पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. गायकवाडसरकार यांचा वेदान्त. ३१५ कोते आहेत व दुस-या कोणी हेच विचार प्रगट केले असते तर त्याची चर्चा करण्याच्याही आम्ही भरीस पडली नसती. पण बडोद्यासारख्या संस्थानाचे अधिiति जेव्हा अशा तञ्हेचे नास्तिक्याचे विचार आविचारपणाने प्रगट करितात तेव्हा असल्या बाबतींत बोलण्याचा त्याचा कितपत अधिकार आहे याचा विचार करणे नार्वजनिक दृष्टीनें अत्यंत जरूर पडतें. आजचा प्रसेग तशातला होय. केवळ पदान्तावरील व्याख्याते एवढ्या दृष्टीनेच महाराजाच्या व्याख्यानाचा आम्ही वर वेचार केला आहे व त्यात जर त्याच्या राजकीय इभ्रतोस न शोभणारे शब्द आम्हास वापरावे लागले असले तर त्यास आमचा नाइलाज आहे. राजे झाले हणजे त्यांचीं मर्त राजकीय बाबतींतदेखील लोकानीं सवैस्वी पतकरलीं पाहिजत असे Iाहीं; मग वेदान्तासारख्या गहन विषयावरील मतासबंधानें तर बोलावयासच किो. ईश्वराचे अस्तित्व, वेदाचे प्रामाण्य, गीतेचे महत्व, वर्णाश्रमधर्मविचार त्यादि बाबतीतील रहस्ये महाराजांस न समजण्यासारखीं आहेत असें नाहीं. पण fीं समजून घेण्यास त्यांनी अजून बरीच वर्षे अभ्यास केला पाहिजे. तोपर्यंत शष्यत्वाच्या नात्यानें त्यानीं शंका म्हणून आपले विचार पाहिजे तर ज्ञात्यापुढे माडावे त्यास कोणाची हरकत नाहीं. पण महाराज इतक्यांत जर तेच विचार सध्दान्तरूपार्ने समाजापुढे माडतील तर ते आपल्या हातानेंच आपणास उपहासास पात्र करून घेतील. विलायतस दहापांच सफरी केल्यानें धर्मीचे ज्ञान होतें असें नाहीं, त्यास दुस-या पुष्कळ गोष्टीची व गुणाची अपेक्षा लागते; ष हे गुण जोपर्यंत महाराजांच्या आगीं आले नाहीत तोपर्यंत आपणास वेदान्तही येतो असें दाखविण्याच्या भानगडींत त्यांनीं पडू नये अशी त्यांस आमची प्रार्थना आहे. राज्यकारभार चालविण्यास वेदाताचे पूर्ण ज्ञान असण्याची काही जरूर नाहीं. व थोरले माधवराव जेव्हा स्नानतंध्येंत अधिक वेळ घालवू लागले तेव्हा रामशास्त्र्यानीं त्यास जेो उपदेश केला नी आजमितीस महाराज गायकवाड सरकारानीही लक्षात ठेवण्यासारखा आहे. यांस जर वेदान्ताचा अनुभव पाहिजे असेल तर तो देणारे गुरु अद्यापही हिंदुथानात सापडतील; मात्र राज्यकारभार सोडून त्याचे शिष्यत्व पतकरण्यास महाराजांनीं तयार झाले पाहिजे.ही गोष्ट जर त्यास कर्तव्य नसल तर विनाकारण सर्वमान्य वर्मतत्त्वांचा उपहास किंवा अवहेलना करून अथवा त्याबद्दल आपला संशय प्रदर्शित करून लोकांचीं मर्ते कलुषित करण्यास काहीं फायदा नाहीं. श्रमित् सस्वरूप यांनी आपल्या व्याख्यानात सागितलेल्या काहीं गोष्टींमुळे लोकाचा ौरसमज ह्येइल तो चांगला नाहीं असें महाराजानी आपल्या व्याख्यानात म्हटलें आहे. पण तेाच न्याय आपल्या व्याख्यानास शतपट अधिक लागू पडतो असें महाराजांच्या लक्षांत आलें नाहीं असे दिसतें. एरव्हीं शाळेतील मुलासही शोभणार नाहीत अशीं विधार्ने करण्याचे साहस त्यांनी केले नसते. असो; आमच्या कर्तव्यास अनुसरून आम्हांस श्री. सयाजीराव महाराज याच्याबद्दल अशा रीतीनें