पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिळक यांचे नागपूर येथील व्याख्यान. ३२५ श्रीकृष्णानीं समाजाला पुष्कळ हितकारक गोष्ट ती चांगली, तदितर वाईट ह्या उपयुक्तता ( utility ) तत्त्वास अनुसरून उपदेश केला असला तर तो अर्जुनास कितपत ग्राह्य झाला असता याबद्दल बराच संशय आहे. बेन्थाम-मिल्लप्रभृतींचीं नीतितत्त्वे धर्मपासून स्वतंत्र अशीं आहेत; परंतु हिदूची नीति धर्माशीं एकरूप झालेली आहे. आत्म्याची मोक्षप्राप्ति हे प्रत्येक हिदूचे अदिकर्तव्य आहे; इतर कर्तव्यें मोक्षानुकूल हवीत, प्रतिकूल नकोत. आमच्या आयांच्या पूर्वापार परंपरेस अनुसरून जेथे वेदान्त, योग, कर्ममार्ग आदिकरून लोकमान्य शास्ने जीवाच्या निरतर कल्याणाकडे लक्ष पुरवितात, तेथे नीतिशास्त्राचा पाया नुसत्या संख्येवर माडणे हैं मुळीच नापसंत आहे. नीतीने न्यायाने वागणारे लोक अल्पप्रमाणात आणि अन्यायाने व अनीतीनें वागणारे लोक पुष्कळ प्रमाणात सापडत नाहीत की काय ? आणि आम्हीं लोकाचे कल्याण तरी का म्हणून करावे ? हा प्रश्न लागलीच उद्भवतो. दुस-या कित्येकांचे असे मत आहे की, हा प्रश्न स्वत:सिद्ध मनेोधमीचा (Moral Intention) at आहे. ** सताहि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमंत:करण प्रवृत्तय: ” हे खरें; पण हें कर्तव्यदर्शक साधन फारच ठोकळ असे आहे. कारण कोणाची वृत्ति सात्त्विक व कोणाची गैर सात्त्विक हें समजणे फार कठीण काम आहे. आता कोणी सुखाकडे बोट दाखवून सुखाचा मार्ग स्वीकारावा असे म्हणतील आणि उपयुक्तता व सुख याची सांगड बांधून पुष्कळ माणसाचे पुष्कळसें हित होईल ते कर्म उत्तम असे मत देतील. परंतु ह्या सुखवादात ( Hedonism ) सर्वोचा मेळ जमावयाचा नाहीं त्या तीन्हीपेक्षा श्रेष्ठ असे जर काही तत्व असेल तर ते गीतेत सागितले आहे आणि तें मोक्षास धरून आहे. ज्ञान, कर्म, योग आणि भक्ति या चारींचाही गीर्तेत समावेश केलेला आहे. परंतु तो परस्पर तुलनसाठी किंवा एकवाक्यतेसाठीं नाहीं. या चारी मागांत सांगितलेल्या तत्त्वाचा गीतेतल्या नीतितत्त्वाशी मेळ आहे व ते तत्त्व चारी मागीनी निरूपीत करून शेवटीं ग्रन्थांत त्याचा पुनरुच्चार केला आहे. आमचा सिद्धात पाश्चात्य सिद्धाताहून फारच श्रेष्ठ आहे. संसार मोक्षप्राप्तीस विघातक नाही. मनुष्यानें जिवंत असणे म्हणजेच कर्म करणे आहे. मल्याशिवाय कर्माचा त्याग व्हावयाचा नाही. जिवंत असणे व कर्म करणें हें समानार्थक आहे, कर्म व जीवित हे पर्याय शब्द आहेत; असें श्रीकृष्णानीं गीर्तेत स्पष्ट सागितले आहे. परंतु वेदान्तात कमीस प्राधान्य नसल्यानें अर्जुनास मोह पडून त्यानें भगवंतास असे विचारलें कीं, एकदा कर्मत्यागाशिवाय मोक्ष नाहीं असें सागता आणि एकदा कर्म करणें हें अवश्यच आहे असे म्हणतां तेव्हा त्यातलें खरें ते कोणते ? त्यावर कर्म केलें की त्याचा परिणाम भोगावा लागणारच, पण कर्म करणे मनुष्याचे काम आहे. जगाच्या घडामोडीत काही कार्य व्हार्वे म्हणूनच मनुष्याला घडविले आहे. तथापि कर्मानें जीव बद्ध होतो आणि त्यापासून अलिप्त राहिल्याशिवाय जीवाला मोक्ष मिळावयाचा नाहीं.” असें श्रीकृष्णांनीं उत्तर दिले. कर्म