाद्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याकरितां सर्वस्व अर्पण करून व्यवसाय करण्याची संवय झालेली नसते, आणि काणतीही गोष्ट मी आपल्या जन्मात साध्य करीन अशा प्रकारची उमेद किंवा ती सिद्ध करण्यास लागणारें मानसिक धैर्य अथवा करारीपणा यांस हे गृहस्थ पूर्णपणें आोचवलेले असतात. परमेश्वराची प्राप्ति करून आयुष्याचे सार्थक करणे हा धर्माचा मुख्य विषय होय हें खंरै आहे; पण धर्मश्रद्धेनें संसारांत किंवा राष्ट्राच्या व्यवहारांत किंवा राष्ट्राच्या इतिहासांतही पुष्कळ फायदा