पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै० श्रीधर गणेश जिनसीवाले. ३४ १ व्हर्सिटीचे पदवीधरांसही लागू पडतें; आणि अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे प्रो. जिनसीवाले याच्या मृत्यूनें आम्हापैकी एक मोठा विद्वान्, देशाभिमानी आणि खया कळकळीचा पुरुप नाहींसा होऊन आमचे अपरिहार्य नुकसान झाले असें म्हणणें भाग येतें. प्रेो. जिनसीवाले हे ग्वाल्हेर येथे हल्लीं जहागीरदार म्हणून जें जिनसीवाल्यांचे घराणे आहे त्यापैकींच होत; व वडिलेोपार्जित इस्टेटीची योग्य वाटणी होऊन जर प्रेोफेसरसाहेबाचा हिस्सा त्यास किवा त्याच्या वांडलास मिळाला असता, तर प्रोसरसाहेबास निदान चारपाच लाखाची तरी इस्टेट मिळून * प्रेोफेसर ’ याच्याऐवजी त्याच्या मागे * श्रीमत ’ हें विशेषण लावावे लागलें असतें. पण दैवगति विचित्र आहे. प्रोफेसरसाहेबाचा जन्म १८५२ इसवीच्या नोव्हेंबर महिन्यात झाला. तेव्हा त्याचे वडील व ग्वाल्हेरचे घराणें हीं एकत्रच होती; परंतु पुढे पाच सात वषांनी विभागाच्या वेळी प्रोफेसराचे वडील व इतर आप्त यांच्या मध्ये तंटा होऊन ** घेईन तर माझ्या वाट्यास येतें तितकें सर्व द्रव्य घेईन, नाहीं तर भिक्षा मागेन ” अशा निश्चयानें वडील ग्वाल्हेरीहून निघाले, व लक्ष्मीस अखेरचा नमस्कार करून आपल्या अल्पवयी चिरंजीवासह नगर जिल्ह्यात येऊन राहिले. यावेळी याच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे खरोखरच ब्राह्मण्याचा सहज अधिकार किंवा माधुकरी होय. वडिलाचा हा करारीस्वभाव जन्मत:च मुलामध्यें उतरला होता असे प्रोफेसरसाहेबाच्या चरित्रावरून दिसून येते. असो; उभयता बापलेकांची जोडी अशा रीतीनें लक्ष्मीचा परित्याग करून अाल्यावर मुलाकडून विद्याभ्यास करवून त्यास हुषार करावयाचे असा तीर्थरूपानीं संकल्प केला; दारिह्यादि संकटावस्थेतही परमेश्वरकृपेने तेो तडीस गला. प्रो जिनसीवाले याचा लहानपणचा विद्याभ्यास काहीं नगरास व काहीं पुण्यास झाला होता; व तो सर्व काही लोकाच्या मदतीनें व काही स्वत:च्या हुशारीनें, स्कॉलरशिप्स किवा बक्षिस मिळवून त्यानी केलेला होता. पुढे कॉलेजात आल्यावरही अशाच प्रकारच्या मदतीने त्यानी आपला अभ्यास पुढे चालविला. व १८७२ मध्यें बी. ए. परीक्षा पास होऊन फेलोशिप मिळाल्यावर १८७६ साली ते एम् ए पास झाल. आणि नंतर डेक्कन कॉलेज सोडले. कॉलेजात असताना याचा ऐतिहासिक वाचनाबद्दल चागला लौकिक होता. व प्रेो. वर्डस्वर्थसारख्या विद्वानाची यांच्यावर पूर्ण मर्जी होती. इतिहास, तर्कशास्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान व संस्कृत हे याचे आवडीचे विषय असत; आणि कॉलेजात असताना या विषयावरील अनेक पुस्तकाचीं टिपणे किवा * नोट्स ' जितक्या यांनी हाताने लिहून काढल्या होत्या तितके त्या विषयाचे वाचनही सामान्य विद्याथ्यांच्याकडून होत नसे. अर्थात् कॉलेजापासून या विषयांतील प्राविण्याबद्दल याची कीर्ति होती व तीच अखेरपर्यंत आपल्या उद्योगानें व व्यासंगानें त्यांनी कायम ठेवली होती. कॉलेजांतील परीक्षा पास होऊन पुढे पुष्कळानीं नोकरीने किंवा अन्य तञ्हेनें हजारो रुपये कमावले आहेत; पण प्रो. जिनसीवाले