पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञेयाज्ञेयमीमांसा, ই ০৩ सामान्य सिद्धांत सिद्ध होतात ते या अगम्य तत्वाच्याच भासमान विकृती किंवा स्वरूपें आहेत असें स्पेन्सरसाहेबांनीं सिद्ध*कलें आहे. साराश, सर्व ज्ञेयशास्रांतील सिध्दांतांचे पर्यवसान एका अगम्य तत्त्वात असून या अगम्य तत्त्वाचींच ज्ञेयशास्त्रातील सिध्दांत हीं चिन्हें किंवा गम्य स्वरूपॅ आहेत असा स्पेन्सरसाहेबाच्या आदितत्त्वें या ग्रंथाचा अखेर सिध्दात आहे, तत्त्वज्ञानाच्या किंवा वेदान्ताच्या दृष्टीनें हा सिध्दांत किती महत्वाचा आहे हें आम्ही सागावयास नकोच. शिवाय तो ज्या रीतीनें सिद्ध केलेला आहे ती रीति एकोणिसाव्या शतकातील शास्त्रीय पद्धतीस पूर्णपणें अनुसरून असल्यामुळे नव्या पद्धतीने विचार करणाच्या लोकास ती सर्वाशीं पटण्यासारखी आहे. परंतु स्पेन्सरसाहेबाच्या वरील सिद्धांताचे व ते ज्या सरणीनें सिद्ध केल आहेत त्या सरणीचे महत्त्व आमच्या इकडील लोकांच्या पूर्णपणे लक्षात आणून देण्यास आमच्याकडील जुन्या तत्त्वज्ञानाच्या सिद्धाताची याच ग्रंथात रा. रा. फडके यानीं थोडी माहिती द्यावयास पाहिजे होती. तत्त्वज्ञानासबधानें जुन्या संस्कृतग्रंथांतून इतके विचार झालेले आहेत की, सिद्धात प्रतिपादन करण्याच्या सरणींत जरी काहीं भद झाला असला तरी स्पेन्सरसाहेबाचे वरील सिद्धांत आमच्या जुन्या तत्त्वज्ञानाशीं पुष्कळ अंशी मिळते आहेत. पूर्वेकडील व पश्चिमकडील तत्त्वज्ञान सिद्धांतामध्यं अशा रीतीनें असलेलें साम्य दाखवून त्यांत विसदृशपणा कोणता हाही जर रा. रा. फडके यांनीं प्रस्तावना किंवा परिशिष्ट या रूपाने याच ग्रंथात सांगितला असता किंवा स्वतंत्र ग्रंथद्वारे सागतील तर * ज्ञानाचे एकीकरण हेंच खरें तत्त्वज्ञान ’ अशी जी स्पेन्सरसाहेबानीं तत्त्वज्ञानाची व्याख्या केली आहे तिचे यथार्थ स्वरूप वाचकाच्या अधिक नजरेस आले असतें किंवा येईल. ज्ञेय किंवा अशेय, गम्य किंवा अगम्य, चित किंवा जड, सचेतन किंवा अचेतन हे सृष्टिशानाचे विभाग आम्हास अपरिचित आहेत असे नाहीं. हिंदुतत्त्वज्ञ याची आज हजारों वर्षे चर्चा करीत आले आहेत; व त्यानीं या बाबतीत काय प्रयत्न केले होते याचा उल्लेख हल्लींच्या ठिकठिकाणीं येणे जरूर होतें. मार्गे अज्ञेयमीमासेचे परीक्षण करतांना सदर ग्रंथात हीच उणीव आहे असें आम्ही म्हटले होतें. व प्रस्तुत ग्रंथासही तोच शेरा लागू पडतो. आमच्या जुन्या ग्रंथात स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथांतील विचारसरणीचे अनुकरण केलेलें नसले तरी ज्ञय किंवा अज्ञेय विषयाबद्दल त्यांचे सिद्धांत बच्याच बाबतीत इल्लींच्या सिद्धातापेक्षाही पुढे गेलेले आहेत. आजचा लेख बराच लाबल्यामुळे त्यासबंधानें जास्त विवेचन येथे करता येत नाहीं. आज फक्त स्पेन्सरसाहेबांच्या सिद्धाताचे सामान्य स्वरूप सागितले आहे. आतां ते जुन्या सिद्धांतांशीं कितपत जुळतात व जुन्या ग्रंथांत हेच सिद्धात कोणत्या पद्धतीनें, कसे व कितपत सिद्ध केले आहेत याचा विचार पुढील खेपेस करूं.