पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

翌きく लो० टिळकांचे केसरीतील लेख जाति-बहिष्कृत होत असेल; (२) लग्न न झाले तर सदरहू मुलाचे किंवा मुलीचे बारा वर्षेपर्यंत मुळींच लग्न न होण्याचा संभव असेल; (३) आईबाप किंवा पालक लवकर मरण्याची भीति असेल.व (४) असेंच दुसरे एखादें कारण असेल तर मात्र परवाना द्यावा. मॅजिस्ट्रेट व असेसर यांचा मतभेद झाला तर सुभ्याकडे प्रकरण पाठवून त्यानें निकाल करावा. जे आईबाप किंवा पालक हा नियम मोडतील त्यास १०० रु. पर्यंत दंड करावा; पण सदरहू लग्न होऊन २ वर्षे झालीं असतील तर मात्र कांहीं करूं नये. प्रत्येक गांवकामगारार्ने आपले गावांतील असल्या लग्नाची मॅजिस्ट्रेटास वर्दी दिली पाहिजे व ती मिळतांच माजिस्टूटनै काम चालवावे. शेवटीं या कायद्यानें झालेले लग्न बेकायदेशीर किंवा रद्द होणार नाही असेंही ठरविले आहे. कायद्याचे समर्थनार्थ मि. भांडारकर यांनीं उपेोद्धात जेोडला आहे त्यातील कारणें अशींच मौजचीं आहेत. या देशात कायद्यानें किंवा रूढीनें विवाहाची कनिष्ठ मर्यादा ठरविलेली नाहीं, म्हणून बालविवाह होतात. प्राचीन काळीं व पुराणांतरी ते होत नव्हते. वैदिक मत्रांवरून विवाह प्रौढ वयांत होत असावे असे दिसते. व बालविवाह धर्मशास्रानै निषिद्ध केले आहेत. प्रजेोत्पति हा विवाहाचा एक हेतू असल्यामुळे बारावें तेरावें वर्षापर्यंत पात्रता येत नाही व या मर्यादेच्या आत विवाह केल्यास प्रजा अशक्त होते, म्हणून हल्लींच्या लग्नपद्धतींत फरक करणें जरूर आहे. शहाणे लोकानीं आपणच समजून सुधारणा करावी हे अधिक चांगले, व वयाची यता हळू हळू वाढत आहे असेही पुराव्यावरून दिसतै. गेल्या खानेसुमारीच्या वेळीं गुजराथी वे दक्षिणी ब्राह्मणात अनुक्रर्म १३१७ व १ १२ पंधरा वषांवरील अविवाहित मुली आढळल्या. पण हा अपवाद आहे. तथापि अशी सुधारणा होत असेल तर कायदा करण्याची अधिकच जरूर आहे. शारीर शास्राप्रमाणें मुलीला १४ व मुलाला १८ हीं वयें अपुरीं आहेत, पण सध्या लोकाना तेवढी कबूल होतील अशी आशा आहे. १४ व १८ वयाचे पूर्वी विवाह बंद करण्याचा या कायद्याचा उद्देश आहे. पण विशेषप्रसंगीं परवाना देण्याचा माजिस्ट्रेटास अधिकार दिला आहे.लोकांवर जुलूम होऊं नये म्हणून शिक्षा फक्त दंडाची ठेविली आहे. असली सुधारणा लोकानीं आपण होऊनच केली पाहिजे. परंतु लीक शहाणे होण्यास अजून कालावधि लागणार असल्यामुळे हल्लींच कायद्यांत होईल तितकें सामाजिक स्वातव्य ठेविले आहे. लोकाचे आचारांत अतिक्रमण होऊं नये म्हणून या कायद्याची अंमलबजावणी पहिलीं दहाच वर्षे होईंल ! सुधारकाचे आचारविचारांत नेहमी विसंगतपणा असतो तशीच सदरहू कायद व त्याचीं कारणे यांमधील स्थिति आहे हें थोड्या विचारानें कोणासही कळण्यासारखे आहे. लोकाचे चालीरीतींत अतिक्रम करणारा कायदा सवडीनें व हलके हलके आणावयाचा व काही काळ गेल्यानंतर व लोकांना सराव पडल्यानंतर पूर्ण अंमल करावयाचा, असें सर्वसंमत तत्त्व आहे. पण प्रस्तुत कायदा