पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ लो० टिळकांचे केसरींतील लेख यांजपाशीं. जसा पांच सहा हजारांचा निवडक पुस्तकसंग्रह होता तशा प्रकारच्या पुस्तकसंग्रहांत पदरचे पैसे खर्च करणारे ग्रंज्युएट विरळाच आढळतात ! कॉलेज सोडल्यावर कांहीं वर्षेपर्यंत हे पुणे येथील हायस्कुलात मास्तर होते व नंतर त्यांनीं मुंबईच्या विल्सन कॉलेजांत संस्कृतच्या प्रोफेसराची जागा पत्करली. हें काम त्यांनीं सुमारें १४।१५ वर्षे केलें; परंतु काहीं उपद्वयापी मंडळींच्या खटपटीनें त्यास पुढे या जागेचा राजीनामा देणें भाग पडलें. ह्या प्रसंगाची हकीगत त्यावेळीं प्रसिद्ध झालेलीच आहे. करितां त्याची द्विरुक्ते येथे करीत नाहीं. इतकेंच सागतो कीं, त्यावेळी झालेलीं सर्व कृत्यें जर बाहेर पडतील तर प्रो जिनसीवाले याच्या त्या वेळच्या प्रतिपक्ष्याची अनुदारता आणि खोटेपणा हीं मात्र अधिक व्यक्त होतील. प्रो जिनसीवाले यांच्या अंगीं काहीं दोष नव्हते असें आम्ही म्हणत नाही. जेो पुष्कळप्रसंगीं गुण असतेो तोच एखाद्या प्रसंगीं अवगुण होतो हें संसारांतील तत्त्व सर्वास माहीत आहे; व कोणत्याही पुरुषाच्या चरित्राची मीमांसा करतांना हें तत्त्व नेहमीं लक्षांत ठेविलें पाहिजे. परतु तसें कांहीं एक न करतां व प्रो. जिनसांवाले थांच्या मनाचा कोवळेपणा किती होता हें लक्षांत न आणतां त्यांनीं आपल्या बायकोस एका प्रसंगीं थेोडी शिक्षा केली, यावरून गवगवा करून त्यांच्या हितशत्रूनीं त्यांस नोकरी सोडण्याचा प्रसंग आणिला हें लक्षांत आणलें म्हणजे “ तत्को नाम भवेत् गुणो हि गुणिनां यो दुर्जनैनीकितः ” या सुभाषिताची आठवण झाल्याखेरीज राहत नाहीत. असो; प्रो. जिनसीवाले यांनी ही जागा सोडल्यावर मरेपर्यंत आपला निर्वाह सदर मुदतींत त्यांनीं जेो काहीं द्रव्यसचय केला होता त्यावरच चालविला होता. कॉलेजांतील अभ्यास परिपूर्ण झाल्यावर त्यांचे लग्न झाले व त्यास एक मुलगाही झालेला होता. पण दोन वर्षापूर्वी त्यांची पत्नी व मुलगा हीं दोघेही प्लेगने वारलीं; व या आकस्मिक घाल्यानें शेवटीं शेवटी त्यांचे मन फार उद्विग्न झाले होतें. तथापि, मूळचा स्वभाव निश्चयी असल्यामुळे त्यांनी आपला आयुष्यक्रम पूर्वीप्रमाणेच अबाधित चालू ठेविला होता. त्यांस आग्रही म्हणून कांहीं लोक दूषणे देत असत, परंतु हंसस्वरूप स्वामींचीं पुणे येथे जेव्हां व्याख्यानें झालीं तेव्हां त्याच्या व रा. टिळक याच्या दरम्यान सर्भेत उघड मतभेद व वाद होऊनही त्यांनी पुन्हां रा. टिळकांशी आपलें वर्तन पूर्वीप्रमाणेच ठेविलें हे ज्यानी पाहिले आहे त्यांस त्याच्याठायीं मनाचा कोवळेपणा, सत्यनिष्ठा व स्वदेशाबद्दलची प्रीति हे गुण आग्रहापेक्षां अधिक जागृत होते याबद्दल दुसरा पुरावा देण्याची जरूरी नाहीं. प्राचीन हिंदुधर्मावर त्यांची अतिशय श्रद्धा होती. तथापि, वेद पैौरुषेय आहेत अशी त्यांच्या मनाची खात्री झाली असल्यामुळे ती गोष्ट सर्भेत उघडपणें बोलून दाखविण्यास त्यांनी कधीही कमी केलें नाहीं. ही गोष्ट लोकांस प्रिय नाहीं हें त्यांस कळत नव्हतें असें नाहीं, इतकेंच नव्हे तर श्रुतिस्मृतींचे प्रामाण्यही त्यांस पूर्णपणें कबूल होतें. तथापि * सत्य तें सत्य ’ या न्यायानें त्यांचे याबद्दलचे मत स्पष्टपणे सांगण्यास ते नेहमीं तयार