पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ०६ लो० टिळकांचे केसरींतील लेख सामान्य सिद्धात काढून सर्व ज्ञानाचे एकीकरण करणारे पुरुष तर क्वचितच निर्माण होतात. हर्बर्ट स्पेन्सर यांची गणना या दुस-या वर्गात आहे, व ज्ञेयमीमासेंत त्यानीं जे काहीं सिद्ध केले आहे तेंही हेंच होय. हल्लींच्या शतकांत प्रचलित असलेल्या अनेक शास्त्राचे अनेक सिद्धात एकत्र करून ते द्रव्य व गति याच्या काहीं सामान्य नियमाचे प्रकार आहेत असें दाखविणें, व सर्व शास्रांतून निरनिराळ्या सिद्धाताचा जो पसारा पसरला असतो तो सर्व समानमूलक आहे असें ठरवून तीं मूलतत्त्वे कोणती हें व्यवस्थित रीतीनें मांडणें हें काहीं लहानसहान परिश्रमाचे किंवा बुद्धीचे काम नव्हे. हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांनीं हें अवघड काम कित्येक वर्षे परिश्रम करून आपल्या समजुतीप्रमाणें तडीस नेलेले आहे; व एकोणिसाव्या शतकाच्या अखेर व विसाव्या शतकाच्या आरंभीं प्रचलित असलेल्या सर्व शास्रीय सिद्धाताचे हें एकीकरण प्रत्येक तत्त्वजिज्ञासूर्ने समजून घेण्यासारखें आहे. अशा तर्जेहेनें विष्कलित ज्ञानाचे संकलन करणे याचेच नाव तत्त्वज्ञान होय. व इल्लीं प्रचलित असलेल्या अनेक शास्त्राच्या सिद्धांताचे संकलन कसै करावें व केले आहे हें ज्यास पाहाणे असेल त्यानीं स्पेन्सरसाहेबाचे ग्रंथ वाचले पाहिजेत. परन्तु स्पेन्सरसाहेब एवढाच उद्येोग करून राहिले आहेत असें नाहीं. अनेक शास्त्रातील सिद्धांताच्या परीक्षणार्ने जे सामान्य सिद्धात निघाले ते परस्पर निरपेक्ष असून स्वतत्र आहेत किंवा त्यातही एकप्रकारचे सादृश्य असून ते दुस-या कोणत्या तरी एका सामान्य सिद्धाताचे किंवा तत्त्वाचे स्वरूपभेद आहेत, असे म्हणता येईल कीं नाहीं याचा त्यानीं बारकाईने विचार केला आहे. * अज्ञेयमीमांसा ’ असें हल्लीच्या ग्रंथात ज्यास म्हटले आहे ती हीच होय. सुष्टीमध्ये ज्या कांहीं गोष्टी आपण पाहातो, ऐकतों व अनुभवितों त्या सर्वोचे वस्तुरूप, गुणधर्म, क्रिया वगैरेसबंधानें पुरा विचार करून निरनिराळ्या वस्तूंबद्दल किंवा गोष्टींबद्दल निरनिराळ्या शास्त्रातून जे सिद्धात ठरविले आहेत त्या सर्वाचे एकीकरण करून ह्यापासून सवीस लागणार दहापाच सिद्धात काढणे व ते सर्व कसकसे लागतात याचे विवरण करणे हे ज्ञेयमीमासेचे काम झालें; पण हे एकीकरणाचे चक्र एकदां सुरू झाले म्हणजे ते केवळ या सामान्य सिद्धाताशींच येऊन थाबत नाहीं. निरनिराळ्या शास्त्राचे निरनिराळ्या शोधक पुरुषानीं काढलेले सिद्धात जर सामान्य दहापांच सिद्धातात बसवितां येतात तर हे दहापाच सिद्धांत तरी आणखी एखाद्या सामान्य गोष्टीचीं, तत्त्वाची किंवा सिद्धाताचीं स्वरूपें नसतील कशावरून, असा प्रश्न सहज उत्पन्न होतेो, व याचे उत्तर अज्ञेयमीमासेंत दिले आहे. प्रत्येक शास्राच्या बुडाशीं पाहूं गेले असतां मनुष्याच्या बुद्धीस व तकसि अगम्य असें काहीं तरी तत्त्व आहे अशी मनाची खात्री होते, मग त्या तत्त्वाचे पूर्ण स्वरूप समजो वा न समजेो असें स्पेन्सरसाहेबानीं अनेक उदाहरणे देऊन सिद्ध केले आहे. अनेक शास्रांच्या बुडाशी असणारी अशीं जीं गम्य तत्त्वें त्यांच्या एकीकरणानें एका अगम्याचे अस्तित्व सिद्ध होऊत शास्त्राच्या निरनिराळ्या सिद्धांताच्या परीक्षणार्ने जे