Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २१ नये. पण थोडा विचार केला असतां वरील दोन कल्पनांची जी सांगड घालून दिली आहे, तात कितपत तथ्यांश आहे हें तेव्हांच लक्षांत येण्याजोगें आहे. वरील प्रमेयांत मुख्य चूक म्हटली, म्हणजे मनुष्याच्या व्यवहारास कायद्याखेरीज दुसरें कांहीं बंधन नाहीं, असें मानणे ही होय. वस्तुतः पाहतां कायद्याचे बंधन अगदीं अपुरतें आहे, व त्यास जर इतर बंधनांचे साहाय्य नसतें तर आपले सामाजिक व्यवहार हल्लीं चालले आहेत, तसे सुरळीत चालले नसते. असे पहा कीं केोणीही मनुष्यानें आपला पैसा रंडीबाजींत किंवा दारूबार्जीत उडवू नये, असा केोठेही कायदा असल्याचे ऐकिवांत नाहीं, व कायदेशीर रीतीनें पाहतां प्रत्येक मनुष्यास आपला पैसा या दुव्र्यसनांत घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. तथापि तेवढयावरून ती गोष्ट निंद्य नाहीं, असे कोणीही मनुष्य म्हणणार नाहीं, व एखाद्यानें सर्भेत किंवा वर्तमानपत्रांत या विषयाची चची केल्यास तीही अप्रयोजक म्हणता येणार नाहीं. कायद्याचा उद्देश एवढाच असते, की कोणाही मनुष्यानें दुस-याचे हक्कास प्रतिबंधक अशी गोष्ट करूं नये. यापेक्षा जास्त नियम कायद्यांत घालतां येत नाहीत. तथापेि इतर व्यवहारात मुळींच नियम नाहींत असे समजूं नये. महाभारतांत एके ठिकाणी म्हटले आहे: यमदंडभयात्केचित्पापाः पापं न कुर्वते राजदडभयात्केचित्परस्परभयादाप ॥ म्हणजे कांहीं गोष्टी धर्माच्या भीतीनें, कांहीं कायद्याच्या भीतीनें व कांहीं लोकभीतीस्तव आपण करीत नाहीं. सकाळीं स्नान करावें, चांगलें अन्न खावें, दुव्र्यसनात पैशाचा अपव्यय करूं नये, वगैरे गोष्टींत नियामक लोकलजाच होय. लोकात एखादी गोष्ट वाईट मानली गेली, म्हणजे कायद्यानें जरी ती गोष्ट करण्यास परवानगी असली, तरी ती करण्यास कोणीही धजावत नाहीं. इतकें ‘परस्परभय’ (लोकलजा किंवा अबू) याचे बंधन असते. म्हणून कोणतीही चाल प्रचारांत आणण्यापूर्वी, किंवा त्यासंबंधानें कायदा करण्यापूर्वी, लोकमत फिरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कायदा हा लोकमताचा पूरक असल्याकारणानें, जर त्यास लोकमताचे पाठबळ नसेल, तर त्याचा कांहीं एक उपयेोग होत नाहीं, व हाच सर्वसाधारण सिद्धान्त दत्तकासही लागू आहे. जेोपर्यंत दत्तक घेतल्यानें मनुष्य आपल्या द्रव्याचा दुरुपयोग करतो, असा लोकांचा समज झाला नाहीं, तोंपर्यंत हो चाल कधीही बंद पडणार नाहीं. कायदेशीर रीतीनें मनुष्यास आपलें द्रव्य कोणासही देण्याचा आधिकार असो, तथापि जर तो मनुष्य आपल्या द्रव्याचा दुरुपयोग करील तर * परस्परभया'नें असा प्रकार बंद करण्याचा लोकांस पूर्ण अधिकार आहे व तो अधिकार * दारूबाजी ’, ‘ रंडीबाजी ' वगैरे गोष्टींत आपण प्रत्यहीं बजावीत आहों. कायद्याच्या दृष्टीनें पाहिलें, तर कोणाही मनुष्यास आपले द्रव्य समुद्रांत टाकण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं, मग तसें लोक कां करीत नाहींत ? उघडच आहे कीं, ह्यास लोक पैशाचा दुरुपयोग समजतात व एखादे राजेश्री जर घरांतील सर्व इस्टेट