पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ ६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. करीत असत. पाश्चिमात्य विद्येचा खिस्ती धर्मीतील विद्वानांवर जर वाईट परिणाम होत नाही असें ग्लेंडस्टनसारख्यांच्या चरित्रांवरून आम्हांस समजर्ते तर आम्हांवरच तसा परिणाम होण्यास धार्मिक व गृहशिक्षणाचा अभाव वगैरे दुसरी कांहीं कारणे आहेत. अशी इतिहासावरून त्यांची खात्री झालेली होती; व त्यामुळे * डबल लाईफ ' किंवा वर सागितलेली द्विधाभाव किंवा चलबिचल त्यांस केव्हाही कोणत्याही बाबतीत खपत नसे. आमच्या सामाजिक व धार्मिक वर्तनाच्या तराजूची दाडी हल्लींच्या परिस्थितींत उजूं राहण्यास विद्वतेनें व स्वत:च्या आचरणाने ही गोष्ट प्रतिपादन करणाच्या पुरुषाची आम्हास अत्यंत जरूर आहे. प्रो. जिनसीवाले हे अशा प्रकारचे पुरुष होते. आणि त्यांच्या मरणानें जें आमचे मोठे नुकसान झालें तें हेंच होय की, गृहशिक्षणाच्या अभावामुळे किंवा हिंदु रितीभातींच्या किंवा धर्माच्या अज्ञानामुळे अथवा आपले बापचुलते इंग्रजी शिक्षणाने * डबल लाईफ 'चे झाले म्हणून त्याच्या उदाहरणानें ज्यांचीं मनै हल्लीच्या काळांत चेचल होतात किंवा होण्याचा संभव आहे, त्यांस अधिकारार्ने दोन गोष्टी सागून पुन: ताळ्यावर आणण्याचा उद्येोग करणारा आमच्यापैकी एक मोठा पुरुष नाहींसा झाला. एम्. ए. झालेले किंवा संस्कृताचे अथवा इतिहासाचेही चागले अध्ययन केलेले पुरुष प्रो. जिनसीवाल्याप्रमाणें सध्या आहेत व पुढेही होतील. पण वर जे त्याचा विशिष्ट गुण सागितला आहे तो उत्तरोत्तर महाग होत चालला आहे; व तो दुर्मिळ न होण्याची जर कांहीं तजवीज करावयाची असेल तर त्यापैकीं मुख्य तजवीज म्हटली म्हणजे प्रेो. जिनसीवाले याचे उदाहरण आमच्या तरुण पिढीनें लक्षात ठेवावें हेंच होय. दृडनिश्चय, व करारीपणा हे गुण काही अंशीं आनुवंशिक आहेत हें खरं; पण उदाहरणार्ने, उपदेशानें, विचारानें आणि अभ्यासाने हें गुण बच्याच अंशीं येऊं शकत नाहीत असें नाहीं. करिता प्रो. जिनसीवाले हे तरुण पिढीस उपदेश करीत असत, म्हणजे * सत्यान्न प्रमदितव्यम्। धर्मान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् । भूयै न प्रमदितव्यम् । स्वाधाय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् । देवपितृकायीभ्यां न प्रमदितव्यम् । मातृदॆवेोभव । पितृदवेीभव । अाचार्येदेवोभव । यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि । नेो इतराणि । इ०” तोच बोध त्यांच्या चरित्रापासून घेण्यास विनंति करून व प्रोफेसरांसारखे निश्वयी व विद्वान् पुरुष पुन: लवकरच आमच्यामध्ये निर्माण होवोत, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून हा दुःखदायक मृत्युलेख पुरा करिता.