पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३२ ली० टिळकांचे केसरींतील लेख आमच्या दृष्टीनें पाहिले तर हल्लीं चालू असलेल्या युनिव्हर्सिटीच्या शिक्षणांत अनेक प्रकारचे फेरफार व्हावयास पाहिजेत, असे कीं, जेणेकरून युनिव्हर्सिट्या म्हणजे खरोखरीच विद्वतेची किंवा विद्वानांची माहेरघरे होतील. निरनिराळ्या विषयांत निष्णात असलेल्या प्रेोफेसराचा समुदाय, विद्याथ्यांच्या डोळ्यादेखत सतत चालू असलेले विद्याव्यासंग, मोठमेाठी पुस्तकालये किंवा यात्रिक उपकरणें वगैरे ज्या सस्थेत नेहमीं दृष्टीस पडतील अशा संस्था येथे निघावयास पाहिजत असें आमचे म्हणणे आहे, व तें योग्य आहे कीं नाहीं हे युरोपातील किंवा इंग्लंडांतील युनिव्हर्सिट्याची जास्त माहिती ज्यास आहे त्यास सहज कळून येण्यासारखें आहे. परंतु दुदवाची गोष्ट अशी कीं, युनिव्हर्सिट्या स्थापन होऊन आज पन्नास साठ वर्षे झालीं तरीही त्यांत अशा प्रकारची सुधारणा करण्याचे सरकारच्या मनात येत नाही व हल्लीं युनिव्हर्सिटीकमिशनच्या ज्या सूचना बाहेर पडल्या आहेत त्यात जरी या गोष्टीचा थेोडाबहुत उल्लेख आहे, तरी त्यापासून वर लिहिलेल्या प्रकारचे फल प्राप्त होईल असे दिसत नाहीं सरकाची दृष्टि जरी आरंभी निराळी असली तरी निदान सध्या तरी आम्हास अनुकूल किंवा फायदेशीर नाही, हें दुसरीकडे एका गृहस्थानें दिलेल्या एका ताज्या सरकारी खलित्यातील उताच्यावरून स्पष्ट होणार आहे. युनिव्हर्सिटी कमिशन नेमलें तेव्हाच आम्हांस याबद्दल शंका आलेली होती, व कमिशननें ज्या सूचना केल्या आहेत त्या पाहून तर त्याबद्दल आता बहुतेक खात्रीच झाला आहे असें म्हटले तरी चालेल. हिंदुस्थानातील लोक पाश्चात्य विद्येत, शास्त्रात किंवा कलात निपुण होऊन त्यांनी सुधारलेल्या राष्ट्रातील विद्वानाबरोबर, धेदवाल्याबरोबर किंवा व्यापाच्याबरोबर, आपल्या बुद्धिवभवानें, करामतीने, कौशल्याने किंवा हिमतीनें टक्कर देण्यास तयार व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा नाहीं, किंवा इच्छा असल्यास कृती तरी नाहीं, असें मोठ्या दुःखानें आम्हांस म्हणावे लागतें. एरवीं जपानासारख्या राष्टानें तीस वर्षात ज्या सुधारणा केल्या त्या तिसाचे दुप्पट साठ वर्षात हिंदुस्थान देशात का होऊं नयेत याचे दुसरें काहीं एक कारण आम्हांस दिसत नाहीं राष्ट्राची उन्नति होण्यास नवीन धदे, नवीन विद्या, नवीन शास्रे वगैर जें जे काही पाहिज तें तें आमच्या शाळातून शिकविलें जावें अशी लोकाची इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे. परतु आपल्या सरकारची इच्छा मात्र यापेक्षा अगदीं निराळी आहे. विद्या किंवा शाखेत्र यांमध्यें जे काहीं शेोध करावयाचे ते इंग्लंड देशांत हेतच आहेत. तेव्हा राजकीय दृष्टया ते हिंदु लोकांनींच करावे अशी काहीं आवश्यकता नाही. परंतु हिंदुस्थानचा राज्यकारभार सुधारलेल्या पद्धतीनें चालविण्यास खालच्या प्रतीच्या जाग्यावरून तरी पाश्चात्य पद्धतीनें थेोर्डबहुत शिकलेले लोक असणें जरूर आहे; व ही जरूर भागविण्याकरितांच शिक्षण येथील लोकांस देण्याची सरकारनें सुरवात केलेली होती. इंग्रजी मुत्सद्दयापैकीं काहीं कांहीं मुत्सदयानीं शिक्षणाबद्दल आपले उदार विचार प्रगट करून हिंदु