पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ ० लो० टिळकांचे केसरींतील लेख हा कायदा अगदीं निरुपयोगी किंवा स्थानिक मॅजिस्ट्रेटास गरीबगुर्राब प्रजेवर जुलूम करण्याचे एक चांगले साधन होईल; त्यापलीकडे त्यापासून फारशी सुधारणा होईलसें दिसत नाही. बडोदें शहरांतील महाजन लोकांनी लगेच सभा भरवून कायद्याविषयी आपले प्रतिकूल मत जाहीर केले आहे. तेव्हां या कायद्याविषयीं लोकमत कसे काय आहे हे निराळे सागावयास नकोच. बालविवाहप्रतिबंधाचा प्रश्न बडोदें राज्यात आज नवीन उत्पन्न झाला आहे असें नाही. सन १८९३ सालीं बालविवाह प्रतिबंधार्थ कायद्याचा एक मसुदा रा. ब. पाडत, वरिष्ठ कोर्ट जज्ज याचे सहीने प्रसिद्ध झाला होता. तेो अगदी निराळे धेोरणावर होता. त्यातील मुख्य तत्त्व जी काय सुधारणा करणें ती केवळ ज्ञातीतील पचाच्या द्वारे करावयाची असे होतें. जर महाराजास खरोखर कांहीं सुधारणा करणे असेल तर त्या च तत्त्वाचे अवलंबन केले पाहिजे. केवळ पोषाखी कायद आज्ञापत्रिकेत प्रसिद्ध करण्यापासून काहीं फायदा नाहीं इतकीच तूर्त इषारत देऊन हा लाबलेला लेख आम्ही पुरा करतो. ང་གླིང་།

  • के. श्रीधर गणेश जिनसीवाले.

सत्यं वद । धर्मे वर । स्वाध्यायान्मा प्रमदः । –तैत्तिरीयोपनिषत्. प्रेो. श्रीधर गणेश जिनसीवाले हे गेल्या मंगळवारीं सुमारें साडे सात वाजतां त्याचे स्नेही रा. रा. श्रीधरपंत आपटे यांच्या घरीं मुंबईस परलेोकवासी झाले, हें कळविण्यास आम्हास अत्यत दु:ख वाटते. प्रत्यक्ष नाहीं तरी वर्तमानपत्रातून त्याच्या प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानावरून प्रेोफेसरसाहेबाचा महाराष्ट्रांत कोणासही परिचय झालेला नाही असें नाही; आणि त्याचा देशाभिमान, कळकळ, विद्वत्ता, वाचन व मनाचा कोवळेपणा वगैरे गुण सर्वास माहीत आहेत. आमच्या युनिव्हर्सिटींतून गेल्या तीस पस्तीस वर्षात जे काहीं थोडे प्रसिद्ध विद्वान् लोक बाहेर पडले त्यातच प्रेो. जिनसीवाले याची गणना होती; व पश्चात् याच्याइतक्या खया कळकळीचा, विद्वान् आणि बहुश्रुत पुरुष आम्हास मिळण्यास बराच काल लागेल असें म्हणण्यास हरकत नाहीं. युनिव्हर्सिटींतून दर वर्षास बी. ए. किंवा एम्. ए. होऊन बरेच लोक बाहेर पडतात; पण शाळेत, कॉलेजांत व कॉलेज सुटल्यानंतर आमरणांत वाचनाची अभिरुची कायम ठेवून सतत विद्याव्यासंग करणारे आणि अशा रीतीनें संपादन केलेल्या ज्ञानाचा लोकास फायदा करून देणारे युनिव्हर्सिटीच्या पदवीधरातही क्वचित् आढळतात. “शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ” असें जे एका पुरातन कवीचे वचन आहे तेंच युनि

  • (केसरी ता. २५ अागस्ट १५०३ ).