पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश. ३४९ विचारांचे, मनोधर्माचे किंवा मनोविकारांचे अथवा सुख:दुःखाचे चित्र ज्या शब्दांत असतें तशा शब्दांची तुलना करण्याचा प्रसंग आला म्हणजे कोशकारास पुष्कळ अडचण व त्रास पडतो. त्यांतून एक भाषा प्रगल्भ व दुसरी बाल्यावस्थेत असेल तर ही अडचण कधी कधीं इतकी दुर्घट होते कीं, परिभाषेतील शब्द जशाचा तसा ठेवून त्याचा कसाबसा विस्तृत अर्थ देऊनच काम भागवार्वे लागते. एखाद्या नागरिक प्रैौढ वधूच्या श्रृंगारांतील नखरा खेडेगांवांतील मुग्धवधूजनांच्या विलासानें व्यक्त करणें जितकें अवघड आहे तितकेंच प्रौढ भार्षेतील शब्दांचे निरनिराळे वाच्य किंवा व्यंग अर्थ त्यापेक्षां कमी दर्जाच्या भाषेतील शब्दांनीं स्पष्ट करणें दुर्घट होय. त्यातूनही जेव्हां निरनिराळ्या भाषेतील म्हणींचा विचार किंवा तुलना करावी लागते तेव्हां पुष्कळ वेळां ही अडचण अपरिहार्य अशी भासू लागते. तथापि, कोशकारानें जें काम पत्करलें असतें त्याच्या सांगतेस या सर्व अडचणींचा यथाशक्ति त्यास परिहार करावा लागतो. अर्थात् हें काम सर्वोशीं पूर्ण होणें कधींच शक्य नसतें, पण पूर्व ग्रन्थ काराच्या किंवा कोशांच्या सहाय्यार्ने आणि समकालिन विद्ववत् समूहांच्या मदतीनें जथवर मजल पाँचविणे शक्य असेल तेथवर इष्ट कार्याची मजल नेणें हें प्रत्येक कोशकाराचे कर्तव्य आहे; आणि कोणत्याही केोशाचे परीक्षण करतेवेळीं या सर्व गोष्टींचा अवश्य विचार केला पाहिजे. इंग्रजी भाषेचा पहिला कोश डॉक्टर जॉन्सननें केला, व तेव्हां भाषेच्या वाढीस अवश्य लागणारे लेंटिन व ग्रीक भाषैतील पुष्कळसे शब्द त्यानें इंग्रजी कोशांत सामील केले. पण हल्लींचे इंग्रजी भाषेचे स्वरूप पाहिले तर या अवजड शब्दांच्या ऐवजीं सोपे शब्द घालण्याची प्रवृत्ति नजरेस येते. तथापि येवढ्याच करितां जॉनसन यांस दोष देणें कधींच वाजवी होणार नाहीं, भाषेची अभिवृद्धि पुढे कशी व्हावी याबद्दल जरी आज थोडेंबहुत अनुमान करतां आलें तरी पुढे जी अभिवृद्धि सर्वोशीं तशीच होते असें नाहीं, सबब वाढत्या भाषेचा कोश करणारार्ने आपल्या किंवा आपल्या वेळच्या समजुतीप्रमाणे आपलें काम पुरें करून टाकणे एवढेच त्याचे कर्तव्य आहे व तें केलें म्हणजे त्यार्ने आपलें काम चांगल्या रीतीनें बजावलें, अर्से म्हटले पाहिजे. हे विचार सुचण्याचे कारण प्रो. एन्. बी. रानडे बी. ए. यांनीं विसाव्या शतकांतील इंग्रजी-मराठी कोशाचा आमच्याकडे पाठविलेला पहिला भाग होय. अशा प्रकारचा पहिला मराठी कोश म्हटला म्हणजे कॅडीसाहेबांनी केलेली इंग्रजीमराठी डिक्शनरी आहे. पण ही डिक्शनरी अव्वल इंग्रजी असल्यामुळे गेल्या ५० वर्षात मराठी भाषेच्या शब्दसंग्रहांत जी भर पडलेली आहे किंवा भाषेच्या स्वरूपांत जो फरक पडलेला आहे तो कॅडीसाहेबांच्या डिक्शनरीत आढळून येत नाहीं. उलट कित्येक वेळां केवळ या डिक्शनरीच्या सहाय्यानें इंग्रजीतून मराठति भाषातरं परकीय लोक Sugar coated याचे ** साखरावगुंठित ” असें भाषांतर करून न जाणतां आपणांस व आपल्या भाषांतरास उपहासास पात्र करून घेतात.