पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/363

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ミ?と लो० टिळकांचे केसरीतील लेख. भाषा बोलणारे परंतु निरनिराळ्या प्रांतांत राहणारे अशा लोकांत प्रयोगांचीं किंवा शब्दांचीं निरनिराळीं स्वरूपं कशीं होतात, त्यांतील ग्राह्य कोणतीं आणि अग्राह्य कोणतीं, शुद्ध कोणतीं, अशुद्ध केोणतीं, इत्यादि अनेक गोष्टींचे घेोरण ठेवून कोशकारांस आपलें काम करावें लागतें. संस्कृत भाषेत छपन्न कोष आहेत, पण त्यांत अमरकेशाचीच योग्यता कां विशेष धरली जाते याचा ज्याने थोडाबहुत विचार केला असेल त्यास आमच्या म्हणण्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. त्यांतून अलीकडे अलीकडे जगांतील सर्व भाषांचा अभ्यास पाश्चिमात्य विद्वानसमूहांत सुरू झाला असल्यामुळे निरनिराळ्या भाषेतील शब्दांची तुलना करणें हा कोशकारांस एक अधिक विषय झाला आहे. आणि सर्वोचा विचार करून स्वभार्षत कोश करणें मोठ्या विद्वत्तेचेच नव्हे तर मोठया परिश्रमाचेही काम झाले आहे. स्वभार्षेतल्या स्वभाषेत कोश रचना असली तरी कोशकारांस किती गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागतें हें या गोष्टीवरून कळून येईल. परंतु एका भाषेतील विचार जेव्हां दुस-या भाषेत उतरावयाचे असतात, तेव्हां कोशकारांस वरच्यापेक्षांही अधिक परिश्रम करावे लागतात; इतकेच नव्हे, तर एका भाषेच्याऐवजीं दोन्ही भाषांचेही पुरें ज्ञान त्यास असावें लागतें. तशांतून एक भाषा अभिवृद्धीच्या शिखरास पॅचलेली आणि दुसरीच्या अभिवृद्धीस नुकताच आरंभ झालेला अशी स्थिंति असेल तर मग कांहीं विचारावयासच नको. कोणतीही भाषा ध्या, त्यांतील शब्दसमूह ती भाषा बोलणाच्या लोकांच्या विचाराचे, शानाचे किंवा एकंदर समाजस्थितीचे चित्राप्रमाणें द्योतक असतात; किंबहुना एखाद्या तळ्यांत सर्भेवारच्या वस्तूंचे जसें प्रतिबिंब पडतें त्याचप्रमाणें प्रत्येक देशांतील लोकांच्या आचारविचारांचे, धर्माचे, नीतीचे, तत्त्वज्ञानाचे, व्यापाराचे व समाजास्थतीचे चित्र त्यांच्या भाषेत उतरलेले असतें असे म्हणण्यास कांहीं ह्रकत नाहीं. * वाच्यर्था नियताः सर्वे वाङ्मूला वाग्वितिसृता: ’ असें जें मनूर्ने म्हटले आहे तें अगदीं यथार्थ आहे; व त्यामुळेच भाषेच्या अभिवृद्धीवरून लोकांची स्थिति व लोकांच्या स्थितीवरून भाषेची अभिवृद्धि यांजबद्दल सहज अनुमान करतां येतें. आता ही गोष्ट उघड आहे कीं, निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या धर्मानें आणि निरनिराळ्या परिस्थितीत वागणाच्या लोकांचे विद्या, धर्म, नीति, व्यवहार किंवा त्यासंबंधाचे विचार बरेच भिन्न भिन्न असले पाहिजेत. अर्थात् भिन्न भिन्न देशांतील लोकांच्या भर्षतील शब्दसमूहही भिन्नभिन्न अर्थीचा द्योतक असला पाहिजे. अशा भिन्न भिन्न शब्दसंग्रहाची तुलना करणें म्हणजे अमेरिकेंतील अॅडीस् युरोपांतील आल्पस आणि आशियांतील हिमालय यांपैकीं कोणत्या तरी एका पर्वताचे वर्णन दुस-या पर्वताच्या वर्णनांत असलेल्या शब्दांनींच व्यक्त करण्यासारखें आहे. मानवजातीच्या व्यवहारांत जे शब्द सामान्य असतात तेथें विशेष पंचाईत पडत नाहीं; पण प्रत्येक देशांतील लोकांच्या विशिष्ट