पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ३ १४ लो० टिळकांचे केसरींतील लेख सारख्या बहुश्रत संस्थानिकांनीं कांहीं वरवरचे ग्रंथ किंवा भाषांतरे वाचून व्यर्थ बडबड करणे बरोबर नाही. राजकीय सत्तेची किंवा जातिभेदाची उत्पात यासंबंधीं श्रीमत्हसस्वरूप स्वामीचे विचार आधुनिक विद्वानांच्या विचारांशीं न जुळल्यास त्यात कांहीं नवल नाहीं व त्यासंबंधानें महाराजानी एवढे परिश्रम घेऊन नवीन मर्त लोकापुढे माडण्याची काहीं जरूरी नव्हती. तसेच विद्याप्रसाराची आवश्यकता अथवा नीति सुधारण्याबद्दल काळजी इत्यादि गोष्टींतही त्यांचा मतभेद नाहीं. कालानुरूप समाजरचनेत काही फेरफार झाले पाहिजेत व ते होतही आहेत, परंतु नुसती धमीवर श्रद्धा ठेवल्यानें किवा ईश्वराची भक्ति केल्यानें नीति सुधारून औदार्यादि सद्गुणाची वाढ किंवा विकास होत नाही असें जें महाराजानीं प्रतिपादन केले आहे ते आम्हास बिलकूल संमत नाही. बोके संन्यासी केवळ आमच्याच समाजात आहेत असें नाही; आणि असा कोणताही धंदा किंवा आश्रम नाहीं की, लबाडानी किंवा अयोग्य पुरुषानीं त्यांत आपला प्रवेश करून घेतला नाही, मग तो राज्य करण्याचा धदा असो की भीक मागण्याचा धंदा असो. अशा लोकाची आम्हांस बिलकुल तरफदारी करावयाची नाहीं. परंतु असे काही लोक सर्वत्र असतात म्हणून ईश्वरभजनाची योग्यता कमी समजणें म्हणजे उंदराच्या भयानें घर सोडून दण्याइतकेच वेडेपणाचे काम होय. परमेश्वराच्या सर्वव्यापी कल्पनेबद्दल महाराजांनी केलेली थट्टाही अगदीं अप्रयोजक आहे; व त्यावरून महाराजाचे अज्ञान मात्र अधिक दिसून येते. आपल्या भाषणाच्या शवटी महाराज असे म्हणतात की, मी जे काही चार शब्द बोलली ते ऐतवेळीं विचार करण्यास सधि न मिळतां बोललों; पण महाराजाना नम्रतापूर्वक आमचा असा प्रश्न आहे की, ही बोलण्याची गोणी आपणावर कोणी लादली होती ? त्यातून वेदान्तासारख्या विषयावर न विचार करिता बोलणें आणि तेंही श्रीमत् हंसस्वरूपासारख्याचे भाषण झाल्यावर बोलणें म्हणजे तर अगदींच अप्रइारुत झेय. श्री. सयाजीराव महाराजासारख्या सुशिक्षित संस्थानिकाविरुद्ध अशा प्रकारचा लेख लिहिण्याची पाळी आम्हांवर यावी ही दुर्दैवाची गोष्ट होय. आज आमच्या संस्थानिकामध्यें जे चागले सुशिक्षित राजे आहेत त्यांमध्यें श्री. सयाजीराव महाराज हे अग्रेसर आहेत. पण कोणीही संस्थानिक कितीही सुशिक्षित असला तरी ज्या विषयावर त्यास बोलण्याचा अधिकार नाहीं त्यासंबंधानें त्यानें अद्वातद्वा विचार प्रगट केल्यास ते उपहासास पात्र होणे अगदीं स्वाभाविक आहे. आज श्री. सयाजीराव महाराजांनीं जे भाषण केले आहे त्यावरून त्याचा ईश्वरावर बेताबाताचाच विश्वास आहे किंबहुना नाही असे म्हटलें तरीही चालेल. अशा स्थितीत वैदिक धर्माची उलाढाल करून अमक्यानीं वैदिक कर्मे आचरावीं अमक्यांनी आचरू नयेत अशा भानगडीत महाराजानीं पडणे म्हणजे शुद्ध * अव्यापारेषुव्यापार ' होय. महाराजाचे धर्मसंबंधीं विचार अत्यंत अपरिपक्व व