पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ लो० टिळकांचे केसरींतील लेख अनावर वाढून स्वकर्तव्यास विसरणोर पुष्कळ गृहस्थ आमच्यांत आहेत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. निर्वाहाच्या सोयीपेक्षां जास्त अपेक्षा न धरतां कर्तव्यास जागणें हेंच खच्या सुशिक्षिताचे काम हेोय. स्वार्थत्याग करा म्हणून कोणी करीत नाहीं आणि करूं नका म्हणून सागितल्यानें कोणी राहात नाहीं. कोणीही मनुष्य जी गोष्ट करतो ती त्यास प्रिय असते म्हणूनच करतो, * ती त्यास प्रिय नसतां ती त्यास करणे जरूर पडले तर त्याच्या हातून ती चागली वठतही नाहीं. याकरितां स्वार्थापेक्षां कर्तव्य जास्त प्रेिय वाटणारी जितकी मंडळी देशांत निधल तितकी चागली. मला दोन लाख रुपये मिळाले म्ह्णजे मी अमुक करीन असे म्हणणारे पुष्कळ लोक असतात. अर्थात् त्यांची प्रीतिही कांहीं विशिष्ट कामापेक्षां दोन लाखांवर जास्त असते. अशा लोकांच्या हातून किंवा लोकांस दाखविण्याकरितां स्वार्थत्याग करणाच्या लोकांच्या हातून काहीएक व्हावयाचे नाहीं. स्वार्थत्याग प्रत्येक माणसानें केला पाहिजे असें नाहीं; पण देशाची व आपली शक्ति मनांत आणून देशकार्याचा योग्य भाग उचलण्यास त्यानें नेहमीं तयार असले पाहिजे. हा देशसवेचा भाग करीत असतां स्वार्थ त्यास आड न आल्यास उत्तमच होय. पण जेव्हां स्वार्थ त्यास आड येईल तेव्हां देशकार्याच्या भागाकडे जो पुरुष वळेल तोच खरा देशहितकर्ता होय. सरकारी नोकरींत शिरून किंवा द्रव्यार्जनाचे दुसरे मार्ग पतकरून फावल्या वेळांत होईल तितकें देशकार्य करणें हाही एक मार्ग आहे. पण भर्तृहरीनें म्हटल्याप्रमाणें स्वार्थाचा आणि पराथांचा विरोध आला असतां स्वार्थाचा त्याग करून परार्थाकडे वळणारेच पुरुष उत्तम होत. हे पुरुष जाणूनबुजून स्थार्थत्याग करतात असे म्हणण्यापेक्षां परार्थबुद्धीचा त्यांच्या ठायीं उत्कर्ष असल्यामुळे ते स्वार्थाची मातबरी ठेवीत नाहीत असें म्हणणें अधिक सयुक्तिक होय. शास्रीबुवा या कोटींतील होते.एरव्हीं कायद्याचा अभ्यास करून अथवा सरकारी नोकरीतच राहून सांसारिक दृष्टया मोठेपणा संपादन करणें त्यांस काहीं अवघड नव्हते. त्यांनीं नोकरी सोडली ती १०० ची होती कीं, ५० ची होती हा मुद्दा नाहीं. निबंधमाला बंद ठेवून किंवा मालेत निवळ भाषाविष. यक किंवा निनोदात्मक लेख लिहून त्यांच्या वेळच्या इतर विद्वानाप्रमाणे त्यांसही सबॉर्डिनेट सर्विहसच्या वरच्या पायरीस जातां आले असते. पण त्यांच्या स्वभावास ही गोष्ट पसंत नसून त्यांच्या मनान आपलें कर्तव्य निराळेच अांखून ठेविले होतें, त्यामुळे सरकारी नोकरीवर पाणी सोडून अखेरीस ते आपल्या आवडत्या कर्तव्या कडेसच वळले. अशा प्रकारचीं माणसें आमच्या सुशिाक्षत वर्गात जितकीं जास्त् निपजतील तितकीं पाहिजेच आहेत. शास्रीबुवांच्या चरित्रांतील या प्रसंगापासून जर काहीं बोध घ्यावयाचा असेल तर हाच होय. पण आमच्यांतील कांहीं मंडळ इतकी खमेग आहेत कीं, त्यास यांत देखील दोषच दृष्टीस पडतो. कां तर शास्र बुवांनीं चाकरी सोडण्यापूर्वी आपल्या निर्वाहाची आधी सोय लावली म्हणून. अश त-हेच्या आक्षपकांस उत्तर देण्यापेक्षां * अरसिकेषु कवित्व निवेदनं शिरसि