पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. गायकवाडसरकार यांचा वेदांत ३१३ अभिप्राय दिलेला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो कीं, ईश्वर मानणें हें सोयीचे आहे म्हणून मानावयाचा, नाहीं तर त्याची कांहीं जरूरी नाहीं. म्हणजे ईश्वर ही एक मनुष्यानें निर्माण केलली उपयुक्त संस्था होय व ती उपयुक्ततेच्या आड आल्यास क्षणभर ईश्वरास रजा दिली तरी कांहीं हरकत नाहीं ! श्रीमंत सयाजीराव महाराजांसारख्यांनी असले विचार लोकांपुढे मांडावे हें आमचे दुर्दैव होय. ईश्वराचे आस्तत्व उपयुक्ततेवर आहे या समजुतीपलीकडे जर महाराजाचे विचार गेले नसतील तर त्यानीं वेदान्तासारख्या गहन विषयावर भाषण करूं नथे हैं चांगले. सर्वज्ञतेचा त्यांनी काहीं विडा उचललेला आहे किंवा उचलावा असेंही नाहीं. मग हा अव्यापारेषु व्यापार करून विनाकारण त्यानीं आपणास लोकाच्या चर्चेस कां पात्र करून घ्यावें हें आम्हांस समजत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य जन्मास आल्याबरोबर तो सृष्टीतील चंद्र, सूर्य, वायु, आकाश इत्यादिकांची पूजा करूं लागला व त्यापासून पुढे देहात्मवाद, चैतन्यवाद, अज्ञेयवाद वगैरे निरनिराळे पंथ उत्पन्न झाले अशी जी महाराजांनीं परंपरा दिली आहे तिचेही अलीकडे पांचपंचवीस वर्षात झालेल्या शास्त्रीय शोधांनीं बरेंच खंडण झाले आहे, हें महाराजास माहीत नाहीं असे दिसतें. मनुष्याची उत्पात होऊन सहा सात हजार वर्षापेक्षां जास्त दिवस झाले नाहीत अशी जेव्हां समजूत होती तेव्हांच्या या कल्पना आहेत. पण भूगर्भशास्रात अलीकडे जे शोध झाले आहेत त्यांवरून मनुष्य उत्पन्न होऊन लाखों वर्षे झालीं असें जर सिद्ध होत आहे, तर महाराजांनी सांगितलेले नाना त-हेचे वाद एकाच धर्माच्या इतिहासात कसे येऊं शकतात हा एक मोठाच प्रश्न आहे. तसेच ईश्वरानें पुरुष व स्री अशा काय त्या दोनच जाती निर्माण केल्या असे जें महाराजानीं सागितलें तेंही केवळ अज्ञानमूलक आहे. ऐतिहासिक शेोध ज्या कालापर्यंत जाऊं शकतो तेथपर्यंत मनुष्यजातीचे आर्य, यहुदी, निग्रो किंवा चिनी अगर मोंगोलियन हे भेद दृष्टीस पडतात असें आतां शास्त्रीयपद्धतीनें सिद्ध झालेले आहे. महाराजांच्या भाषणांत इकडची तिकडची बरीच माहिती गोळा केलली आहे; पण त्यांत कोठेही मार्मिकपणा अगर ही माहिती स्वत:च्या विचाराच्या कसोटीस लावल्याचे दिसून येत नाहीं. इतर्केच नव्हे तर नाना तन्हेचे पदार्थ पचावण्याची ज्यास शक्ति नाही अशा पुरुषाच्या कोठ्यांत गेल्यानें तथे जसा त्याचा एक त-हेचा अनिष्ट पारणाम होत असतो तद्वत् महाराजांच्या धर्मविचारांची स्थिति झालेली आहे. वेदान्त किंवा ीिर्तेत ज्या गोष्टी सागितल्या आहेत त्यांबद्दल कोणीही विचार करूं नये असें आमचे म्हणणें नाहीं. पण सदर ग्रंथास गायकवाडी कायद्याच्या पक्तीस आणून बसविणें म्हणजे पाणिनीनें एका सूत्रांत ज्याप्रमाणे श्वा (कुत्रा), युवा (जवान), आणि इंद्र यांची सागड घातली आहे तसा प्रकार करणे होय. वैदिक धर्माला कांहीं परंपरा असून इतिहासही आहे. तो समजून न घेतां श्री. सयाजीराव ३९