पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रो. रानड यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश. ३४७ ॐप्रो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश. कोश आणि व्याकरण हीं कोणत्याही भाषेच्या उत्कर्षाचीं प्रधान अंगें होत. जामदारखान्यांत केवळ रत्नें पुष्कळ आल्यानें भागत नाहीत, तर ज्याप्रमाणें जामदारखान्याच्या मालकाजवळ सदर रत्नांच्या रूपाची, वर्णाची व किमतीची याद असावी लागते, तद्वत्च भाषेचे शब्दभाडा गार वापरणाच्या लोकांची स्थिति होय. भाषेस जें प्रौढ स्वरूप प्राप्त होते तें त्यातील शब्द संचयामुळे होत असते. पण आपणाजवळ शब्दसंचय आहे किती, असलेला पुरा नसल्यास नवीन किती मिळण्याचा संभव आहे, असलेल्या संचयाची योग्यता काय आणि त्याच्यामध्यें अर्थद्योतकपणा किती किवा वतनदारी कोणत्या प्रकारची आहे हें जर नीट लक्षात नसेल, तर शब्ससंचय पुष्कळ असूनही त्याचा उपयेोग चागल्या रीतीनें करतां येणें शक्य नाहीं. भाषस कोशाची आणि व्याकरणाची जी मदत होते ती याच कामीं होय; आणि या कारणामुळेच जगांतील नव्या जुन्या सर्व प्रौढ भाषांचे कोश व व्याकरणें झालेलीं आपल्या दृष्टीस पडतात. व्याकरण हें वेदाचे मुख व निरुक्त हे कान आहेत असे पडांगातील दोन अंगासंबंधानें प्राचीन उल्लेख आहे. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे कोश आणि व्याकरण हे दोनही भाषेचे जीवप्राणच समजलें पाहिजेत. ज्या सिद्ध पुरुषाच्या जिव्हाग्री सरस्वती वास करीत असते त्यांस कोशाची अगर व्याकरणाची तादृश जरूर लागत नाहीं, एवढ्यावरून कोश आणि व्याकरण हीं साधनै भाषेच्या अभिवृद्धीस आवश्यक नाहीत असें जर कित्येकाचे मत असेल तर तें अगदीं चुकीचे आहे. * ऋषीणां पुनराद्यानां वाचमथेनुधावति ? हें वचन जरी खरें असलें तरी सर्वच ग्रन्थकारांचा अधिकार एवढा मोठा असतो असे नाहीं. वाग्देवीचे मंदीर लुटण्याची निसर्गतःच ज्यास पूर्ण मोकळिक मिळाली आहे त्यांची आणि भाषेतील इतर ग्रन्थकारांची तुलना करूं लागल्यास पुष्कळ प्रसंगीं * घटाना निर्मातुस्त्रिभुवन विधातुश्च कलहः ’ असे म्हणण्याची पाळी आल्याखेरीज रहावयाची नाही. सारांश, देशांत संपत्ति कितीही विपुल असली तरी तिचा एके ठिकाणी ज्याप्रमाणें व्यवस्थित संग्रह करावा लागतेो तद्वत्च व्याकरणाच्या कसोटीस लावून शब्दरत्नें मोठ्या काळजीनें आणि व्यवस्थित रीतीनें संग्रहित करावीं लागतात. हें काम मोठया मेहनतीचे, विद्वतेचे, आस्थचे आणि शोधपूँवक विवेचनाचे असते. भाषेचे घटकावयव काय, प्रसंगानुसार यौगिक किंवा व्युत्पतिदृष्टया समानार्थक शब्दाची रूढ भाषेत भिन्नार्थी योजना कशी करतात, त्यातील भेदाभेद कोणते आणि ते पहिल्यापासून तसेच कायम आहेत कीं, भाषेच्या वाढीबरोबर बदलत चाललेले आहेत, नव्या कल्पना, नवे विचार भाषेमध्ये घेण्यास जीं द्वारें आहेत ती भाषेच्या अभिवृद्धीस पुरेशीं विस्तृत आहेत कीं, अधिक विस्तृत करावयास पाहिजेत, एकच

  • (केसरी ता. २७ आक्टोबर १९०३)